गुजरातमध्ये आमदारांच्या खरेदीचा आरोप, राजीनामा देण्यासाठी ५२ कोटी रुपयांचे आमिष

गुजरातमध्ये अमूल डेअरीच्या निवडणुकांना अत्यंत महत्त्व आहे. परमार आणि पटेल यांच्यामध्ये सलोखा घडवून आणण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत. परमार यांनी राजीनामा दिला तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एक-एक जागा जिंकून राज्यातील रुपानी सरकार विधानसभेत स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असताना एका आमदाराने जरी राजीनामा दिला तरी सरकारपुढे संकट उभे राहू शकते.

गुजरात विधानसभेच्या (Gujarat Assembly) ८ मतदारसंघात पोटनिवडणुका होऊ घातल्या असून या दरम्यान भाजपा आमदार (BJP MLA)गोविंद परमार आणि त्यांच्याच पक्षाचे खासदार मितेश पटेल यांच्यामध्ये सुरु असलेल्या आपसी वाद-विवादामुळे पक्षाच्या अडचणीत वाढ झालेली आहे. जातीयवाद आणि आमदारांची खरेदी होत असल्याचे परस्परावर खुलेआम आरोप करण्यात येत आहे. गोविंद परमार यांनी आमदारकीच्या राजीनाम्याची धमकी दिली असून खासदार मितेश पटेल यांनी जातीयवाद राजकारण करुन अमूल डेअरीच्या निवडणुकीत आपला पराभव केल्याचा आरोप केला आहे. गुजरातमध्ये अमूल डेअरीच्या निवडणुकांना अत्यंत महत्त्व आहे. परमार आणि पटेल यांच्यामध्ये सलोखा घडवून आणण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत. परमार यांनी राजीनामा दिला तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एक-एक जागा जिंकून राज्यातील रुपानी सरकार विधानसभेत स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असताना एका आमदाराने जरी राजीनामा (resign) दिला तरी सरकारपुढे संकट उभे राहू शकते. राज्यसरकार आणि भाजपा कोणत्याही परिस्थितीत असे काही होऊ देणार नाही. राज्यातील ८ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भाजपावर आमदारांची खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप होत आहेत. दोन्ही पक्षांनी या पोटनिवडणुका प्रतिष्ठेचा प्रश्न बनविला आहे.

राजीनामा देण्यासाठी ५२ कोटी रुपयांचे आमिष

काँग्रेस आमदारांना खरेदी करण्याचा भाजपा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी जून महिन्यात विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या तिकिटावर कर्ज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे काँग्रेस आमदार अक्षय पटेल यांनी सांगितले की, आपल्याला पद सोडण्यासाठी ५२ कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. अक्षय पटेल यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस नेते परेश धनानी यांनी सांगितले की, त्यांना १६ कोटी रुपयांत खरेदी केले होते. अक्षय पटेल यांनी या संदर्भात खुलासा करताना सांगितले की, मी असा विकल्या जाणारा व्यक्ती नाही. मी आजपर्यंत जी कमाई केलेली आहे. ती आपल्या व्यवसायातून केलेली आहे. माझ्याकडे साखर कारखाने आहेत. अशाप्रकारची ऑफर गुजरात आणि देशात सत्तेवर असणाऱ्या पक्षाशिवाय दुसरे कोणीहीह देऊ शकत नाही. मणिपूर, अरुणाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि मध्यप्रदेशात काय घडले आहे हे आम्हाला ठाऊक नाही का?

भाजपा प्रदेश अध्यक्षांचा खुलासा

गुजरात प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सी.आर. पाटील यांनी परेश धनानी यांनी केलेल्या आरोपाचा खुलासा करताना सांगितले की, भाजपामध्ये आमदारांना खरेदी केल्या जात नाही. धनानी यांना ट्विट करण्याऐवजी दुसरे कामच नाही. गुजरात भाजपामध्ये सरकार आणि पक्षांमध्ये सरकार मतभेद नाहीत. पाटील यांनी हेही स्पष्ट केले की, यापुढे कोणत्याही काँग्रेस आमदाराला भाजपामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.