कोविड-१९ मुळे लादण्‍यात आलेल्‍या निर्बंधांमध्‍ये नववर्ष स्‍वागताचा आनंद घेण्‍यासाठी धावपळ करत आहात का? पुढे वाचा

सार्वजनिक ठिकाणी/आस्‍थापनांमध्‍ये कार्यरत असलेले कर्मचारी, तसेच कार्यक्रम/समारोहांना उपस्थित असणाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण (Vaccination) अनिवार्य आहे, असे नसेल तर योग्‍य ती कारवाई करण्‍याची चेतावणी देण्‍यात आली आहे. यामधून स्‍पष्‍टपणे दिसून येते की, सेलिब्रेशन्‍सच्या (Celebrations) उत्साहावर पाणी फिरू शकते.

  डॉ. परितोष बाघेल

  ओमायक्रॉन व्‍हेरिएण्‍ट्सह (Omicron Varient) कोविड-१९ (Covid 19) चा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्‍ट्र सरकारने (Maharashtra Government) ख्रिसमस व नववर्ष सेलिब्रेशनवर (Christmas and New Year Celebrations) ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. याचा अर्थ असा की, टेरेसवर कोणत्‍याही प्रकारची पार्टी आणि मोठे सामाजिक कार्यक्रम करता येणार नाहीत. सरकारने सर्वांना लवकरात लवकर कोविड-१९ लसीचे दोन्‍ही डोसेस घेण्‍याचे आवाहन केले आहे.

  तसेच सार्वजनिक ठिकाणी/आस्‍थापनांमध्‍ये कार्यरत असलेले कर्मचारी, तसेच कार्यक्रम/समारोहांना उपस्थित असणाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण (Vaccination) अनिवार्य आहे, असे नसेल तर योग्‍य ती कारवाई करण्‍याची चेतावणी देण्‍यात आली आहे. यामधून स्‍पष्‍टपणे दिसून येते की, सेलिब्रेशन्‍सच्या (Celebrations) उत्साहावर पाणी फिरू शकते. यासंदर्भात सुट्टीचा उत्‍साह कायम ठेवण्‍यासोबत साबधगिरी बाळण्‍याचा सर्वोत्तम मार्ग कोणता असेल? तुम्‍ही काय करू शकता याबाबत जाणून घ्‍या.

  अधिक गर्दी टाळा:

  हॉटेल्‍स, रेस्‍टॉरण्‍ट्स, चित्रपटगृहे, मॉल्‍स आणि इतर सेलिब्रेशन्‍सदरम्‍यान गर्दी टाळा. कुटुंबिय व मित्रांसोबत घराबाहेर पडताना कोविड-१९ नियमांचे पालन करा. तुम्‍ही लहानशा कौटुंबिक कार्यक्रमाचे यजमानी असाल तर मर्यादित स्‍वरूपात लोकांना आमंत्रित करण्‍याची खात्री घ्‍या. तसेच सर्व अतिथींचे दोन्‍ही डोस पूर्ण झाल्‍याची खात्री घेणे देखील महत्त्वाचे आहे. ज्‍येष्‍ठ नागरिक व मुलांनी शक्‍यतो घरातच राहावे.

  परदेशातून आलेल्‍या व्यक्‍तींसोबत पार्टी न करणे:

  सर्वात महत्त्‍वाचे म्‍हणजे परदेशातून परत आलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी पार्टी व संमलेनांचे आयोजन करू नका. त्‍यांनी सरकारने जारी केलेल्या क्‍वारंटाइन कालावधीसंदर्भात नियमांचे पालन केलेले असावे आणि योग्‍य टप्‍प्यांमध्‍ये चाचणी केलेली असावी. संबंधित नियमांचे पालन केलेले असेल तरच तुम्‍ही कुटुंबातील अशा सदस्‍यांना संमलेनामध्‍ये सामील करू शकता. पण त्‍यांच्‍या लसीकरण स्थितीबाबत देखील माहिती करून घ्‍या.

  मास्‍क घालत राहा:

  बंदिस्‍त ठिकाणी सामाजिक कार्यक्रम काही व्‍यक्‍ती असताना देखील धोकादायक ठरू शकतात. मास्‍क घातल्‍याने धोका कमी होण्‍यास मदत होऊ शकते, पण लहानशा जागेमध्‍ये अधिक वेळ एकत्र व्‍यतित करणे धोकादायक ठरू शकते. खूप लहान नसलेल्‍या, तसेच हवा खेळती राहिल अशा ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करा. सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करा हाच एकमेव मंत्र आहे. ओमिक्रॉन व्‍हेरिएण्‍टच्‍या वाढत्‍या केसेससह सर्व उपस्थित अतिथी व यजमानींनी डबल मास्‍क घालणे योग्य आहे.

  सोबत सॅनिटायझर ठेवा:

  हँड सॅनिटायझरसह साबण, पाणी, पेपर टॉवेल्‍स, टिशू, निर्जंतुकीकरण वाइप्‍स आणि नो-टच/फूट पेटल ट्रॅशन कॅन्‍स (शक्‍यतो आच्‍छादित असलेले) पुरेशा प्रमाणात असू द्या. यामुळे लहान जागेमध्‍ये पार्टी करताना देखील स्‍वच्‍छता व सुरक्षितता राखण्‍यास मदत होईल. तुम्‍ही घरीच लहानसे सेलिब्रेशन आयोजित करत असाल तर अनेक सॅनिटायझर बॉटल्‍स ठेवा, ज्‍यामुळे घरातील विविध कोप-यांमध्‍ये अतिथींना सुलभपणे त्‍या बॉटल्‍स उपलब्‍ध होऊ शकतील.

  सामाजिक संपर्क कमी असण्‍याची खात्री घ्‍या:

  वैज्ञानिकांनी महामारीसाठी फूडला दोषी ठरवले नसले तरी बुफे किंवा कॉकटेल्‍सच्‍या भोवती गर्दी केल्‍यास इतरांना विषाणूचा संसर्ग होण्‍याची शक्‍यता वाटू शकते. डिस्‍पोजेबल प्‍लेट्स व ग्‍लासेसचा वापर करा. प्रत्‍येक अतिथीसाठी वैयक्तिक वस्‍तू आणा, ज्‍यामुळे वैयक्तिक संपर्क आणि कटलरी/ग्‍लासवेअर शेअरिंगची शक्‍यता दूर होईल.

  स्‍वच्‍छता राखा:

  वैयक्तिक स्‍वच्‍छता राखण्‍यासोबत विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्‍यास कारणीभूत ठरू शकणा-या पृष्‍ठभागांना सॅनिटाईज करणे महत्त्वाचे आहे. पार्टी भागातील परिसराला सॅनिटाईज करा आणि स्‍वच्‍छता राखा. अतिथींमध्‍ये शेअर करण्‍यात आलेल्‍या वस्‍तू स्‍वच्‍छ व निर्जंतुक करण्‍यासाठी निर्जंतुक स्‍प्रेचा वापर करा. संमेलनाचे आयोजन करताना आराम कक्षाच्‍या स्‍वच्‍छतेकडे देखील काटेकोरपणे लक्ष द्या.

  आहारावर लक्ष ठेवा:

  घरातील पार्टीदरम्‍यान आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करा. रोगप्रतिकारशक्‍ती वाढवेल अशा आहाराची निवड करा. स्‍वत:हून घेता येईल, तसेच स्‍वादिष्‍ट व आरोग्‍यदायी खाद्यपदार्थांची निवड करा. रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणारी पेये उत्तम पर्याय आहेत आणि तुमचे अतिथी निश्चितच त्‍यांचा आनंद घेतील.

  शेवटी महत्त्वाचे म्‍हणजे नववर्षासाठी कार्यक्रम व पार्टी टाळा, कारण त्‍यामुळे उपस्थितांना व यजमानींना संसर्ग होण्‍याचा धोका वाढू शकतो. तुम्‍ही कुटुंबियांसोबत घरीच हा क्षण साजरा करू शकता आणि व्हिडिओ कॉल्‍सवरून मित्र व नातेवाईकांना शुभेच्‍छा देऊ शकता.

  (लेखक माहिम येथील एसएल रहेजा हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसीनचे वरिष्‍ठ सल्‍लागार आहेत.)