mumbai rain

मुंबईमध्ये ( Mumbai)  यावर्षी पावसाळ्याने (rain) मागील २६ वर्षाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. मुंबईकर नागरिक दरवर्षीच अशा संकटाचा सामना करीत असतात. पहिल्यांदा जर कोणी यावर्षी मुंबईला आले असेल आणि त्यांनी हा पाऊस बघितला तर ती व्यक्ती घाबरूनच जाईल.

आगामी काही दशकानंतर समुद्र किनाऱ्यावरील (beach) शहरे समुद्रात डुबण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे (global warming)  ग्लेशियर वेगाने वितळत आहे. यामुळे समुद्राची (Sea) पाणी पातळी वाढू लागी आहे. इ.स. २०५० पर्यंत तर मालदीव पूर्णपणे समुद्रात डुबून जाईल. नेदरलँडलासुद्धा धोत्र होऊ शकतो. बांगला देशाचीसुद्धा हीच परिस्थिती आहे. किनाऱ्यावर बसलेली अनेक स्थळे समुद्राची पाणी पातळी वाढल्यामुळे समुद्रात सामावलेली आहे. द्वापारयुगाच्या समाप्तीनंतर श्रीकृष्णाची द्वारकासुद्धा समुद्रात डुबली होती. या द्वारकेचा शोध पुरातत्व विभागाने कार्बन डेटिंग तंत्रज्ञानाने लावलेला आहे. एटलांटिक नावाचे समुद्र बेट होते. ते सुद्धा एटलांटिक महासागरात डुबले होते. ते बेट एटलांटिक महासागरात डुबले होते. यावर ‘एटलांटिक द लॉस्ट काँटिनेट’ इंग्रजी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.

२६ वर्षांचा रेकॉर्ड मोडीत

मुंबईमध्ये ( Mumbai)  यावर्षी पावसाळ्याने (rain) मागील २६ वर्षाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. मुंबईकर नागरिक दरवर्षीच अशा संकटाचा सामना करीत असतात. पहिल्यांदा जर कोणी यावर्षी मुंबईला आले असेल आणि त्यांनी हा पाऊस बघितला तर ती व्यक्ती घाबरूनच जाईल. सध्या मुंबई जलमय झाली आहे. अनेक वस्त्या आणि रस्ते पाण्याखाली आले आहेत. मुंबईची लोकल रेल्वे वाहतूक ठप्प पडली आहे. जनता मुंबई महापालिकेलाच याप्रकरणी जबाबदार ठरवीत आहेत. गडरलाईनचे झाकण वाहून गेल्यामुळे अनेक ठिकाणी मेन होल उघडे आहेत. ज्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक लोक रोड डिवायडरचा आश्रय घेऊन मार्गक्रमण करताना दिसून येत आहे.

मुंबईची परिस्थिती सध्या अतिशय बिकट

मुंबई कधीच झोपत नाही असे म्हटल्या जाते. मुंबई आता २४ तास जणू जगात आहे. जे लोक कार्यालयातून किंवा कारखान्यातून घरी जात होते. ते रस्त्यातच अडकलेले आहेत. मुंबईची अशी परिस्थिती दरवर्षीच होत असते. प्रशासनाने यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. मुंबईची परिस्थिती सध्या अतिशय बिकट झालेली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे प्रचंड पावसामुळे मुंबईकरांचे बेहाल झालेले आहेत. सरकारी नायर रुग्णालयात पाणी साचले असून या रुग्णालयात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पावसाने प्रचंड बेहाल केले आहे. संपूर्ण जनजीवनच ठप्प पडले आहे. अखेर मुंबई अशीच राहणार काय?