येदि युग समाप्त, कर्नाटकात भाजपाला केले होते विजयी

शेवटी कर्नाटकात तेच घडले जे अपेक्षित होते. 78 वर्षीय येदियुरप्पा यांचे युग अस्ताला गेले. त्यांना मुख्यमंत्री पदावरून जाणे होतेच . कारण 75 वय भाजपात पूर्णविरामाचे आहे. सक्रिय राजकारणात भाजपा त्यांना ठेवताच नाही . आता ही तांत्रिक बाजू असली तरी नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या हिटलिस्टवर ते होतेच . वाजपेयी व अडवाणी युगात येदिंनी कर्नाटकाला भाजपाच्या पारड्यात टाकले हे कुणीच नाकारणार नाही.

  कर्नाटक दक्षिणेत भाजपाचे प्रवेशद्वार झाले होते. येदि कधीही निवडणुकीचे व्यवस्थापन केंद्रीय नेतृत्वाच्या भरवशावर आखताना दिसले नाही.आर्थिक पाठबळाची उभारणी ते स्वतःच करीत होते. इ. स. 2008 व नंतर 2018 मध्ये येदिंना स्पष्ट बहुमत मिळाले नसताना त्यांनी जुगाड जमवून काम सफल केले. ते संघ वा हिंदुत्वाच्या राजकारणात जोडले गेले नव्हते. पण आपल्या जातीच्या राजकारणावर ते बाजी मारून न्यायचे. ते लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. निजिलिंगअप्पा, देवराज अर्स व देवेगौडा यांनीसुद्धा असेच राजकारण केले होते.

  मागासवर्गीयांना सोबत ठेवले होते

  येदियुरप्पा लिंगायत समाजाचे असले तरी त्यांना मागास समाजाला सोबत ठेवणे गरजेचे होते. लिंगायतांच्या गठ्ठा ‘मतदांरासोबत मागासवर्ग आपल्या समवेत असला तर आपण मोठा पल्ला गाठू शकतो हे त्यांनी अचूक हेरले. त्या समाजाचे नेतृत्व येदिंनी सौतारामय्या यांच्याकडून हिसकावले व लिंगायतांच्या सोबतच ते मागासवर्गीयांचे नेते झाले. तेव्हा अनंतकुमार कर्नाटकात हिंदुत्वाचा चेहरा होते.

  संघ व भाजपाचे त्यांना पाठबळ होते. उअमनंतकमार टे येटिचे स्पर्धक बनण्यापर्वीच शेवटी कर्नाटकात तेच घडले जे अपेक्षित होते. 78 वर्षीय येदियुरप्पा यांचे युग अस्ताला गेले. त्यांना मुख्यमंत्री पदावरून जाणे होतेच . कारण 75 वय भाजपात पूर्णविरामाचे आहे. सक्रिय राजकारणात भाजपा त्यांना ठेवताच नाही . आता ही तांत्रिक बाजू असली तरी नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या हिटलिस्टवर ते होतेच . वाजपेयी व अडवाणी युगात येदिंनी कर्नाटकाला भाजपाच्या पारड्यात टाकले हे कुणीच नाकारणार नाही. त्यांचे निधन झाले.

  येदि सांप्रदायिकपेक्षा जातीयवादी नेता स्वरूपात पुढे आले. व्ही. पी. सिंग हे पंतप्रधान असताना जसे मागासवर्गीयांच्या गळ्यातीळ ताईत झाळे होते तसे येदि यांचे राजकारण आहे. कर्नाटकातील धर्मगुरूंनी त्यांना पाठबळ दिळे व पदावरून काढू नका अशी भाजपाला सूचनासुद्धा केलो होती. येदिंनी आपल्या समर्थकांना जमिनी व अन्य पाठबळ उपलब्ध करून टिळे दोते त्यामळे एक स्टाँग नेता असेच त्यांच्या राजकारणाचे स्वरूप होते. जातीयवादी राजकारण करून येदिंनी त्यावर हिंदुत्वाचे वेस्टन लावले.

  केंद्रीय नेतृत्वाने असा दिला धक्का

  भाजपाने लिंगायत समाजाच्या नेत्यांना येदिंच्या विरोधात उकसावळे. आमदारांनी तक्रार केळी की, येदिंच्या मंत्रिमंडळात लिंगायतांच्या उपजातींना फारसे प्रतिनिधित्व मिळाले नाही. येदिंनी त्यांना गद्दार ठरविले. भाजपाचे संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्या उकसावण्यातून आमदार बिथरले हा येदिंचा आरोप आहे. भाजपाने जबाबदारी सोपविल्यामुळे संतोष यांनी येदिंना फटाके बांधले. त्यांच्या विकल्पाचा शोध घेतला.

  मोदींनी फटकारले होते

  येदि यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप होते. त्यांनी मिळीभगत करून अनेक कारनामे केल्याचे उघड झाले होते. त्यांना यासाठी तुरुंगातही जावे लागले. येदिंची अवैध खनन करणाऱ्या रेड्डी बंधूंसोबत चांगलीच गट्टी होती. एकदा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत त्यांना मोदी म्हणाले होते की, तुम्हाला ईश्‍वर नेहमीच वाचवणार नाही. आता तरी स्वतः मध्ये सुधारणा करा. तरीसुद्धा त्यांच्या म्हणण्याचा येदिंवर काहीच परिणाम झाला  नव्हता.