mamata banerjee

बंगाल निवडणुकीत आता रंग चढू लागला आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ब्रिगेड मैदानात घेतलेली विशाल जनसभा आणि त्यामध्ये गेल्या पिढीतील गाजलेला अभिनेता मिथुन चक्रवर्ती याने तृणमूल कॉग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये केलेला प्रवेश चर्चेला आला आहे. पंतप्रधानांची सभा सुरू असतानाच सिलिगुडीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शवितप्रदर्शन करून पंतप्रधान जनतेला खोटी आश्‍वासने देत आहेत आणि बंगालमध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेस विजयी होईल असा विश्‍वास व्यक्त केला आहे . ममतादीदींना भाच्याच्या पलीकडे आता काही दिसत नाही. त्याला सत्तेवर आणण्यासाठी त्यांची सगळी धडपड सुरू आहे. 'मां, माटी माणूष' या तीन घटकांचा उल्लेख करत त्या सत्तेवर आल्या आणि गेल्या दहा वर्षात त्यांनी याच घटकांचा विश्‍वासघात केला अशी टीका मोदी यांनी केली. बंगालची जनता आता ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज झाली आहे. यावेळी ही जनता सत्तांतर करून भाजपाच्या हातात राज्य सोपवेल असेही मोदींना वाटते.

    बंगालमध्येही ममतांना आपल्या हक्काच्या एका वर्गाला गमवावे लागले तर तेवढ्या भाजपाच्या जागा वाढू शकतात. यामध्ये डाव्यांचा आवाज निर्माण झाला नाही तर त्यांचा मतदार भाजपाकडे वळू शकतो. काही डाव्या नेत्यांनी ही स्थिती लक्षात घेऊन भाजपाशी जवळीकही साधली आहे. बंगालमध्ये सुरू असणारा हा ‘खेला’ अजून काय काय रंग दाखवतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

    1978 पासून डाव्या पक्षांनी आणि त्यानंतरची दहा वर्षे ममतांनी बंगालची दुर्दशा केली आहे. आता या राज्याला झपाटय़ाने विकास हवा आहे आणि तो देण्याची क्षमता केवळ भाजपामध्ये आहे. असे मत व्यक्‍त करत मोदी यांनी बंगाल निवडणुकीत प्रत्यक्ष उडी घेतली आहे. त्यांच्या किमान वीस सभा होतील असे सांगितले जात आहे. लोकसभेच्या 18 जागा जिंकल्याने भाजपाचा उत्साह यापूर्वीच दुणावला आहे. यावेळी आपण सत्तेवर येऊ असा विश्‍वास मोदी आणि शाह या दोघांनीही आतापर्यंत व्यक्‍त केला आहे. तर यापूर्वीच्या एका सभेमध्ये ममतांनी भाजपाने दहाचा तया पार करून दाखवावा असे आव्हान दिले आहे. गेली दहा वर्षे ममता यांच्या पक्षाविरोधात लढून हतबल झालेले डावे पक्ष आणि त्यांचा पाठीराखा वर्ग यावेळी ममतांना जबरदस्त आव्हान देणार्‍या भाजपाच्या मागे आपली शक्‍ती उभी करेल असे अंदाज वर्तवले जात आहेत. म्हणजे डाव्या मतांचा बंगालचा मतदार ममता विरोधात जाण्यासाठी थेट उजव्या विचाराच्या भाजपाळा मतदान करेल अशी शक्‍यता वर्तवली जाणेही आश्चर्य करायला लावणारेच.

    ‘लोकसभेच्या वेळी ममतांना शक्‍ती देऊन बंगाली जनतेने हे नवे नेतृत्व उभे केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अल्पमतातील सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात ममता यांनी राष्ट्रीय राजकारणात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले. तत्पूर्वी काँग्रेस नेतृत्वाबरोबर झालेल्या संघर्षात त्यांनी आपली स्वतःची प्रतिमा जपळी आणि त्याच प्रतिमेच्या जोरावर बंगाळी नागरिकांना आपल्या बाजूने खेचून दाखवले. प्रसंगी उद्योगपती रतन टाटांच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांनी एक चमत्कार घडवून दाखवला.

    मात्र,  एकदा सत्तेची चव लागली की, पक्षआणि कार्यकर्त्यांमध्ये जी हितसंबंधांना जपण्याची प्रवृत्ती बळावू लागते, त्याचा फटका सध्या तृणमूल काँग्रेसला बसत आहे. वेगवेगळया घोटाळयांमध्ये पक्षातील नेत्यांची आलेली नावे त्याचा प्रत्यक्षापेक्षा अधिक भाजपाने पिटलेळा ढोल आणि त्या निमित्ताने ममतांच्या प्रतिमेला बसलेला धक्का यामुळे या निवडणुकीत बंगाली जनता नेमका काय निर्णय घेणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे.