sachin tendulkar

सचिन चायनीज गुंतवणूक असणारी कंपनी पेटीएम फर्स्ट गेम्सचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाला आहे. यामुळे संपूर्ण देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे अभियान चालविणारा व्यापारी महासंघ भडकला आहे.

सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) चिनी कंपनीचे ॲम्बेसेडर (Ambassador of the Chinese company) बनणे कोट्यावधी भारतीयांच्या मनाला लागले आहे. पैशाची इतकी काय हाव की, शत्रू देशातील एखाद्या कंपनीचे प्रतिनिधित्व करावे. सचिनने असाधारण कीर्ती व अमाप पैसा गोळा केला आहे. त्याला क्रिकेटचा देव मानले जाते. भारतरत्नासारख्या सर्वोच्च सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले आहे. त्याला राज्यसभा सदस्य नियुक्त करण्यात आले. २०११ मध्ये सचिन भारतीय वायुसेनामध्ये ग्रुप कॅप्टनचे मानद रँक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. डॉन ब्रॅडमॅनसारख्या क्रिकेट दिग्गजाशी त्याची तुलना करण्यात येते. शतकांचे महाशतक बनविण्याचा विक्रम त्याच्या नावे नोंदला गेला आहे. सर्व क्रिकेट खेळाडूंसाठी सचिन नेहमीच रोल मॉडेल आहे. क्रिकेटच्या या लिजेंटने साडे पंधरा वर्षाच्या वयापासून कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली व दीर्घ काळापर्यंत तो खेळतच राहिला. त्याच्या बरोबरच्या खेळाडूंनी तसेच त्याच्यानंतर क्रिकेट खेळणाऱ्यांनीही खेळातून संन्यास घेतला.

एक काळ असा होता की, सचिनशिवाय भारतीय क्रिकेट टीमची कल्पनादेखील केली जाऊ शकत नव्हती. ज्या कोणी सचिनच्या निवृत्तीचा विषय काढला तो टीकाकरांचे लक्ष्य बनत होता. सचिनला कोट्यावधी क्रीडाप्रेमींचे भरभरुन प्रेम मिळाले. लोकांनी त्यांच्या मुलांना क्रिकेटमध्ये सचिनसारखे नाव कमवेल म्हणून क्रिकेटच्या कोचिंगला पाठविणे सुरु केले. ही होती सचिनच्या नावाची जादू. सचिन तेंडूलकर एक अशा अमूल्य हिऱ्यासारखा होता. ज्याला त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी पैलू पाडले. एखाद्या खेळाडूचा कमर्शियल दृष्टिकोन असणे अजिबात टुकीचे नाही. क्रिकेटमध्ये ५०-६० वर्षांपूर्वी काहीही कमाई नव्हती. विजय हजारे, विजय मर्चंट, मुश्ताक अली, चंदू बोर्डे, पॉली उम्रगीर, वीजय मांजरेकर, नरी क्रॉन्ट्रॅक्टर, फारुक इंजिनिअर, एम. एल. जयसिम्हा सुभाष गुप्ते, नरेंद्र तम्हाणे, रुसी सुर्तीसारखे खेळाडू कठीणाईने २५० रुपये एक दिवस खेळण्यातून मिळवत होते. यापूर्वीही फक्त नायडू किंवा रणजितसिंह आपल्या छंदासाठी क्रिकेट खेळत होते. जेव्हापासून वन जे क्रिकेट सामने सुरु झाले आणि त्याचे टीव्हीवर प्रसारण होऊ लागले तेव्हापासून क्रिकेट मंडळाची कमाई होऊ लागली व खेळाडूंना मोठ्या रकमा देण्यात येऊ लागल्या. टी-२० पासून तर खेळाडूंचे उत्पन्न कोटींपर्यंत जाऊन पोहोचले.

आतापर्यंत ब्रँड एन्ड्रोर्ममेंट व जाहिरातीतून कोट्यावधी कमावले

सचिन तेंडुलकरजवळ अनेक कंपन्यांचे एन्ड्रोर्समेंट व जाहिरातींचे करार आहे. त्याचे उत्पन्नदेखील जबरदस्त आहे. त्यानेदेखील या छप्परफोड कमाईची गुंतवणूक चांगल्या पद्धतीने केली असेल. एवढे सगळे मिळविल्यानंतरही लालसा कमी होत नाही. धनार्जन चांगली गोष्ट आहे. व्यक्तीच्या चार पुरुषार्थात याचाही समावेश आहे. परंतु पैसे कमावण्याचा विवेक असणेदेखील गरजेचे आहे. कमाईचे माध्यम योग्य असायला हवे. सचिन चायनीज गुंतवणूक असणारी कंपनी पेटीएम फर्स्ट गेम्सचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाला आहे. यामुळे संपूर्ण देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे अभियान चालविणारा व्यापारी महासंघ भडकला आहे.