shivsena and Bjp

शिवसेना पहिल्यांदाच बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक लढवित नाही तर यापूर्वी २०१५ मध्ये शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत ८० जागा लढविल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेला तेथे कमी यश मिळाले? शिवसेनेला जरी एकही जागा जिंकता आली नाही तरी तेथे आपली उपस्थिती दाखविण्यासाठी मात्र शिवसेना यशस्वी ठरेल. बिहारमध्ये गमावण्यासाठी सेनेजवळ काहीही नाही. तेव्हा नशीब आजमावून का पाहू नये, असा सेनेचा मानस दिसतो.

बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ५० जागा लढविण्याचा विचार करीत आहे. बिहारमध्ये जदयु-भाजप, राजद-काँग्रेस आणि लोजपा असी त्रिकोणी लढत होणार आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील हा प्रादेशिक पक्ष तेथे काहीही करु शकणार नाही. शिवसेना पहिल्यांदाच बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक लढवित नाही तर यापूर्वी २०१५ मध्ये शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत ८० जागा लढविल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेला तेथे कमी यश मिळाले? शिवसेनेला जरी एकही जागा जिंकता आली नाही तरी तेथे आपली उपस्थिती दाखविण्यासाठी मात्र शिवसेना यशस्वी ठरेल. बिहारमध्ये गमावण्यासाठी सेनेजवळ काहीही नाही. तेव्हा नशीब आजमावून का पाहू नये, असा सेनेचा मानस दिसतो. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसोबत काँग्रेस सहभागी आहे. परंतु काँग्रेस बिहारमध्ये शिवसेनेला सहकार्य कसे काय करेल? तेथे तर राष्ट्रीय जनता दलासोबत काँग्रेसची आघाडी आहे. या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपही झालेले आहे.

५० जागा लढविण्याची योजना

बिहारमध्ये शिवसेना भाजपवर मात करु इच्छिते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप श्रेष्ठींनी बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांना विरोध करण्याचा यामागे उद्देश्य असू शकतो. बिहार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत खा. संजय राऊत यांची भेट घेऊन बिहारमध्ये विधानसभा निवडणुका लढविण्याची परवानगी मागितल्याची महिती आहे. शिवसेनेचे बिहार प्रदेशाध्य हौसलेंद्र शर्मा यांनी राऊत यांच्याकडे ही मागणी केली तेव्हा त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे याबाबतीत अंतिन निर्णय घेतील. असे त्यांना सांगितले.

मते कमी करण्याचे प्रयत्न

शिवसेनेला बिहारमद्ये निश्चितच काही आधार असेल त्यामुळेच बिहारचे शिवसेना नेते मुंबईत संजय राऊत यांना भेटले असावे. असा एक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भाजप हा अखिल भारतीय स्वरुपाचा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. बिहारमध्ये जदयुनंतर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. भाजपला आता राज्यात पहिल्या क्रमांकावर यायचे आहे. जर लोजपाचा जदयुसोबत जोरदार मुकाबला झाला तर भाजपला याचा लाभ मिळू शकेल. जर इतके सर्व पक्ष निवडणुका लढवित आहे तर शिवसेनेलाही बिहारमध्ये आपले नशीब आजमाव्यास काय हरकत आहे? बिहारमध्ये शिवसेना भाजपची मते कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि ५० पैकी जरी ५-६ जागा जिंकल्या तरी शिवसेनेची महाराष्ट्राबाहेर हजेरी लागेल.

सुशांतच्या आत्महत्येचा मुद्दा

सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना बदनाम केले आहे. याचा बदला घेण्यासाठी शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणूक लढविणण्याचा निर्णय घेतल्याचे बोलल्या जात आहे. शिवसेनेच्या प्रचाराचा मुद्दाही सुशांत राजपूत यांच्या आत्महत्येच्या बाबतीतच राहणार असल्याचे समजते. हा मुद्दा महाराष्ट्रासाठी ठीक आहे. परंतु निवडणुकीत जर हा मुद्दा पुढे केला तर खरोखरच बिहारची जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी राहील काय? सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी जेव्हा बिहारचे पोलिस अधिकारी मुंबईत आले होते. तेव्हा त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांची मागणी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शिफारशीवरुनच सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आलेली आहे. शिवसेना तर सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येचे प्रकरण पुढे करुन बिहारमध्ये सहानुभूती मिळवू इच्छित असेल तर तो त्यांचा भ्रम ठरेल.