नामांतराच्या मुद्यावरून आघाडीत कटुता

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून आघाडीत मिठाचा खडा पडला असला तरी भाजपाने हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण नामांतराच्या भांडणात आघाडीचा संसार विस्कटेल अशी स्थिती नाही. तथापि, यानिमित्ताने आघाडीत आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर नामांतरवरून आघाडीत निर्माण झालेली कटुता दूर करण्यासाठी आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनाच पुढाकार घ्यावा लागेल असे दिसते.

मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचे नामांतर करून या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या ५ वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. शिवसेना, काँगेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या मधुचंद्राचे दिवस संपले आहेत. गेले वर्षभर संसार सुरळीत सुरू असताना आघाडीत आता भांड्याला भांडे लागू लागले आहे. भांड्याच्या या आवाजाने विरोधी पक्ष भाजपाला आनंद झाला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून आघाडीत मिठाचा खडा पडला असला तरी भाजपाने हुरळून जाण्याचे कारण नाही. कारण नामांतराच्या भांडणात आघाडीचा संसार विस्कटेल अशी स्थिती नाही. तथापि, यानिमित्ताने आघाडीत आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर नामांतरवरून आघाडीत निर्माण झालेली कटुता दूर करण्यासाठी आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनाच पुढाकार घ्यावा लागेल असे दिसते.

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित होण्याचे झन औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याची सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा ही मागणी केली. तेव्हापासून शिवसेनेत औरंगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर असा केला जातो. शिवसेनेने गेली ३० वर्षे औरंगाबादची निवडणूक नामांतराच्या मुद्यावरच लढवली आणि यश मिळवले. आता राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना औरंगाबादच्या नामांतराच्या मागणीने उचल खाल्ली आहे आणि विरोधी पक्ष भाजपाने त्याला हवा दिली आहे. नामांतराच्या मुद्यावर आघाडीत फूट पडावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. कारण म्हणजे लवकरच होऊ घातलेली औरंगाबाद महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक.

औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याची शिवसेनेची जुनी मागणी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा ही मागणी केली. तेव्हापासून शिवसेनेत औरंगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर असा केला जातो. शिवसेनेने गेली ३० वर्षे औरंगाबादची निवडणूक नामांतराच्या मुद्यावरच लढवली आणि यश मिळवले. आता राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना औरंगाबादच्या नामांतराच्या मागणीने उचल खाल्ली आहे आणि बिरोधी पक्ष भाजपाने त्याला हवा दिली आहे. नामांतराच्या मुद्यावर आघाडीत फूट पडावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे.

१९९५  साली राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते, त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव आणून त्याची अधिसूचना काढली होती. काँगेसने अधिसूचनेळा न्यायालयात आव्हान दिले होते. पुढे १९९९  मध्ये युतीची सत्ता गेळी आणि हा प्रस्ताव बारगळला. २०१४ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार होते. तेव्हाही भाजपाने औरंगाबादचे नाव बदलण्याचे धाडस केले नाही आणि सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही आपली मागणी रेटली नाही. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून औरंगाबादच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे.