uma bharati

पीडितेचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन न करता पोलिसांनी रात्री अडीच वाजता तो जाळण्यात आला. यावरुन हेच सिद्ध होते की, उत्तरप्रदेशात अराजकता पसरलेली आहे. पोलिस आणि प्रशासनाला वरिष्ठाचे निर्देश होते की, मिडिया आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना हाथरस येथे जाण्यासाठी मज्जाव करण्यात यावा.

उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ (Yogi) सरकारने हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरण (Hathras gang rape case) ज्याप्रकारे हाताळले आणि पिडितेच्या मृत्यूनंतर जी भूमिका घेतली. त्याबद्दल जनमानसात क्षोभ निर्माण झाला आहे. याप्रकरणी केवळ विरोधी पक्षच नव्हे तर भाजप नेतेही संतप्त (BJP leaders also angry) झालेले आहेत. मध्यप्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती म्हणाल्या, आम्ही नुकताच राममंदिराचा शिलान्यास केला असून रामराज्य आणण्याचे आश्वासन दिलेले आहे. परंतु हाथरसच्या घटनेमुळे भाजपची प्रतिमा पुरती डागाळलेली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ज्या प्रकारे पीडित परिवार आणि गावाची घेराबंदी केली त्यामुळे जनमानसात विविध शंका निर्माण झाल्या आहेत. उप्रतील योगी सरकार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रुळावर आणतील असे वाटत अशतानाच हाथरसरच्या घटनेमुळे या सरकारचा बेजबाबदारपणा पुढे आला आहे. प्रशासनावर योगी सरकारचा बेजबाबदारपणा पुढे आला आहे. प्रशासनावर योगी सरकारचा मुळीच अंकुश नसल्याचे दिसून आले आहे. भदोही बलामपूर, फतेहपूर आणि आजमगड येथेही महिलांवर अत्याचाराच्या घटना घडेल्या आहेत. विरोधी पक्षांबाबतही योगी सरकारच्या प्रशासनाचा व्यवहार निंदनीय आहे.

पीडितेचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन न करता पोलिसांनी रात्री अडीच वाजता तो जाळण्यात आला. यावरुन हेच सिद्ध होते की, उत्तरप्रदेशात अराजकता पसरलेली आहे. पोलिस आणि प्रशासनाला वरिष्ठाचे निर्देश होते की, मिडिया आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना हाथरस येथे जाण्यासाठी मज्जाव करण्यात यावा. असे जर असेल तर ती अत्यंत दुर्देवी बाब आहे.

भाजपची प्रतिमा डागाळली

योगी सरकारने हाथरस प्रकरण ज्याप्रकारे हाताळले, त्यामुळे भाजपची प्रतिमा डागाळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी योगी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. योगी सरकारला या प्रकरणी केंद्र सरकारला उत्तर द्यावे लागणार आहे. हाथरस येथील जिल्हाधिकाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावले. या परिवाराला त्यांचे बयाण बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. या प्रकरणाला जातीयवादी मुलामा तर दिल्या जात नाहीन ना, कारण अटक करण्यात आलेले ४ आरोपी ठाकूर समाजाचे आहेत.