लव्ह जिहाद कायदा करण्यास भाजपाशासित राज्यांचा पुढाकार

धर्मांतरणाबाबत मुस्लीम युवकांद्वारे लव्ह जिहादचा (Love Jihad) वापर करण्यात येत आहे. यासाठी जगातील मुस्लीम राष्ट्रांकडून (Muslim State) मोठ्या प्रमाणावर पैसा येतो. मुस्लीम युवक ओळख लपविण्यासाठी खोटे हिंदू (Hindu) नाव धारण करतात आणि हिंदू मुलींना आपल्या प्रमपाशात ओढतात व त्या मुलीशी विवाह करतात.

आपल्या देशात आंतरधर्मीय विवाहाला (Inter Caste Marriage) मान्यता असून विभिन्न धर्माचे युवक-युवती आता आंतरधर्मीय विवाह करण्यास स्वतंत्र आहेत. परंतु भाजपाशासित राज्यामध्ये मात्र मुस्लीम युवक आणि हिंदू युवतीच्या विवाहाला विरोध करीत लव्ह जिहादबाबत कायदा ( Love Jihad Act) करण्याची तयारी सुरू झालेली आहे . उत्तरप्रदेशातील (UP) आदित्यनाथ सरकारने यादृष्टीने पुढाकार घेतलेला आहे. मध्यप्रदेश आणि उत्तराखंड येथील भाजपा सरकारांनी यासंदर्भात कायदा करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. धर्मांतरणाबाबत मुस्लीम युवकांद्वारे लव्ह जिहादचा वापर करण्यात येत आहे.

यासाठी जगातील मुस्लीम राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा येतो. मुस्लीम युवक ओळख लपविण्यासाठी खोटे हिंदू नाव धारण करतात आणि हिंदू मुलींना आपल्या प्रमपाशात ओढतात व त्या मुलीशी विवाह करतात. गरीब मुली या मुस्लीम युवकांच्या प्रेमपाशात अडकतात. लव्ह जिहादनंतर भारतात मुस्लिमांची संख्या वाढली असून हिंदूंची संख्या कमी झाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे असेही बोलल्या जात आहे की, आंतरधर्मीय विवाह करणे ही काही नवीन बाब नाही. जोधा-अकबर यांच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. बाजबहादूर-रूपमती यांची प्रेमकथा प्रसिद्ध आहे. चित्रपट अभिनेते आमिरखान यांची पत्नी किरण राव हीसुद्धा हिंदू आहे. अभिनेत्री रिना रॉय हिने पाकिस्तानी मुस्लिमांशी विवाह केला. सलीम खान यांच्या हिंदू पत्नीपासून अभिनेता सलमान खान यांचा जन्म झाला. रेडिओचे वृत्तनिवेदक अमीन सयानी यांची पत्नी रमा हिंदू होती. अमृता- प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांची प्रेमकथा प्रसिद्ध आहे. क्रिकेट खेळाडू अझरुद्दीन यांनी संगीता ब्रिजलानी सोबत लग्न केले आहे. आपल्या देशात प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे.

महाराष्ट्रातील आघाडी सरकारची कोंडी

महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार आहे. लव्ह जिहाद कायद्यावरून महाराष्ट्र सरकार कोंडीत सापडले आहे. या सरकारमध्ये शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे धर्मनिरपेक्ष पक्ष सहभागी आहेत. राज्यातील ठाकरे सरकारमधील काँग्रेसचे मंत्री असलम शेख यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात लव्ह जिहादविरुद्ध कोणताही कायदा करण्याची आवश्यकता नाही. उत्तर प्रदेश मधील योगी सरकारवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले की, जे सरकार त्यांचे अपयश लपविण्याचा प्रयत्न करतात तेच अशाप्रकारचे कायदे करीत असते. तथापि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र या संदर्भात अजूनपर्यंत कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

केंद्रीय चौकशी संस्था सक्रिय

राज्यात लव्ह जिहादला कोणत्या संस्था सहकार्य करीत आहे. आणि लव्ह जिहादला उत्तेजन कोण देत आहेत, याबद्दल केंद्रीय चौकशी संस्था तपास करीत आहेत. लव्ह जिहादला रोखण्यासाठी महाराष्ट्रातही कायदा बनविण्याची आवश्यकता आहे.

भाजपा शिवसेनेला घेरणार

लव्ह जिहादविरोधी कायद्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला घेरण्याची तयारी केलेली आहे. देशात लव्ह जिहादचे अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. केरळमध्ये भाजपाचे सरकार नाही, परंतु तेथेही ही समस्या आहे. जेव्हा लव्ह जिहादचे प्रकरण पुढे येतात तेव्हा या प्रकरणांना रोखणे हे सरकारचे कर्तव्य असते. या प्रकरणांना रोखण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लव्ह जिहादवरून शिवसेनेची चांगलीच कोंडी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आता भाषाच बदललेली आहे. काँग्रेसच्या दबावामुळे ते आता लव्ह जिहादबाबत कायदा करण्यास नकार देत आहेत. भाजपा आमदार राम कदम म्हणाले, लव्ह जिहादच्या नावावर महिलेवर अन्याय करणे आणि तिचा जीव घेणे याला शिवसेनेचा पाठिंबा आहे काय? सत्तेच्या लालसेपोटी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांना विसरली आहे, अशी टीकाही कदम यांनी केली. लव्ह जिहादबाबत काँग्रेस पक्षाने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करता येणार नाही.