narendra modi

. कोरोनाची लस जर मोफत हवी असेत तर भाजपाला निवणुकीत विजयी करा, असे म्हणजे जनतेच फसवणूक करणे होय. अशी टीका विरोधकांची भाजपावर केली आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी संगातात की, एक-दीड वर्षांपर्यंत कोणतीही लस उपलब्ध होणार नाही आणि दुसरीकडे मात्र भाजपाला विजयी करा अन कोरोनाची लस मोफत घ्या असे सांगत आहेत. पंतप्रधानांच्या बोलण्यामध्ये हा जो विरोधाभास आहे.

भारतीय जनता पार्टी  (BJP) देशातील जनतेला मूर्ख समजत आहे का? खोटी आश्वासने देऊन निवडणुकीत मते (Vote) मिळविण्याचा प्रयत्न फारसा उपयोगी पडणार नाही. जनता आता शहाणी झाली आहे. ते कोणत्याही खोट्या आश्वासनाला बळी पडणार नाही, (alse promise to provide free corona vaccine) हे भाजपाने समजून घेतले पाहिजे. बिहार विधानसभा निवडणूक प्राचारादरम्यान भाजपाने कोविड-१९ ची लस मोफत देण्याचे आश्वासन दिलेले आहे. मतदानाच्या बदल्यात लस हे आश्वासन जरा विचित्रच आहे. विरोधी पक्षांनी भाजपाच्या या आश्वासनावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस, राजद, सपा, भाकपसह विरोधी पक्षांनी भाजपावर टीका करताना म्हटले आहे की, संकटांना संधीत परावर्तित करा असे सांगता-सांगताच भाजपाने महामारीला निवडणुकीच्या संधीमध्ये बदलून टाकले आहे, ही खरं तर जनतेी फसवणूक आहे. असे विरोधकांनी म्हटले आहे. कोरोनाची लस जर मोफत हवी असेत तर भाजपाला निवणुकीत विजयी करा, असे म्हणजे जनतेच फसवणूक करणे होय. अशी टीका विरोधकांची भाजपावर केली आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी संगातात की, एक-दीड वर्षांपर्यंत कोणतीही लस उपलब्ध होणार नाही आणि दुसरीकडे मात्र भाजपाला विजयी करा अन कोरोनाची लस मोफत घ्या असे सांगत आहेत. पंतप्रधानांच्या बोलण्यामध्ये हा जो विरोधाभास आहे. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. बिहारी जनतेची केंद्र सरकार थट्टा करीत आहे. आज प्रत्येकाजवळ मोबाईल फोन आहे. लोक सोशल मिडियावर अॅक्टिव्ह आहेत. प्रत्येकालाच माहीत आहे की, अजूनपर्यंत कोरोनाची लस आलेली नाही.

अजूनही कोरोना लसीच्या जगभर चाचण्याच सुरु आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर लसीचे उत्पादन करण्यात येईल. परंतु याची खात्री मात्र देता येणार नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता केवळ मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टंन्सिंग ठेवणे हेच उपाय आहेत. कोरोनाचे संक्रमण सुरुच आहे. असे असताना भाजपा अशा प्रकारचे खोटे आश्वासन का देत आहेत? तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी घोषणा केली की, राज्यात कोविड-१९ लस आल्यानंतर राज्यातील सर्व जनतेला ती मोफत दिल्या जाईल. यासाठी राज्य सरकारला कितीही आर्थिक भुर्दंड सोसावा लागला तरी राज्य सरकार जनतेला ती लस मोफत देईल.

ही तर जनतेची फसवणूकच

भाजपाने हे जे आश्वासन दिलेले आहेत, त्यावरुन असे वाटते की, जणू काही कोरोना लस तयारच आहे. बिहार निवडणूक जिंकल्याबरोबर जनतेला कोविड-१९ लस दिल्या जाईल असे आश्वासन भाजपा नेते प्रचारदरम्यान देत आहेत. वस्तुस्थिती तर अशी आहे की, कोरोना लसीच्या चाचणीचा जो अहवाल आलेला आहे, तो फारसा आशादायक नाही. या लसीची चाचणी ब्रिटनमध्ये पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठात या लसीची निर्मिती सुरु असली तरी भारताने मात्र या लसीचे परीक्षण थांबविले आहे. या लसीचे योग्य परिणाम आल्यानंतरच भारतात ही लस दिल्या जाणार आहे.

अजूनपर्यंत तारीख निश्चित नाही

ही लस केव्हा येणार याबद्दलची तारीख मात्र अजूनपर्यंत निश्चित झालेली नाही. ही लस तयार करणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने घोषणा केली की, लसीचे परीक्षण करताना कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला ही लस टोचण्यात आली होती. परंतु त्या कर्मचाऱ्याच्या पाठीच्या हाडावर सूज आल्यामुळे लसीचे परीक्षण थांबविण्यात आले आहे. योग्य परिणाम आल्यानंतरच सरकार या लसीच्या उत्पादनाला परवानगी देईल.