डेल्टा आणि ओमायक्रॉन दोन्ही एकाच वेळी संक्रमित होऊ शकतात : न्युबर्ग पॅनलिस्टचे मत

ICMRच्या सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरोलॉजीचे माजी संचालक तसेच वेल्लोर येथील CMC मधील क्लिनिकल व्हायरोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागांचे माजी प्रमुख तसेच निवृत्ता प्राध्यापक डॉ. टी जेकब जॉन यांनी मुलांचे लसीकरण तातडीने करण्यावर भर दिला.

  मुंबई : लहान मुलांचे लसीकरण, सेम शॉट बूस्टर डोसेस आणि RT-PCR चाचण्या हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स पॅनलच्या ‘व्हेरीएंट्स, वॅक्सिन्स अँड अस’ या चर्चेदरम्यान, व्हायरोलॉजिस्ट आणि आरोग्यतज्ज्ञांनी केले. आपण कोविडपूर्व युगात पुन्हा प्रवेश करण्याची शक्यता नजिकच्या भविष्यकाळात तरी दिसत नाही. उलट आपल्याला आगामी काळात डेल्टा व ओमायक्रॉन यांच्यासह जगावे लागणार आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. हे दोन्ही व्हेरीएंट्स एकाच वेळी संक्रमित (को-सर्क्युलेट) होत राहतील, असेही ते म्हणाले.

  ICMRच्या सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरोलॉजीचे माजी संचालक तसेच वेल्लोर येथील CMC मधील क्लिनिकल व्हायरोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागांचे माजी प्रमुख तसेच निवृत्ता प्राध्यापक डॉ. टी जेकब जॉन यांनी मुलांचे लसीकरण तातडीने करण्यावर भर दिला. यामुळे विषाणूचे संक्रमण आणि म्युटेशन्सद्वारे होणारा नवीन व्हेरीएंट्सचा उदय किमान स्तरावर राखता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

  DICMRच्या सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरोलॉजीचे माजी संचालक तसेच वेल्लोर येथील CMC मधील क्लिनिकल व्हायरोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागांचे माजी प्रमुख तसेच निवृत्ता प्राध्यापक डॉ. टी जेकब जॉन यांनी मुलांचे लसीकरण तातडीने करण्यावर भर दिला; ते म्हणाले, “कोवॅक्सिनसारख्या सुरक्षित व प्रभावी लसींद्वारे लहान मुलांचे लसीकरण करण्याचा मी खंदा पुरस्कर्ता आहे. अगदी सामान्य मुलांमध्येही आजार होण्याची/मृत्यूची शक्यता कमी असली, तरी शून्य नाही. कोविड प्रादुर्भावानंतर त्यांना मल्टि-सिस्टम इनफ्लेमेटरी सिण्ड्रोम (MIS) आणि मधुमेह होण्याचा धोका आहे. — ज्या मुलांना आधीपासून काही गंभीर स्वरूपाचे आजार आहेत त्यांना कोविडचा धोका अधिक आहे. हे सगळे लसीकरणाने टाळता येऊ शकते. मुलांचे लसीकरण केले नाही, तर ते विषाणूच्या साठ्याप्रमाणे काम करतील आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव मुलांना सहज होऊ शकतो हे आपल्याला माहीत आहे.

  ते पुढे म्हणाले, “ओमायक्रॉनचे दोन लक्षणीय गुणधर्म आहेत. एक म्हणजे त्याची संक्रमणक्षमता खूपच अधिक आहे, डेल्टाच्या तुलनेत ती बरीच अधिक आहे आणि भूतकाळात झालेले प्रादुर्भाव व लसीकरणांमुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीला भेदण्याची प्रवृत्ती या व्हेरीएंटमध्ये दिसून येते. स्पाइक प्रोटीन जीनवरील अनेक म्युटेशन्समधून हे गुणधर्म ओमायक्रॉनमध्ये आले आहेत.

  डेल्टाची स्पाइक प्रोटिनच्या रिसेप्टर-बाइंडिंग क्षेत्रात दोन म्युटेशन्स होतात, तर ओमायक्रॉनची 15 होतात. यामुळे संरक्षणासाठी आवश्यक अशा अँटिबॉडी बंधांना तो भेदू शकतो. सर्व उपलब्ध लसीकरणांद्वारे (mRNA किंवा ॲडेनोव्हायरस-व्हेक्टर्ड) मूळ विषाणूविरोधात निर्माण केले जाणारे स्पाइक संरक्षण ओमायक्रॉनविरोधात तुलनेने निष्प्रभ ठरू शकते. मात्र, अलीकडील अनुभवातून असे दिसून आले आहे की, बूस्टरद्वारे निर्माण होणारा अँटिबॉडींचा उच्च स्तर संरक्षण देऊ शकतो, विशेषत: रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासेल एवढ्या तीव्रतेचा आजार टाळला जाऊ शकतो.”

  NIMHANS मधील माजी प्राध्यापक तसेच कर्नाटक सरकारच्या SARS-CoV-2 जिनोमिक कन्फर्मेशनचे केंद्रीय अधिकारी डॉ. V. रवि म्हणाले, “अँटिजेन चाचण्या, सेल्फ-टेस्ट किट्स लक्षणे दाखवणाऱ्या रुग्णांमध्ये खात्रीशीर निष्पत्ती देतात; मात्र लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांमध्ये RT-PCR चाचणी करणेच अत्यावश्यक आहे. विशेषत: रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना तर RT-PCR चाचणीला पर्याय नाही.” ओमायक्रॉनची लागण संपूर्ण लसीकृत रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात होत आहे असे ताज्या आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे आपण सावधगिरी बाळगणेच आपल्या हिताचे आहे.

  ते पुढे म्हणाले, “कोविड-19 लसीकरण आपल्याला संपूर्ण प्रतिकारशक्ती व संरक्षण पुरवेल अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. या लशींचे प्राथमिक कार्य तीव्र स्वरूपाचा आजार व मृत्यू टाळणे हेच आहे. नेजल वॅक्सिन्सकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या लशी बाजारात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात संरक्षण पुरवतील अशी खात्री मला वाटते.”

  दोन वेगवेगळ्या लशींचे मिश्रण करण्याबद्दल ते म्हणाले, “भारतात लशींच्या मिश्रणाबद्दल स्पष्ट डेटा उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने आधी घेतलेल्या लशीचा डोसच बूस्टर म्हणून देण्याचे धोरण आहे.”

  अपोलो हॉस्पिटलमधील इन्फेक्शिअस डिसीजेस आणि ट्रॉपिकल मेडिसिनचे कन्सल्टण्ट डॉ. व्ही. रामसुब्रमणियन म्हणाले, “उच्च तापाची तक्रार घेऊन येणाऱ्या लहान मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. डेल्टा व्हेरीएंटमध्ये प्रादुर्भाव होणाऱ्यांचे वय बरेच कमी होते पण या व्हेरीएंटमध्ये ते आणखी कमी झाल्याचे दिसून येत आहे. ५ ते ६ वर्षाच्या मुलांमध्ये १०२ ते १०३ डिग्री तापाची उदाहणे खूप दिसत आहे. रोचक बाब म्हणजे त्यांचा ताप २४ तासांत किंवा ४ ते ५ दिवसांत सामान्य स्तरावर येतो. हे सगळे रुग्ण लक्षणे दाखवणारे आहेत आणि ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. तापाशिवाय या रुग्णांना तीव्र स्वरूपाची घसादुखी जाणवत आहे. यातील बहुतेक जणांना अन्न गिळताना त्रास होत आहे. गेल्या काही आठवड्यांत उच्च ताप आणि घसादुखी यांमुळे अँटिबॉडीजचे ग्रहण वाढले आहे असे आमचे निरीक्षण आहे.”

  न्युबर्ग डायग्नोस्टिक्सच्या तांत्रिक संचालक आणि प्रमुख मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. सरण्या नारायण म्हणाल्या, “टेस्ट पॉझिटिविटी रेटमध्ये (TPR) २८ डिसेंबर, २०२१ पासून वाढ होत असल्याचे निरीक्षण आमच्या चेन्नईतील लॅबमध्ये आहे. डिसेंबर २५ आणि जानेवारी १० या काळात झालेल्या १९,५५८ कोविड-१९ चाचण्यांमध्ये TPR २७.२ टक्के होता. चाचणी पॉझिटिव येणाऱ्या रुग्णांमध्ये ११ टक्के १८ वर्षांखालील वयगोटातील होते. १ ते १० वयोगटामध्येही आता लागण होताना दिसत आहे. एक वर्षाहून कमी वयाच्या दोन बाळांना लागण झालेली आहे.

  आमच्या बेंगळुरू येथील लॅबमधील साप्ताहिक TPR ५.३ वरून २०.६ टक्के झाला आहे. आमच्या चेन्नई लॅबमध्ये डिसेंबर २८ ते जानेवारी ११ या काळात साप्तिहिक TPR ११.१ टक्क्यांवरून ३४.७ टक्क्यांवर गेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या केरळमधील लॅबमध्ये साप्ताहिक TPR ८.४१ टक्के झाला आहे. गेल्या दोन दिवसांत येथील दैनंदिन TPRमध्येही वाढ होत आहे. हैदराबादमध्ये दैनंदिन TPR ४५ टक्के आहे, तर मुंबईत (महाराष्ट्र) तो ४० टक्के आहे.”

  ओमायक्रॉन पॉझिटिविटीबद्दल त्या म्हणाल्या, “कर्नाटकात ५०% पॉझिटिविटी दर आहे, तर मुंबईत ४०% आहे. हैदराबादमध्ये पॉझिटिविटीचा दर ४५% आणि तमीळनाडूत ८०-८५% आहे.”

  प्रत्येकाने डबल मास्कसाारखे वैयक्तिक प्रतिबंधाचे उपाय काटेकोरपणे अवलंबावेत, हाताच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, घरात उत्तम वायूविजन राहील याची काळजी घ्यावी, तसेच गर्दी व अनावश्यक प्रवास टाळावेत असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.