लस खरेदीचा ब्राझील पॅटर्न

ब्राझीलमध्ये अगोदरच कोरोनाच्या हाताळणीवरून सरकार अडचणीत आले होते. आता लस खरेदी गैरव्यवहारामुळे पुन्हा सरकार अडचणीत आले असले, तरी त्यांचा तो आता अंतर्गत प्रश्‍न राहिलेला नाही. त्याचे कारण ज्या कंपनीच्या लस खरेदीवरून ब्राझीलमध्ये वाद सुरू आहेत, ती कंपनी भारतीय आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हैदराबादेत जाऊन कंपनीला भेट दिली होती. या लसीच्या परिणामकारकतेबाबतही असाच संशय घेतला
    गेला होता. आता जागतिक आरोग्य संघटनेकडून परवाना देण्याच्या प्रक्रियेस मान्यता देणे हा एक मोठा बाद मिटत आहे. कोव्हॅक्‍्सीन बाजारात आल्यापासून वाद आहेत आणि तो अजून संपलेला नाही. गेल्या वर्षी डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात भोपाळच्या एका खासगी रुग्णालयात ज्याच्यावर क्लिनिकल ट्रायल चाचण्या घेण्यात आल्या, त्या स्वयंसेवकाचे लस दिल्यानंतर दहा दिवसांनी निधन झाले. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूच्या कारणाबद्दल शंका व्यक्‍त केली आहे. भारत बायोटेक कंपनीने विषबाधेमुळे मृत्यू होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली होती. पोलिस अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहेत. असे असताना आता ब्राझीलमधील लस खरेदीतील गैरव्यवहारामुळे भारत बायोटेक वादात सापडली आहे.

    ब्राझीलमध्ये अगोदरच कोरोनाच्या हाताळणीवरून सरकार अडचणीत आले होते. आता लस खरेदी गैरव्यवहारामुळे पुन्हा सरकार
    अडचणीत आले असले, तरी त्यांचा तो आता अंतर्गत प्रश्‍न राहिलेला नाही. त्याचे कारण ज्या कंपनीच्या लस खरेदीवरून ब्राझीलमध्ये वाद
    सुरू आहेत, ती कंपनी भारतीय आहे. लस खरेदीतील गैरव्यवहारावरून अडचणीत आलेल्या ब्राझील सरकारने भारत एकमेव भारतीय बनावटीची आणि स्वदेशी म्हणून नावाजलेली भारत बायोटेक ही कंपनी लसीच्या चाचण्यांपासून वादात अडकली आहे. लसीच्या तीन क्लिनिकल ट्रायल होण्याच्या आत भारत सरकारने या लसींच्या वापराला मंजुरी दिली होती. त्यामुळे त्या वेळीही वाद झाला होता.

    बायोटेकसोबतचा 32 कोटी डॉलर्सचा लस खरेदी करार स्थगित केला आहे. ब्राझीलने भारत बायोटेककडून कोव्हॅक्‍सीनचे दोन कोटी डोस
    खरेदी करण्यासाठी करार केला होता. या करारमुळे भ्रष्टाचाराच्या चर्चेला तोंड फुटले असून, राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो वादात
    सापडण्याची चिन्हे आहेत.कोरोनाविषयक नियमांना खुद्द अध्यक्ष तिलांजली देत असल्याने नागरिकही या नियमांना गांभीर्याने
    घेत नव्हते. त्यामुळे बाधितांची आणि मृत्यूंची संख्या वाढली होती. जगभरातून टीका होऊ लागल्याने कोरोनाविषयक नियमांची
    अंमलबजावणी आणि लसीकरणावर ब्राझील सरकारने भर दिला. कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी ब्राझील सरकारने भारत बायोटेकसोबत कोव्हॅक्‍सीन खरेदीसंदर्भात एक करार केला. ब्राझील सरकार दोन कोटी डोस खरेदी करणार असून, 32 कोटी डॉलर्सचा हा करार आहे. कोरोना परिस्थिती हाताळणीवरून आधीच टीकेचे धनी ठरलेले राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो या या लस खरेदी करारामुळे वादात सापडले आहेत. ब्राझीलमधील ‘व्हिसलब्लोअर’नी या करारावरून सरकारला लक्ष्य केले. भारत बायोटेकसोबत करण्यात आलेल्या लस खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, याची माहिती बोल्सोनारो यांनाही असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. व्हिसल ब्लोअरकडून उचलण्यात आलेल्या मुक्ष्यावरून ब्राझीलमध्य सरकारविरोधात टीकेचा सूर उमटत आहे. सरकारने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. .भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले; मात्र व्हिसलब्लोअरचे समाधान करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशीकेली जाणार असून, चौकशी होईपर्यंत लस खरेदी करार स्थगित करण्यात आला आहे. केंद्रीय ‘महानियंत्रकांनी केलेल्या प्राथमिक चौकशी या व्यवहारात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे; मात्र तरीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आरोग्य मंत्रालयाने हा लस खरेदी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.