पण लक्षात कोण घेतो : तिसऱ्या लाटेची प्रतीक्षा नको; आरोग्य सेवेत आलेली ही शिथिलता करा दूर

कोरोनाच्या संहारावरदेखील राजकारण झाले. आता कोपरापासून ढोपरापर्यंत हात जोडून विनंती आहे की, कोरोनावर कुणी राजकारण करू नये. नव्या आरोग्य सुविधा उभ्या करण्याची आज नितांत गरज आहे. डिसेंबर २०१९ पासून जे भोग आम्ही भोगले व आताही भोगत आहोत. त्यांची कुठलीच पूर्वकल्पना आम्हाला नव्हती व असण्याचे कुठले कारण नव्हते. महामारीत लाखो लोकांनी आपले जीव गमावले आहेत.

  कोरोनाने सरड्यासारखे रंग बदलवून जनजीवन बेरंग केले आहे. भस्मासुरासारखा तो निरपराधांच्या पाठीशी लागला अन देशांतर्गत केंद्रासह इतर राज्य सरकारे हतबळ होऊन त्याचे तांडव पाहत मुक्‍यानेच उभे होते. त्याला मुळासकट उपटून टाकण्याचे सामर्थ्य कुण्या सरकारच्या आरोग्य सेवेत दिसले नाही. सरकार नावाची व्यवस्था संकट काळात किती कमकुवत असते हा भंडाफोड कोरोनानेच केला.

  कोरोनाच्या संहारावरदेखील राजकारण झाले. आता कोपरापासून ढोपरापर्यंत हात जोडून विनंती आहे की, कोरोनावर कुणी राजकारण करू नये. नव्या आरोग्य सुविधा उभ्या करण्याची आज नितांत गरज आहे. डिसेंबर २०१९ पासून जे भोग आम्ही भोगले व आताही भोगत आहोत. त्यांची कुठलीच पूर्वकल्पना आम्हाला नव्हती व असण्याचे कुठले कारण नव्हते. महामारीत लाखो लोकांनी आपले जीव गमावले आहेत.

  रुग्णालयात अपूर्ण व्यवस्थे अभावी रुग्णांची होत असलेली व झालेली हेळसांड अक्षम्य होती व अजूनही आहे. ऑक्सिजन, जीवनरक्षक औषधींचा अभाव, सारे काही मन हेलावून टाकणारे होते व आहे. आजही हजारो साक्षात मृत्यूशी झुंज देत आहेत. आता या स्थितीला आम्हीच जबाबदार आहोत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आम्ही धडा घेऊन कामाला लागलो असतो तर एवढे होरपळून निघण्याची पाळी आमच्यावर आलीच नसती.

  जगभरातील डॉक्टर्स ओरडून, ओरडून सांगत होते की, दुसरी लाट येणार पण आम्ही नेहमीसारखे गाफीलच राहलो. नेहमीचेच धंदे करण्यात आम्ही गुरफटून गेलो होतो. नित्याच्या निवडणुकी अन सेवेतील नित्याचा कुंभ यात व्यस्त राहण्याची आमची नित्याची सवय अचूक हेरून कोरोनाने आमच्यावर दुसरे आक्रमण केले. २८० कोटी लोकांना आपल्या कवेत शिथिलता घेऊन कोरोनाने भिरकावले. यापैकी ३ लाख २९ हजारांना आपल्या प्राणास मुकावे लागले.

  नवी रुग्णालये उभी करा

  आता तर दररोज नवे रुग्ण मेंदू बधिर करीत आहेत. ३० मे ची स्थिती तपासली तर लाख नवे रुग्ण व ३ हजारांपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झोपेचे खोबरे करणारा भाग ठरला. मृत्यूचे आकडे तंतोतंत आहेत असा भागच नसल्याची कुजबुज बरेच काही सांगून गेली. टेस्ट कमी झाल्यामुळे गावखेड्यातील प्रकरणे तशीच खितपत पडून आहेत. सारा नजारा विदारक असताना डॉक्टरांनी तिसर्‍या व चौथ्या लाटेची शक्‍यता वर्तवली आहे. आता तिसरी, चौथी लाट येवो वा न येवो पण आम्हाला आता त्यांचा सामना करण्याच्या तयारीला लागावे लागेल. १३५ कोटी जनसंख्या असलेल्या भारताच्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरला कोरोनाने हवेतच भिरकावले आहे.

  सरकारांची अग्निपरीक्षा

  देशांतर्गत सर्वच राज्यांमध्ये येणाऱ्या निवडणुकीत जनता कोरोनाने उद्भवलेल्या स्थितीचे आकलन करेल. सरकारांची सध्याची स्थिती अतिशय भयावह आहे. त्यांना आपली व्यवस्था सुधारून पुढील कामाचे आजच नियोजन करावे लागेल. जीवनरक्षक औषधींचे, ऑक्सिजनचे नियोजन करून बेडची संख्या वाढवावी लागेल. काही नवी रुग्णालये लवकर उभी कशी होतील याकडे लक्ष पुरवावे लागेल. आरोग्य सेवेत आलेली शिथिलता दूर करण्याचे प्रयत्न करावे करावे लागतील. त्यातील भ्रष्टाचार खणून काढावा लागेल.

  ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी इंडेक्‍सनुसार आमच्या देशात हेल्थ केअर ॲक्सेसची रेटिंग १४९ एवढी राहली आहे. तसेच इन्फ्राची सुलभता १२४ व्या स्थानावर आहे. हा भागच चिंता वाढविणारा आहे. आधीच कोरोनाने आपली भयावहता दर्शवली आहे. आता सत्ताधारी विरोधक असा भागच असू नये. एकमेका साहाय्य करू तत्त्वाने आम्हाला चालावे लागेल. आरोग्य सुविधा उभ्या कराव्या लागतील. सरकारला आपल्या अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ बसवावा लागेल.

  But who cares do not wait for the third wave Get rid of this laxity in health care