चीनसोबत चर्चेनंतरही तणाव कायम, मागे हटण्यास दोन्ही देशांचा नकार

लडाख सीमेवर गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीन दरम्यान जो तणाव सुरु आहे, तो संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्या कमांडर स्तरावर जी चर्चा झाली, त्यामध्ये कोणीही आपले सैन्य मागे घेण्यास

 लडाख सीमेवर गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीन दरम्यान जो तणाव सुरु आहे, तो संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्या कमांडर स्तरावर जी चर्चा झाली, त्यामध्ये कोणीही आपले सैन्य मागे घेण्यास तयार नाहीत. ५ तासाच्या चर्चेनंतरही तणाव कायम आहे. आम्ही इंचभरही मागे हटणा नाही, असे भारताने चीनला बजावले आहे, चीननेच मागे हटले पाहिजे, अशी भूमिका भारताने घेतलेली आहे. गलवान घाटी, पैनांग त्सो आणि गोगरामध्ये पूर्वीसारखीच परिस्थिती असावी, अशी भारताची भूमिका आहे. चीन या भागात जे मोठ्या प्रमाणावर सैन्य आहे, ते त्यांनी मागे घ्यावे, भारताने आपल्या सीमेमध्ये जी निर्माळ कार्य केलेली आहेत, त्याबद्दल चीनला विरोध करण्याची आवश्यकता नाही, अशी भारताची भूमिका आहे. उभय देशामध्ये ही चर्चा चुशूल सेक्टरमध्ये चीनच्या सीमेमध्ये नियंत्रण रेषेपासून २० किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी झाली. या चर्चेत भारतीय सेनेकडून लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह तर मिलिट्री कमांडर लियूगिन यांनी सहभाग घेतला. भारताने आपले रस्ते बांधकाम थांबवावे असे चीनने भारताला सांगितले, परंतु भारताने त्यासाठी मागे हटणार नाह, असे स्पष्ट केले, भारतीय सेना पैगांग झीलला लागून असलेल्या ८ पहाडी जिल्ह्यात नेहमीप्रमाणे आपली गस्त सुरु ठेवू इच्छिते, पंरतु चीनला ते मान्य नाही, चीनी सैनिक भारतीय सेनेच्या या गस्तीला विरोध करीत आहेत. भारतीय सेना चीनी सैन्याला फिंगर ४ च्या पुढे येण्यास मज्जाव करीत आहे. चीनने एलएसीवर मोठ्या संख्येने त्यांचे सैनिक तैनात केले आहेत. चीनी लढाऊ विमानांनीही सीमाभागात उड्डाण करुन भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रत्युत्तरादाखल भारतानेही आपल्या बोफोर्स तोफा पुढे नेवून तैणात केलेल्या आहेत. भारताकडून होणाऱ्या रस्ते बांधणी आणि पुलांच्या बांधकामाला चीनी सैनिक विरोध करीत आहे. या भागाला वादग्रस्त विभाग समजतात