सीबीआय तपास, केंद्राची गुगली

  • बिहार पोलीसांनी आमच्या तपासाआड येऊ नये असे त्यांना मुंबई पोलीसांनी बजावले. बिहार पोलीसचे आयपीएस विनय तिवारी तपासासाठी मुंबईत डेरेदाखल होताच त्यांच्या हातावर ठप्पा मारुन त्यांना क्वारंटाईनला पाठविले. बिहार डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचेही कुणी ऐकले नाही. प्रकरण आमच्या कार्यक्षेत्रातील असल्यामुळे मधात अन्य लुडबूड नको असे मुंबई पोलीसांनी स्पष्ट केले.

देशाच्या दोन राज्यांमध्ये मनमुटाव असणे अयोग्य आहे. ते शुभसंकेत नाहीत. सुशांत प्रकरणात बिहार व महाराष्ट्र या दोन रज्यांदरम्यान पोलिस तपासाबाबत कलगीतुरा रंगला आहे. यातून केंद्र सरकारने सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला. सुशांत हा बॉलिवुडचा अभिनेता पण तो मूळ बिहार निवासी होता. त्याचे मृत्यूकारण एक कोडेच ठरले आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस मुंबईत पोहोचले पण त्यांना मुंबई पोलीसांना कुठलेही सहकार्य केले नाही. बिहार पोलीसांनी आमच्या तपासाआड येऊ नये असे त्यांना मुंबई पोलीसांनी बजावले. बिहार पोलीसचे आयपीएस विनय तिवारी तपासासाठी मुंबईत डेरेदाखल होताच त्यांच्या हातावर ठप्पा मारुन त्यांना क्वारंटाईनला पाठविले. बिहार डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचेही कुणी ऐकले नाही. प्रकरण आमच्या कार्यक्षेत्रातील असल्यामुळे मधात अन्य लुडबूड नको असे मुंबई पोलीसांनी स्पष्ट केले. 

मुंबई पोलीस तपास करीत असतांना बिहार पोलीसांनी झिरो एएफआयआर नोंदविल्यानंतर स्वतः तपास करण्ययाचे काम सुरु केले ते अयोग्य आहे. सुशांत राजपूत यांच्या वडिलांनी मुंबई पोलिस सुयोग्य पद्धतीने प्रकरणाचा तपास करीत नसल्याची तक्रार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे केली होती. त्यावर असंतोष व्यक्त केल्यामुळे नितीशकुमारांनी सीबीआय चौकशीची मागणी पुढे कील. नितीशांच्या मागणीनुसार केंद्राने सीबीआय चौकशीची घोषणा केली. या प्रकरणी बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईनला पाठविल्यामुळे सुप्रिम कोर्टाने महाराष्ट्र सरकरला चांगलेच ठोकून काढले. कोर्ट म्हणाले, या प्रकरणाचा तपास प्रोफेशनल पद्धतीने होण्यासाठी काही सुनिश्चित करण्याच्या सूचनाही सुकोने केल्यात. सुशांत यांच्या मृत्यूबाबत सत्य बाहेर आले पाहिजे. 

महाराष्ट्र सरकार अडचणीत 

केंद्राने सुशांत प्रकरण सीबीआयकजे वर्ग केल्यामुळे महाराष्ट्र सरकार अडचणीत आले आहे. बिहार-महाराष्ट्राचा वाद बघून केंद्र सरकारने गुगली टाकली आहे. सुशांत बॉलिवूडचा अभिनेता पण मुंबईत त्याचे गॉडफादर कोणीच नव्हते. त्याच्याकडून अनेक चित्रपट काढून घेतल्या जात होते. त्याला धमकावल्या जात होते. या धमक्यांमुळे त्याने एकाच महिन्यात ५० सिमकार्ड बदलले. सुशांतवर एवढा दबाव होता की त्याने मग जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. दबाव टाकणारे कोण हे आता पुढे आले पाहिजे. सुशांत यांच्या मृत्यूपूर्वी त्याची व्यवस्थापिका दिशा सालियानने इमारतीवरून उडी घेवून आत्महत्या केली होती. सुशांत मृत्यू प्रकरणात त्याची प्रियसी रिया चक्रवर्ती संशयाच्या घेऱ्यात आहे. महाराष्ट्राच्या एका युवा मंत्र्याचे नाववही या प्रकरणी चर्चेत आहे. मुंबई पोलीसांनी बिहार पोलीसांना थांबविले पण ते सीबीआयला थोपवू शकणार नाहीत हे तेवढेच खरे. 

बिहारला झुकते माप 

बिहार विधानसभेच्या निवडणुकी चालू वर्षाच्या अखेरीस आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष जदयू हा एनडीएचा घटक पक्ष आहे. बिहारमध्ये भाजप-जदयू सरकार आहे. केंद्राने बिहारच्या मागणीकडे विशेष लक्ष देणे. हा भाग समजण्यासारखा आहे. नितीश कुमारांनी मारस्टर स्ट्रोक खेळूम महाराष्ट्र सरकारसमोर अडचण उभी केली आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे बिहारचे निवासी आहेत व त्यांनी सुशांत आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उभे केले. महाराष्ट्र भाजपनेही हे प्रकरण उकरणे सुरु केले आहे. महाराष्ट्राच्या महाआघाडी सरकारसाठी प्रकरण डोकेदुखी ठरले आहे हे तेवढेच खरे.