पवारांच्या चालीने चक्रावले फडणवीस

महाराष्ट्रात केवळ पवारच एकटे मराठ्यांचे नेते आहेत असा भागच नाही. राज्यात मराठा समाजाचे इतरही नेते आहेतच अन ते एक ना अनेक पक्षात विखूरले आहेत. पण महाराष्ट्राचे राजकारण मात्र शरद पवार या

 महाराष्ट्रात केवळ पवारच एकटे मराठ्यांचे नेते आहेत असा भागच नाही. राज्यात मराठा समाजाचे इतरही नेते आहेतच अन ते एक ना अनेक पक्षात विखूरले  आहेत. पण महाराष्ट्राचे राजकारण मात्र शरद पवार या माराठा नेत्याच्या अवतीभोवती फिरत आले व आहे. स्व. यशवंतराव चव्हाणांसारख्या बुलंद नेत्याचा मानसपूत्र अशी ओळख निर्माण करणाऱ्या शरद पवारांनी राज्यात अनेकांना घडविले व संपविले. आधी समाजवादी तर आता राष्ट्रवादी काँग्रेसची उभारणी करुन त्यांना राज्यात काँग्रेसला वेळोवेळी दो फाड केले. पवारांची संगत करणारे नेते मूळचे काँग्रेसी पण नंतर मात्र शरद पवार बांधतील तोरण तेच त्यांचे धोरण असा भाग होत गेला. अत्यंत दूरदृष्टी असलेले शरद पवार महाराष्ट्रात सोडून देशांतर्गत मात्र आपले मजबूत स्थान निर्माण करु शकले नसल्यामुळे ते प्रादेशिक स्तरावरच राहिले. कुशल रणनिती आखून त्यानी वेळोवेळी राज्याची सत्ता आपल्या हाती एकवटली. पवारांच्या पोटात जे  आहेत ते ओठात आहे यावर मात्र कुणीच शिक्कामोर्तब करु शकले नाही. त्यांचे राजकारण चकित करणारे असते. ते कुणासोबत संगत करतील व कुणासोबत नाही हे ठरलेले नसते. वेळेप्रसंगाप्रमाणे त्यांचे राजकारण बदलतांना दिसले. पवार उच्चप्रतिचे राजकीय खेळाडू आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ज्ञात आहे. मोदीपेक्षाही पवारांचा राजकारणातला अनुभव दांडगा आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवारांनी काँग्रेसच्या वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून ते मुख्यमंत्री झाले होते. मग नंतर कधी केंद्रात कॅबिनेट तर राज्यात मुख्यमंत्री असा त्यांचा सिलसिला जारी राहिला. महाराष्ट्रात जेव्हा सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा शरद पवार केंन्द्रात मंत्री होते. पण १९९३ च्या सिरियल बॉम्बस्फोटानंतर ते पुन्हा राज्यात परतले. त्यांनी विस्कटलेली स्थिती मग पूर्वपदावर आणली.

आता राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल परवा म्हटले की २ वर्षांपूर्वी राज्यात भाजप व राष्ट्रवादीचे सरकार आकारास आले असते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीला सोबत घेत असाल तर शिवसेनेलाही सोबत घ्यावे लागेल असे सांगितले होते. तात्कालिन भाजपाध्यक्ष अमित शाह यांचाही तसाच विचार होता. पण आम्ही राष्ट्रवादीला नकार देत शिवसेनेला जवळ केले असे फडणवीस म्हणाले. नंतर राष्ट्रवादीने आमच्या संदर्भात आपल्या भूमिकेत बदल केला. 

भारी तर राष्ट्रवादीच पडणार 

आता देवेंद्र फडणवीस यांचा दावा काहीही असला तरी त्यांची सत्ता आली असती तर राष्ट्रवादीचे भाजपाला भारली ठरली असती. नथनी पेक्षा मोती जड झाला असता हे तेवढेच खरे. आजही महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा आहे. महाआघाडीचे सूत्रसंचालन पडद्यामागे पवारांकडेच आहे हे लपविता येणार नाही. तसाच भाग भाजप-राष्ट्रवादी सरकारमध्येही झाला असता. पवार हेच पॉवरफूल असल्यामुळे सत्ता त्यांच्या आस-पास रेंगाळली असती भलेही मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस असते. ते नावापुरते मुख्यमंत्री असते अन पॉवर पवारांकडे असता हे तेवढेच खरे.