परस्पर विरोधी घोषणांमुळे भ्रमाची स्थिती, अनलॉकला सरकारचा लॉक

आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन १८ जिल्ह्यांत लॉकडाऊन हटविण्याची घोषणा केली होती. परंतु, नंतर नागपूर मुक्कामी मात्र संपूर्ण राज्यात अनलॉकचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर मोहोर लागणे बाकी असल्याचे ते म्हणाले. यावर अंतिम निर्णय उद्धव ठाकरे करतील हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

  राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेच्या महाआघाडी सरकारमध्ये ताळमेळच उरला नाही. सरकार चालविण्यासाठी समन्वयाची गरज असते. परंतु, सरकारमध्ये त्याचाच अभाव आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही हे वेळोवेळी स्पष्ट दिसत आहे. तिन्ही पक्षात सरकारने लोकप्रिय निर्णय घेतल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. त्या निर्णयाला आम्ही कसे घेतले हे दर्शविण्याचा प्रयत्न तिन्ही पक्ष करतात तेव्हा त्या निर्णयाचाच गोंधळ उडतो. शेवटी सरकारला आपल्या निर्णयापासून घुमजाव करावे लागते व स्थिती हास्यास्पद होते. काल परवा असेच घडले.

  आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन १८ जिल्ह्यांत लॉकडाऊन हटविण्याची घोषणा केली होती. परंतु, नंतर नागपूर मुक्कामी मात्र संपूर्ण राज्यात अनलॉकचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर मोहोर लागणे बाकी असल्याचे ते म्हणाले. यावर अंतिम निर्णय उद्धव ठाकरे करतील हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

  वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर काहीच वेळात माहिती विभागाकडून सांगण्यात आले की, अजूनही कोरोना संक्रमण कायम असल्यामुळे राज्यात कुठेही लॉकडाऊन हटविले नाही. प्रतिबंध हटविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. आता यातून सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले, वडेट्टीवारांनी घोषणा करण्याची अतीव घाई केली. ती मग त्यांच्या अंगलट आली.

  वडेट्टीवारांचा खुलासा

  आपत्ती निवारणमंत्री विजय वडेट्टीवर म्हणाले की, यासंदर्भात मी कुठली घोषणा केली नाही. प्रतिबंध हटविण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्कालिक मंजुरी दिली आहे . आता ते यासंदर्भात घोषणा करतील असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मुंबईत मी जे बोललो ते वेगळ्या पद्धतीने प्रकाशित झाले. मी तर केवळ मदत व पुनर्वसनमंत्री या नात्याने मीडियाला काही माहिती दिली होती, असेही त्यांनी सांगितले . राज्यात अनलॉक ५ साठी तत्त्वत मान्यता मिळाली असे स्पष्ट करून ते म्हणाले की, यासंदर्भात निर्णय उद्धव ठाकरेच घेतील.

  विरोधकांनी धरले धारेवर

  अनलॉक संदर्भात परस्परविरोधी वक्‍तव्य येताच विरोधक सरकारवर तुटून पडलेत. सरकार राज्यात भ्रमाची स्थिती निर्माण करीत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, घोषणा करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवावा. ते म्हणाले की, काय बंद अन काय सुरू, कुठे अन कुठपर्यंत, पत्रकार परिषद की प्रेस रिलीज, अपरिपक्वता का श्रेयवाद हेसुद्धा आता स्पष्ट झाले पाहिजे. भाजपाचे नेते आशिष शेलार म्हणाले की, श्रेय घेण्याच्या नादात हा तमाशा आहे.

  कोण काय म्हणाले?

  वडेट्टीवार म्हणाले की, ५ टक्के सकारात्मक रेट व ७५ टक्केपेक्षा जास्त ऑक्सिजन बेडखाली असणाऱ्या जिल्ह्याला अनलॉक केले गेले. अशा जिल्ह्यात रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकाने व रेल्वे सुरू होतील. हा नियम शुक्रवारपासूनच लागू होईल. या विपरीत सरकारने स्पष्ट केले की, कोरोना संक्रमण कायम असल्यामुळे कुठलेच बंधने हटविले नाहीत. “ब्रेक द चेन’ अंतर्गत काही कठोर प्रतिबंध सैल करण्याचा सरकारचा मानस आहे. यासंदर्भात सखोल माहिती शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाईल.

  Confusionary state of affairs due to conflicting declarations government lock on unlock