sharad pwar

'शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये राहुल गांधीबाबत असे म्हटले आहे की, राहुल गांधींमध्ये 'सातत्याचा अभाव आहे. राहुल गांधी संसदेचे अधिवेशन सुरू असताना विदेशात सुटीवर गेले होते. राहुलला पूर्णवेळ राजकारण करण्यात कोणतेही स्वारस्य नाही.

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेतृत्वाखालील ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये राकॉ आणि कॉँग्रेस हे दोन्ही पक्ष सहभागी आहेत. तरीही राकॉप्रमुख शस्द पवार हे सातत्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची कोणतीही संधी मात्र सोडत नाही. राजकारणात आपण वरिष्ठ असून राहुल गांधी यांना अजूनही राजकारण कळत नाही, याची जाणीव करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भाजपाचा मुकाबला करायचा असेल तर राहुलला राजकारणातील बरेच डावपेच शिकावे लागतील, असे पवार नेहमी भासवित असतात. ते काहीही असले तरी पवारांच्या राहूलवरील अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते संतप्त होत असतात. पवारांचा पक्ष खरं म्हणजे प्रादेशिक स्वरुपाचा आहे. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांवर टीका-टीप्पणी करणे आता काँग्रेसचे नेते सहन करणार नाही.

‘शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये राहुल गांधीबाबत असे म्हटले आहे की, राहुल गांधींमध्ये ‘सातत्याचा अभाव आहे. राहुल गांधी संसदेचे अधिवेशन सुरू असताना विदेशात सुटीवर गेले होते. राहुलला पूर्णवेळ राजकारण करण्यात कोणतेही स्वारस्य नाही. त्यांनी सरकारविरोधी एखाद्या मुद्दयावर कधीच अभियान चालविलेले नाही. मोदी सरकारला विशिष्ट मुद्दयावर त्यांनी कधीच घेरले नाही. एखादा प्रश्‍न संसदेत त्यांनी ‘कधीही लावून धरला नाही. पवार हे तळागाळातील जनतेशी जुळलेले नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका वठविलेली आहे.

वयाच्या ४० व्या वर्षी वसंतदादा पाटील अशाप्रकारच्या ८ यांचे सरकार पाडून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते. केंद्रातील नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षणमंत्री तर डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारमध्ये कृषिमंत्रिपद भूषविलेले आहे. इ.स. १९९३ मध्ये मुंबईत जेव्हा बॉम्बस्फोट झाले होते, तेव्हा सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करुन पवारांकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली होती. पवारांनी राजकारणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यांनी बीसीसीआय व आयसीसीचे अध्यक्षपदही भूषविलेले आहे. क्रिकेटबरोबरच त्यांनी कबड्डी आणि खो-खो या खेळांनाही प्रोत्साहन दिलेले आहे. पवारांचे बारामती पॅटन॑ सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

पहिल्यांदा आव्हान नंतर समझोता

सोनिया गांधी विदेशी असल्यामुळे त्यांनी सोनिया गांधींना विरोध केला होता. महाराष्ट्रामध्ये पवारांची पकड मजबूत असल्यामुळे त्यांनी सोनिया गांधींना आव्हान दिले होते. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर मात्र युपीएच्या काळात काँग्रेस आणि त्यांच्या राकाँमध्ये समझोता झाला. आजसुद्धा शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे मार्गदर्शक आहेत. पवारांनी म्हटले आहे की, राज्यातील आघाडी सरकारला आगामी २५ वर्षेपर्यंत कोणीही हटवू शकत नाही. महाराष्ट्रातील सरकारमध्ये काँग्रेस पक्ष कनिष्ठ सहभागी म्हणून सामील झाला आहे.

पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

गांधी यांच्याबाबत पवारांनी जे वक्‍तव्य केलेले आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष संतप्त झालेला. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे की, राज्यात स्थिर सरकार कायम ठेवायचे असेल तर पवारांनी सरकारमध्ये सहभागी पक्षावर टीका-टिप्पणी करणे टाळणे आवश्यक आहे. यशोमती ठाकूर यांनी असेही म्हटले आहे की, काँग्रेसचे नेतृत्व मजबूत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या लोकशाही मूल्यावर आमची आस्था आहे. आघाडीमधील पक्षांनी नियमांचे पालन केले पाहिजे. दरम्यान शिवसेना नेत्यांनी मात्र पवारांच्या टिप्पणीवर कोणतेही भाष्य केले नाही. त्यांच्या त्यांच्या वक्तव्यामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही शिवसेना नेत्यांनी आहे.