काँग्रेसची नाराजी की नौटंकी?

महाराष्ट्रात काँग्रेस तमाशा पार्टी स्वरुपात पुढे येत आहे. रोज एक नवा तमाशा राज्याची जनता अनुभवत आहे. कधी नाराजी व्यक्त करुन तर कधी राहूल गांधी यांच्यासोबत कानाफूसी करुन महाराष्ट्र काँग्रेसचे

 महाराष्ट्रात काँग्रेस तमाशा पार्टी स्वरुपात पुढे येत आहे. रोज एक नवा तमाशा राज्याची जनता अनुभवत आहे. कधी नाराजी व्यक्त करुन तर कधी राहूल गांधी यांच्यासोबत कानाफूसी करुन महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सत्तालग्नाच्या बँडवरच नाराजीचे पोवाजे गातात. मग उद्धव ठाकरेंना ते भेटले की, विजेचा शॉक लागवा अशी झटक्यांत त्यांची नाराजी दूर होते. भुलाबाईंच्या गाण्यांमध्ये राणी रुसून बैसली कैशी तशी अवस्था राज्यातील सत्तेत काँग्रेसची आहे. महाराष्ट्रात ते सरकारमध्ये आहेत पण सत्ता सहभागी नाहीत. दुसऱ्याच दिवशी मग बवाल उभा होताच सत्ता सहभागी आहेत असे कबूल करतात. मोठअया निर्णयात आमचा सहभाग नसतो असे जाहीरपणे आमचा सहभाग नसतो असे जाहीरपणे सांगतात अन मग दुसऱ्याच दिवशी सहभागी असल्याची कबूली देतात. हा सारा भाग राज्यात काँग्रेसची विक्षिप्त अवस्था असल्याचे जाणवत आहे. यातूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसला जुनी खाट कुरकूर करणारच असे चिमटे काढले 

ज्या राज्यातील सत्तेत काँग्रेसचा एकखांबी तंबू होता तेथे पोटभाडेकरु स्वरुपात सध्या वास्तव्यात आहेत. काँग्रेसचे हे वाईट दिवस समजण्यापलिकडे आहे. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडीत आहोत. असे विधान करणारी काँग्रेस मंडळी कोणाला मुर्ख बनवू शकत नाही. सत्तेच्या लहान तुकड्यावर भूक भागविण्यासाठी ते आघाडीत आहेत हे तेवढीच सत्य. सत्येशिवाय काँग्रेसी नेते जगूत शकत नाही. आघाजीचे सरकार म्हणजे ज्याच्यामध्ये दम असतो तो कप्तान होतो बाकी इतरांची अवस्था ‘कबड्डी कबड्डी’ म्हणत राहा समान असते. काँग्रेसचे जे आमदार निवडून आलेत त्यापैकी एक तृतियांश मंत्री झाले बाकी दोन तृतियांश जे खालीपिली आहेत त्यांचा स्वाभीमान अधूनमधून जागा होतो. मग त्यांचा आवाज होउन बुलंद करण्यासाठी विधायक दलाचा नेता आक्रोश करतो. प्रारंभी काँग्रेसनी रडारड केली तेव्हा उद्धवांनी ती थांबवली. पण आता रोज मरे त्याला कोण रडे सारखी स्थिती वाटल्यामुळे उद्धव ठाकरेंनी भेट घेण्याची इच्छाच व्यक्त केली नाही, मग भयभीत काँग्रेसचे नेते लोकलाजेस्तव उद्धवांना भेटीचे वेळ मागू लागले. त्यानंतर ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले.