imran khan

पाकिस्तानने ८८ अतिरेकी संघटनावर प्रतिबंध घातल्याचे शनिवारी मान्य केले होते. दाऊदसुद्धा पाकमध्येच असल्याचेही सांगितले होते, परंतु काही तासानंतरच पाकने यु-टर्न घेतला. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात दाऊद पाकिस्तानात असल्याचा इन्कार केला आहे.

खोटारडा पाकिस्तान कधीच आपल्या शब्दावर कायम नसतो. तो क्षणातच बदलत असतो. फायनांसिअल ऍक्शन टास्क फोर्सच्या काळ्या यादीतत टाकण्यापासून बचाव करण्यासाठी पाकिस्तानने ८८ अतिरेकी संघटना आणि त्यांच्या प्रमुखांवर कारवाई करण्याचे ढोंग केले होते. या काळ्या यादीमध्ये हाफिज सईद, मसूर अजहर, जकीऊर रहेमान लखवी यांच्यासह दाऊद इब्राहिमचे नाव सामील करुन दाऊद पाकिस्तानमध्येच आहे हे मान्य केले होते. इ. स. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी दाऊदच होता. हेही पाकने मान्य केले. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात २७५ जणांचा मृत्यू झाला होता तर १४०० लोक जखमी झाले होते. पाकने जाहीर केलेल्या यादीमध्ये दाऊदचे नाव असून कराची येते त्याचे ३ बंगले आहेत. तर त्याच्याजवळ ९ भारतीय आणि ५ पाकिस्तानी पासपोर्ट आहेत.

काही तासानंतरच पाकिस्तानचे घुमजाव

पाकिस्तानने ८८ अतिरेकी संघटनावर प्रतिबंध घातल्याचे शनिवारी मान्य केले होते. दाऊदसुद्धा पाकमध्येच असल्याचेही सांगितले होते, परंतु काही तासानंतरच पाकने यु-टर्न घेतला. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात दाऊद पाकिस्तानात असल्याचा इन्कार केला आहे.

पाकिस्तानचा नेहमीच नकार

मागील काही दशकापासून भारत पाकिस्तानकडे दाऊदला भारताच्या स्वाधीन करावे, अशी मागणी करीत आहे. परंतु पाक मात्र नेहमीच इन्कार करीत आहे. जेव्हा की, दाऊद पाकमध्ये त्याचा रिअल इस्टेटचा कारभार मोठ्या प्रमाणावर करीत आहे. पाकचा क्रिकेट खेळाडू जावेद मियाँदाद यांच्या मुलासोबत दाऊदने त्याच्या मुलीचा विवाह केला. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयने दाऊदला सुरक्षा दिली आहे. पाकने जी अधिसूचना जारी केलेली आहे. त्यामध्ये अनुक्रमांक क्यूडीआय १३५ मध्ये दाऊदचा पासपोर्ट नंबर आणि कराचीचा पत्ता नमूद केलेला आहे. व्हाईट हाऊस कराची, बंगला क्रमांक ३७,३० व्ही स्ट्रीट कराची तसेच फ्लटियाल बंगला नूरबाग हिल असे दाऊदचे अन्य पत्ते आहेत. पाकिस्तान सरकारने म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने अतिरेक्यांची जी यादी जाहीर केलेली आहे, ती पुन्हा पाकने जाहीर केलेली आहे. जेणेकरून सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या बैठकीमध्ये आपल्यावर कोणताही ठपका येऊ नये. एफटीएफच्या २७ कलमी अटीपैकी पाकने केवळ अर्ध्याच अटी पूर्ण केलेल्या आहेत.