अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीचा संन्यास, रैनाही निवृत्त

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द क्रिकेट शौकिनांच्या नेहमी स्मरणात राहणार आहे. धोनीमध्ये हरणारा सामनाही जिंकण्याची विशेषतः होती. धोनीने त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत ३८.०९ धावांच्या सरासरीने ४८७६ धावा पूर्ण केल्या. भारताला २७ पेक्षा जास्त सामन्यात विजय मिळवून दिला. वन डे क्रिकेटमध्ये ५ व्या ते ७ व्या क्रमांकावर खेळण्यासाठी येत होता. ५० धावांच्या सरासरीने धोनी यांनी १०७७३ धावा काढल्या.

भारतीय क्रिकेटचा कर्नधार महेंद्रसिंग धोनी वयाच्या ३९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. षटकार, चौकार आणि त्याच्या हेलिकॉप्टर शॉटसाठी धोनी प्रसिद्ध होता. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द क्रिकेट शौकिनांच्या नेहमी स्मरणात राहणार आहे. धोनीमध्ये हरणारा सामनाही जिंकण्याची विशेषतः होती. धोनीने त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत ३८.०९ धावांच्या सरासरीने ४८७६ धावा पूर्ण केल्या. भारताला २७ पेक्षा जास्त सामन्यात विजय मिळवून दिला. वन डे क्रिकेटमध्ये ५ व्या ते ७ व्या क्रमांकावर खेळण्यासाठी येत होता. ५० धावांच्या सरासरीने धोनी यांनी १०७७३ धावा काढल्या. क्रिकेट कारकिर्दीत धोनीने ९० टेस्ट. ३५० धावा काढल्या. क्रिकेट कारकिर्दीत धोनीने ९० टेस्ट, ३५० वन डे आणि ९८ टी-२० सामने खेळले. परंतु अखेरच्या काळात मात्र त्याचा खेळ चांगला नव्हता. त्यामुळे तो त्याच्या क्रिकेट भविष्याबाबत चिंतित होता. 

धोनीमध्ये अनेक चांगले गुण होते

बीसीसीआयचे अध्यक्ष व माजी भारतीय कर्नधार सौरव गांगुलीने धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रतिक्रिय व्यक्त करताना म्हटले आहे की, त्याच्या निवृत्तीमुळे एका युगाचा शेवट झाला आहे. त्याच्या क्रिकेटच्या नेतृत्वाला तोड नव्हती. देशात आणि जगात धोनी अद्भूत  खेळाडू राहिलेला आहे. विराट कोहली म्हणाला, धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द सर्वांच्या स्मरणात राहील. रवी शास्त्री म्हणाला, अत्यंत चपळ आणि स्फूर्तीला खेळाडू म्हणून क्रिकेट जगात धोनी सर्वांच्या आठवणीत राहणार आहे. रोहित शर्मा म्हणाला, भारतीय क्रिकेटमध्ये धोनी सर्वाधिक प्रभावशाली खेळाडू राहिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटला आता क्रिकेटप्रेमी मिस करतील, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, धोनीचे क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे. धोनी सोबतच ३३ वर्षीय सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. सुरेश रैना वन-डे आणि टी-२० मध्ये वरिष्ठ खेळाडू राहिलेला आहे. रैनाने इ.स. २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका वठवविलेली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात रैनाने नाबाद खेळी केली होती. रैनाने ७८ टेस्ट, २२६ वन-डे आणि ७८ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला असला तरी आयपीएलमध्ये मात्र खेळत राहणार आहे. यूएईमधध्ये भारताला विजय मिळवून दिल्यानंतर धोनी आयपीएलमधूनही निवृत्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बीसीसीआयला आवाहन केले आहे की, बीसीसीआयने धोनीच्या निवृत्तीबद्दल विशेष सामना आयोजित करावा, या सामन्याचे प्रायोजकत्व झारखंड  सरकार करेल. 

मानद लेफ्टनंट कर्नल

शाळेत शिकत असताना धोनी एनसीसीमध्ये होते. सैन्यात भरती होण्याची धोनीची इच्छा होती. परंतु ती पूर्ण होऊ शकली नसली तरी धोनीला मानद लेफ्टनंट कर्नलची उपाधी दिल्यामुळे त्यांची ती इच्छा पूर्ण झाली आहे. धोनीने सैनिकाचे प्रशिक्षण घेतलेले आहे. धोनी सैन्याच्या तुकडीमध्ये होते. कमांडोचे प्रशिक्षणही पूर्ण केलेले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते धोनीला पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सैनिकाच्या युनिफॉर्ममध्ये त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. धोनीला महागड्या दुचाकी चालविण्याचा शौक आहे. धोनीच्या जीवनावर एम.एस. धोनी : अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाची निर्मिती झालेली असून या चित्रपटात सुशांतसिंग राजपूत यांनी धोनीची भूमिका केलेली आहे.