दिग्विजय यांचा राहुल गांधींना मोलाचा सल्ला

  • दिग्विजय यांनी राहुल गांधी यांना दिलेला सल्ला तसा मोलाचा म्हणावा लागेल. भारत भ्रमणातून त्यांचा जमिनी आधार मजबूत होईल. त्यांच्यासोबत कुणी बनवाबनवी करणार नाही. ते लोकांची आशा-आकांक्षा व जनमानसाला प्रत्यक्ष रुपात चांगले समजू शकतील. लोकांच्या ह्रदयाचा ठाव घेण्यात ते यशस्वी ठरतील.

व्यापक प्रवासातून थेट लोकसंपर्कात असलेल्या नेत्याची उंचीही मोठीच असते. खुज्या नेत्यांमध्ये तो अधिक उठून दिसतो. ड्राईंगरुममध्ये बसून राजकारण करणारे नेते एका विशिष्ट सीमेच्या आतच राहतात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्वीजयसिंह आतच राहतात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी राहुल गांधी यांनी न मागता त्यांना एक मोफत सल्ला दिला. राहुल गांधी यांनी संसदेत अधिक सक्रियता दाखवून देशवासियांसोबत सलग संवाद कायम ठेवावा असे ते म्हणाले. राहूल गांधी यांनी भारत भ्रमण करावे असे स्पष्ट करुन दिग्विजयसिंह म्हणाले की यातन ते जनमनाचा ठाव घेऊ शकतील. लोकांच्या समस्या, अडचणी, आशा-आकांक्षा ते समजू शकतील. सुख सुविधा व आरामात बसून राजकारण करणारे नेता काही दिवसात अदृष्य होतात. असेही ते म्हणाले. 

कार्यकर्त्यांना यात्रा-पदयात्रेतील फरक माहीत नाही 

तमिळनाडू काँग्रेसचे युवा नेता दिग्वीजयसिंह यांचा आशय समजू शकले नाहीत. टागोर म्हणाले की राहुल गांधी यापूर्वी १०० पदयात्रा आधीच करुन चुकले. पक्षात उंच पदावर विराजमान झालेले नेते त्यांच्या सोबत उभे झाले. त्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खूपसला. मनिकम टागोर यांनी समजायला पाहिजे होते की यात्रा व पदयात्रा दरम्यान काय अंतर आहे. राहुल जर देशव्यापी भ्रमणावर निाघाले तर ते ट्रेन, कार, विमान आदींचा प्रवासासाठी वापर करणार. यातून अनेक राज्य व शहरांच्या थेट संपर्कात येतील. 

दिग्विजय यांनी राहुल गांधी यांना दिलेला सल्ला तसा मोलाचा म्हणावा लागेल. भारत भ्रमणातून त्यांचा जमिनी आधार मजबूत होईल. त्यांच्यासोबत कुणी बनवाबनवी करणार नाही. ते लोकांची आशा-आकांक्षा व जनमानसाला प्रत्यक्ष रुपात चांगले समजू शकतील. लोकांच्या ह्रदयाचा ठाव घेण्यात ते यशस्वी ठरतील. सन १९७७ साली इंदिरा गांधी सत्तेच्या बाहेर होत्या. त्या पुन्हा शक्तीमान होतील असे वाटतच नव्हते. पण इंदिरा गांधी यांनी हिंमत न हारता जनसंपर्क सुरु केला. बेलछी गावात दलित अत्याचाराची बातमी कानी पडताच त्या दुर्गम अशा गावात पोहोचल्या. गावात ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे हत्तीवर बसून त्या गावात पोहोचल्यात. त्यांनी पीडित दलित बांधवांना हिंमत दिली. त्या विदर्भातील पवनार आश्रमात येत होत्या. विनोबा भावे यांचे आशीर्वाद घेवून संपूर्ण विदर्भच त्यांनी पिंजून काढला होता. त्यांनी व्यापक प्रवासात दलित शोषित जणांच्या गाठी-भेटी घेतल्या. यातून त्यांच्या लोकप्रियतेचा ग्राफ वाढला. सन १९८० च्या निवडणुकीत त्या पुन्हा सत्तास्थानी आल्यात. दिग्विजयसिंह यांनी राहुल गांधींना अशावेळी सल्ला दिला जेव्हा काँग्रेसमध्ये वयोवृद्ध विरुद्ध तरुण नेत्यांध्ये तू तू – मैं मैं होत आहे. ज्योतिरादित्यांनी काँग्रेस सोडली व तरुण तूर्क नेते सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. काँग्रेस रस्त्यावर आली आहे. पक्षाला शक्तिमान करण्यासाठी नेत्यांना फुलटाईम काम करावे लागणार आहे. संसद अधिवेशन कालखंडात विदेशात जाणे अथवा विपश्यना शिबिरात हजेरी लावण्याचे काम राहुल गांधी यांना बंद करावे लागेल. पूर्ण वेळ त्यांना पक्षासाठी वेळ द्यावा लागेल तरच काही खरे. 

महात्मा गांधींनीही देशभर प्रवास केला होता 

महात्मा गांधी बॅरिस्टर झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले तेव्हा त्यांचे राजकीय गुरु गोपालकृष्ण गोखले यांनीही त्यांना देशभ्रमणाचा सल्ला दिला होता. तुम्ही एक वर्ष भारत भ्रमण करुन देशातील जनतेचे जीवन, राहणीमान, त्यांच्या अडचणी, गुलामी जवळून न्याहाळा. त्यानंतर मग तूम्ही राजकारणात पाऊल ठेवा. महात्मा गांधींनी मग हेच केले. गांधींनी देशातील निरक्षरता, गरिबी, शोषण हे प्रत्यक्ष अनुभवले. ते मनोमन व्याकळ होत गेले. ओडीशामध्ये त्यांना माहित पडले की एका स्त्रीकडे एकच साडी आहे. अन तिची मुलगी व ती दोघीही स्वतःला त्यात गुंडळतात. ते पाहून त्यांचे मन व्यथित झाले. तेव्हापासून त्यांनी अंगावर एका पंचाशिवाय काहीच घातले नाही. गांधीनी भारत भ्रमणातून जे काही भयावह दिसले ते समूळ नष्ट करण्याची त्यांनी शपथ घेतली. गुलामीचे जीवन आता ठोकारले पाहिजे असे मनोमन त्यांना वाटले अन ब्रिटीशांसारख्या बलाढ्य सत्तेसोबत त्यांनी टक्कर घेण्याचे निश्चित केले. गांधीजींनी भारत भ्रमण केले नसते तर मुंबई किंवा गुजरातमध्ये काळा कोट परिधान करुन वकिली करतांना दिसले असते. जगाला हा महात्मा दिसलाच नसता.