सीमापारची कारस्थाने उधळून लावा

काश्मीर खोरे अशांत असताना आता पंजाबदेखील अशांत करण्याचा कट पाकिस्तान चीनच्या आशीर्वादाने खेळत आहे. भारत सरकार वेळीच सावध झाले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. काळ बदलत असतो. जो काळाच्या अनुसार चालतो त्याला काळ साथ देतो नाहीतर तोच त्याचा काळ बनतो. राजकारणात काही वेगळे नाही.

    नेते मंडळी काळानुरूप वेगवेगळे मुद्दे हातात घेतात आणि हवेवर स्वार होतात पण जनतेची नाडी ओळखण्यात थोडीदेखील चूक झाली की डोलारा ‘कोसळण्यास वेळ लागत नाही. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी केंद्राला जाहीर इशारा दिला आहे की, आंदोलक शेतकरी लवकरात लवकर विजय पताका झळकावत घरी पोचला नाही तर पाकिस्तानचे फावणार आहे. अगोदरच त्यांच्या सीमावर्ती राज्यात ड्रोनद्वारे शस्त्रात्रे पाठवण्याचा उद्योग झपाट्याने पाकिस्तानने सुरू केला आहे. काश्मीर खोरे अशांत असताना आता पंजाबदेखील अशांत करण्याचा कट पाकिस्तान चीनच्या आशीर्वादाने खेळत आहे. भारत सरकार वेळीच सावध झाले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.

    दिशा रबीसारख्या ‘ लहान मुलांच्या’ मागे हात धुवून लागण्यापेक्षा सीमापारची कारस्थाने उधळवून लावण्यासाठी केंद्राने काम करावे असे अमरिंदर सांगत आहेत. गेल्या आठवड्यात पंजाबमधील नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाचा झालेला पुरता धुव्वा काय दाखवतो ? ज्या राज्यात काँग्रेसला बाजूला सारून पुढील वर्षाच्या विधानसभा निवडणुकात सत्तेवर येण्याचे स्वप्न भाजपा पाहात होता तिथे शेतकरी आंदोलनाच्या विचित्र हाताळणीने भाजपाचे बारा वाजले आहेत. या निवडणुकात काँग्रेसचा झालेला नेत्रदीपक विजय महत्त्वाचा नाही पण भाजपाची हार महत्त्वाची. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर दहा वर्षे पंजाबवर राज्य करणाऱ्या अकाली असेच हाल झाले आहेत.

    अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या संधिसाधू राजकारणाचेदेखील या निवडणुकात तीन तेरा झाले आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पंजाबवर एक हाती सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न भाजपा बघत होता आणि त्यातूनच अकाली दलापासून काडीमोड घेण्याची योजना शिजली होती. महाराष्ट्रात अशाच प्रकारे राजकारण झाल्याने शिवसेनेने ‘महाविकास आघाडीची वेगळी चूळ मांडली. शेतकरी आंदोलनाने शेजारील हरियाणामध्येदेखीळ वादळ माजवले आहे. जननायक जनता पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यावर भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा दबाव वाढत आहे.

    गेल्या आठवडय़ात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी राजस्थान, हरयाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेशमधील जाट समाजात पक्षविरोधी भावना वाढत असल्याने एक बैठक बोलावली होती. भाजपाच्या शीर्ष नेतृत्वात शेतकरी आंदोलनाने उद्भवलेल्या परिस्थितीने किती चिंता निर्माण झाळी आहे याचे ते द्योतक होय. येथीळ एका न्यायालयाने भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रामाणीवर ठोकलेला अन्रूनुकसानीचा खटला निकालात काढून पक्षापुढे अजून एक संकट उभे केळे आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा जाहीरपणे उद्‌घोष करणाऱ्या सत्ताधारी दळाला उन्नाव आणि हाथरसमधीळ घटनांनी अगोदरच अस्वस्थ केलेले आहे.