हिंदूजा कुटूंबात संपतीवरुन वाद

संपती पत्नी आणि जमीनीवरुन आनादिकाळापासून भांडण होत आलेले आहेत. संपतीवरुन कुटूंबातील सदस्यांमध्ये झगडे-भांडण होणे काही नवीन नाही. परंतु व्यावसायिकपणे घराण्यांमधील अशी भांडण जेव्हा सार्वजनिक

 संपती पत्नी आणि जमीनीवरुन आनादिकाळापासून भांडण होत आलेले आहेत. संपतीवरुन कुटूंबातील सदस्यांमध्ये झगडे-भांडण होणे काही नवीन नाही. परंतु व्यावसायिकपणे घराण्यांमधील अशी भांडण जेव्हा सार्वजनिक होतात तेव्हा तो चर्चेचा विषय ठरतो. ११.२ अरब डॉलरच्या (८३,००० कोटी रुपये) संपतीवरुन २ हिंदूजा भावांचा, मोठे भाऊ श्रीचंज हिंदुजा यांची मोठी मुलगी विनू हिच्यासोबत वाद सुरु आहे, हे तिघेही भाऊ विनूला समजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. विनूने या सर्व भावांच्या विरोधात न्यायालयात जो खटला दाखल केलेला आहे. तो तिने परत घ्यावा व संपत्तीची जो हिस्से-वाटणी झालेली आहे, ती तिने मान्य करावी, हिंदुजा समूहात ४ भाऊ आहेत. यापैकी सर्वात मोठा भाऊ श्रीचंद आणि गोपीचंद जगभर हिंदूजा समूहाचा तेल, गॅस, आयटी बँकींग आणि प्रॉपर्टीचा जो कारभार आहे तो संभाळतात. तिसरा भाऊ प्रकाश हिंदूजा स्वित्झरलँडमधील जिनेव्हा येथे फायनान्सचा कारभार करतात. चौथा भाऊ अशोक भारतातील हिंदूजा समूहाची जबाबदारी सांभाळत आहेत. हिंदूजा भावांमध्ये एका पत्रावरुन वाद सुरु झालेला आहे. या पत्रावर चारही भावांमध्ये स्वाक्षऱ्या आहेत. या दस्तएवजात असे नमूद करण्यात आले आहे की, एका भावाजवळ जी संपत्ती आहे. ती सर्वांचीच आहे. मोठे भाऊ श्रीचंद आणि त्यांची मुलगी विनू मात्र हे पत्र रद्द करावे कारण या पत्राला कोणताही कायदेशीर आधार नाही. हे पत्र लंडनमध्ये एका कोर्टात सुनावणीच्या वेळी पुढे आलेले आहे. या संदर्भात न्यायालयाने म्हटले आहे की, गोपीचंद प्रकाश आणि अशोक या तिन्ही भावांनी या पत्राचा वापर हिंदूजा बँकेवर आपले नियंत्रण स्थापित करण्यासाठी केलेला आहे. जेव्हा की. या बँकेवर श्रीचंद हिंदूजा यांचाच पूर्ण अधिकार आहे. या संपूर्ण भांडणाचे मूळ हे पत्रच आहे. 

श्रीचंद आजारी, मुलगीच खटला लढणार 

लंडन येथील न्यायालयाने म्हटले आहे की, श्रीचंद हिंदुजाच्या वतीने त्यांची मुलगी विनूच हा खटला लढविणार असून ती आपल्या पित्याच्या हिताचे संरक्षण करेल. ८४ वर्षीय श्रीचंद हिंदूजा लेव्ही बॉडी या आजाराने पीडीत आहेत. त्यांना विस्मरण झालेले आहे. त्यांणा कोणतीही गोष्ट आठवत नाही. विनू हिचे म्हणणे आहे की २ जूलै २०१४ रोजी त्यांनी वारसपत्र लिहून ठेवलेले आहेत मान्य करु नये. या समझोता पत्रानुसार श्रीचंद स्वता:ला वेगळे ठेवण्याचीही मागणी केलेली आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, हे भाऊ एकमेकांना आपले एक्झ्युकेटिव्ह नियुक्त करतील. कोणत्याही भावाच्या नावावर असलेली संपती चारही भावांची असेल. या पत्रावर चारही भावांच्या स्वाक्षऱ्या आहेत.