congress rahul gandhi

बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीचा जो पराभव झाला त्यामुळे तर कॉंग्रेसमधील बंडखोर नेते अगदी चवताळले असून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर तोंडसुख घेत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक आणि देशातील पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे कॉग्रेस पक्षामध्ये अंतर्गत टीका-टिप्पणीला ऊत आला आहे.

“केंद्र आणि अनेक राज्यांत कॉँग्रेस पक्ष (Congress) सत्तेपासून दूर आहे, किंबहुना होणा-या निवडणुकीमध्ये कॉग्रेसचा पराभवच (Congress Loss) होत असल्यामुळे पक्षामध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते ( senior leadership) परस्परांवर दोषारोपण करीत आहे. या नेत्यांमध्ये आपापसांमध्ये जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, ते अगदी हास्यास्पद आहेत. कॉंग्रेस पक्षात पराकोटीचे नैराश्य पसरले आहे. वरिष्ठ नेतृत्वाच्या निष्क्रियतेमुळे पक्षाची अवस्था, दिशादर्शक यंत्र हरवल्यामुळे समुद्रातील फसलेल्या जहाजाप्रमाणे झालेली आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीचा जो पराभव झाला त्यामुळे तर कॉंग्रेसमधील बंडखोर नेते अगदी चवताळले असून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर तोंडसुख घेत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक आणि देशातील पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे कॉग्रेस पक्षामध्ये अंतर्गत टीका-टिप्पणीला ऊत आला आहे. पक्षाच्या घ्येय-धोरणावरच प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. पक्षातील ज्या २३ नेत्यांनी काही दिवसापूर्वी पक्षनेतृत्वाला पत्र लिहिले होते, त्यातील काही नेत्यांनी पुन्हा पक्षनेतृत्वाच्या ‘निष्क्रियतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलेले आहे. पक्षांतर्गत हा वाद-विवाद आणखी वाढला तर पक्षाचे दोन तुकडे होण्यास वेळ लागणार नाही.

सिब्बल यांची टिप्पणी अन्‌ अधीर रंजन यांचे उत्तर

बिहार विधानसभा निवडणूक आणि ११ राज्यांतील ५९ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसची जी निराशाजनक कामगिरी राहिलेली आहे, त्यावर कठोर टिप्पणी करताना कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे की, प्रत्येक निवडणुकीत पराभव होणे ही आता पक्षाची ‘नियती’च झालेली आहे. यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांना ठेच पोहोचते. पक्षाने मागील ६ वर्षांमध्ये जय-पराजयाचे आत्मपरीक्षण केलेले नाही. त्यामुळे आता आत्मपरीक्षण करतील अशी अपेक्षा ठेवणे चूक ठरेल. या निवडणुकांमध्ये पक्षाने केलेल्या कामगिरीवर वरिष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया अजून आलेली नाही. काँग्रेसच्या या पराभवाचा परिणाम पुढील वर्षी होणा-या निवडणुकांवर होऊ शकतो.

जनता काँग्रेसपासून का दूर जात आहे याचा विचार आता पक्ष नेतृत्वाने केला पाहिजे. कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर जे प्रश्‍न उपस्थित केले आहेत, त्याला उत्तर देताना लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे की, स्वतः काहीही करायचे नाही आणि जे कार्य करीत आहे त्यांच्या की म्हणजे आत्मपरीक्षण करणे नव्हे. बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकांमध्ये कपिल सिब्बल कुठे होते ? जे नेते आता पक्षाची उपेक्षा करतात आणि पक्षविरोधी कारवायामध्ये सामील आहेत, त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अन्य पक्षात जावे किंवा स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करावा. वरिष्ठ नेत्यांनी अशाप्रकारे जाहीरपणे वक्तव्ये करू नये. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये ते आपली मते मांडू शकतात. अशोक गहलोत आणि सलमान खुशींद या नेत्यांनीसुद्धा कपिल सिब्बल यांच्या या भूमिकेवर कठोर टीका केली आहे. सिब्बल यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापुढे त्यांची मते मांडावी. थेट मीडियापुढे जाऊन पक्षनेतृत्वावर टीका करणे अयोग्य आहे, असे या नेत्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस संपली नाही अन् संपणारही नाही

अजूनही देशातील ८ राज्यांत गैरभाजपाची सरकारे आहेत. पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची मजबूत सरकारे आहेत. देशाच्या राजकारणामध्ये ज्याप्रकाराने धार्मिक कट्टरवाद वाढत आहे, ते पाहू जाता काँग्रेससारख्या मध्यममार्गी ‘पक्षासमोरील अडचणी वाढत आहे. अजूनही देशातील जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी आहे . प्रत्येक निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाला जी मते मिळत आहे, ते याचे उदाहरण आहे. कार्यकर्ते अजूनही पक्षाबरोबर आहे. पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी सक्रिय आणि कर्मठ नेतृत्वाची आवश्यकता आहे. नेहरू-गांधींची पार्टी म्हणून पक्षाची जी प्रतिमा आहे, ती: दूर करून नवा विचार देणारा पक्ष म्हणून पक्षाला पुढे आणावे लागणार आहे. घराणेशाहीचा काँग्रेसवर होणारा आरोप पुसून काढावा लागणार आहे. घराणेशाही व माता-पुत्राचा पक्ष म्हणून भाजपा काँग्रेसवर जी टीका-टिप्पणी करीत आहे, त्याप्रकारची टीका करण्याची त्यांना कुठलीही संधी मिळू नये, अशाचप्रकारे पक्षाची बांधणी करावी लागणार आहे.

परिस्थितीसापेक्ष बदल आवश्यक

काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठकही झाली होती. त्या बैठकीत चर्चाही झाली, परंतु त्यानंतर मात्र संपूर्ण पक्षामध्ये स्मशानशांतता पसरली. बदलत्या परिस्थितीनुसार संघटनेत बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे. पक्षाचे जेवढे नुकसान व्हायचे ते गेले आहे. निवडणुकीमधील ‘पराभवापासून काहीतरी नवीन धडा घेतला पाहिजे. तळागाळातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षाला बळकट करण्याचे मार्ग शोधण्याची आज काँग्रेसला नितांत गरज आहे.