सूर्यग्रहण समाप्त ”चीनग्रहण कधी संपणार”

चीन म्हणजे भस्मासूरचे एक रुप आहे. जो आशिर्वाद देतो त्याच्यामागे तो लागतो. युद्धाच्या शत्रूपेक्षा जवळचा धोका देणारा मित्र हा भयावह असतो. अवघ्या जगात चीनला जवळचा मनोमन तरी कुणी समजत नाही. हा एक

 चीन म्हणजे भस्मासूरचे एक रुप आहे. जो आशिर्वाद देतो त्याच्यामागे तो लागतो. युद्धाच्या शत्रूपेक्षा जवळचा धोका देणारा मित्र हा भयावह असतो. अवघ्या जगात चीनला जवळचा मनोमन तरी कुणी समजत नाही. हा एक विस्तारवादी, हिंसेवर विश्वास ठेवणारा देश आहे. किड्या-माकोड्यांसारखी या देशाची लोकसंख्या आहे. आमच्या अक्साई चीनवर ताबा आहे. या भागात चीन्यांची वेगवेगळ्या हवामानात कामाला येणाऱ्या सडका बनविल्या आहे. चीन पीओकेच्या गिलगीट-बाल्टिस्तान येथून सीपीईसी बनवित आहे. हे क्षेत्र आम्ही आमचे समजतोय नेहरुच्या कालखंडात भारताने चीनची तरफदारी करीत त्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनविले. पण चीन नेहमीच काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानची बाजू घेत आले. न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपच्या आमच्या सदस्यत्वात चीन आडवे मांजर आहे. गेल्या वर्षापर्यंत संयुक्त राष्ट्राने मसूद अजहरला दहशतवादी घोषीत केले पण चीन यात अटकाव घालीत आहे. 

भारताची घेराबंदी करीत आहे

चीन भारताचे राज्य अरुणाचल प्रदेशला दक्षिणि तिबेट संबोधून त्यावर दावा ठोकत असतो. तो पाकिस्तानला उघडेपणे मदत करतो आहे. पाकिस्तानच्या बलूच भागात चीन आपल्यासाठी ग्वादर बंदर उभे करतो आहे. तसेच लंकेतही हम्बन टोटो बंदर उभे करीत आहे.बांगला देशला चीनने आयात करात मोठी सूट दिली. बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना यांनी चीनचे आभार व्यक्त केले.यामुळे बांगलादेशातून चामडे ब पॅक मासोळ्या चीनच्या बाजारात डेरेदाखल होतील. नेपाळ चीनच्या इशाऱ्यावर चालतो आहे. नेपाळने चीनच्या चिथावणीतून लिपीयाधूरा, कालापानी, लिपूलेख हा भारतीय भूभाग काठमांडूपर्यंत रेल्वेलाईन, पोखरा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनविणे, बांध व वीज निर्मिती केंद्र बनवून देण्याचे वचनही दिले आहे. चीनने नेपाळमध्ये २० अरब डॉलरची गुंतवणूक केली. आता जूने संबंध गुंडाळून नेपाळही भारताला लाल लाल डोळे दाखवून चीनच्या लालभाईंना खूश करीत आहे. आता आमच्या जून्या विदेश नीतीवर पुर्नमुल्यांकन होण्याची गरज आहे. 

धोका देणारे पावलोपावली 

चीनच्या धूर्त नेत्यांना वाटते की भारत एक भावनाप्रधान देश आहे. त्याला आपण कधीही गुंडाळू शकतो. प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी चीनच्या चौ-एन-लायचे धडाक्यात स्वागत केले. दोन्ही देशात शांती व सह्योगासाठी पंचशील समझौता झाला. हिंदी-चीनी भाई भाईचे नारेही लागलेत. पण चीन भाई पेक्षा कसाई निघाला. चिनने आशियातील बिगब्रदर दर्शविण्यासाठी १९६२ मध्ये भारतावर हल्ला चढविला. बोमडीला, तेजपूर नेता मध्ये चीन्यांची रक्ताची होळी खेळली. आमच्या कैलास मानसरोवरावर चीनचा ताबा आहे. चीनच्या धोक्याने नेहरू हादरले होते. त्यांचे स्वास्थ बिघडले. यातच १९६४ साली त्यांचे नीधन झाले. चीनचे वर्तमान राष्ट्रपती सी जीनपींगही तसेच. भारत दौऱ्यात त्यांचे पेम उतू जातांना दिलसे. मोदींनी त्यांची गळाभेट घेतली. पण व्यर्थ कधी डोकलाम तर कधी गलवानमध्ये चीन घूसखोरी करीत राहिला.