विलक्षण कर्तृत्व आणि राजकारणातील अजातशत्रू ; एकापाठोपाठ शिखरे सर करणार नेता

गडकरींची कार्यशैलीच वेगळी आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून ते कायदे हे सर्वसामान्यांसाठी असतात, असे सांगून  आवश्यक असल्यास कायद्यात सकारात्मक बदल घडवून आणतात. नक्कीच, हा बदल कायदा मोडण्याच्या बाजूने नसतो. गडकरी अनेकदा असे म्हणतात की,  कायदा मोडू नका. परंतु  चांगल्या कार्यासाठी तो वाकवला तरी चालेल.

  राजकारणात असूनही ‘अजातशत्रू’ असलेले नितीन गडकरी हे त्यांच्या अनेकविध पैलूंमुळे राज्य कारभारात अद्वितीय ठरले आहेत  त्यांची कार्यशैलीच निराळी आहे.  सार्वजनिक हिताला सर्वोच्च प्राधान्य आणि तळागाळातील माणसांच्या हिताला केंद्रस्थानी मानण्याची भूमिका, त्यासाठी प्रसंगी कायद्याला लवचिक बनवण्याची तयारी, कल्पकता, सतत नाविन्याचा ध्यास, सचोटी, पारदर्शकता आणि कामाचा झपाटा ही गडकरी यांची गुण वैिशष्ट्ये आहेत़  त्यांच्या हाती खाते कुठलेही असो, त्यांचे प्रकल्प आणि त्यांच्याकडे नेलेल्या कामांना विलंबाची बाधा होत नसते. अशक्य कोटीतील वाटणारी गोष्टही शक्य करून दाखवण्याची हातोटी त्यांच्यात आहे. त्यामुळेच राज्य कारभारात हाती घेतलेल्या कामांना कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठण्यात ते लिलया यशस्वी होतात़  विकासकामांची एकापाठोपाठ शिखरे सर करणार नेता ही गडकरींची ओळख आता देशात सर्वदूर पोहाेचली आहे़

  राजकारणातील असा अजातशत्रू जो विरोधकांनाही आवडतो, ते आहेत – नितीन गडकरी. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमईमंत्री. त्यांच्या परिपूर्णतेची, कार्यक्षमतेची आणि कामाप्रतीच्या समर्पणाची परिणीती अशी की, त्यांना रोडकरी, फ्लायओव्हर मॅन, हायवे मॅन, विकास मॅन आणि डेव्हलपमेंट मॅन या बिरूदांनी सर्वसामान्य लोक संबोधतात. केवळ काम करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य नाही.

  या सरकारमध्ये ते बहुधा एकमात्र मंत्री असावेत, जे त्यांच्या कामाबद्दलच्या तक्रारी जनतेकडून आमंत्रित करतात. नक्कीच यासाठी उमदेपणा, सच्चाई आणि लोकाभिमुखता असावी लागते. आणखी एक गोष्ट म्हणजे, गडकरींना त्याच्या कृतींवर टीकाही  आवडते. टीकाकार आवडतात; आणि त्या टीका ते समजुतदारीने व सकारात्मकतेने स्वीकारतात.
  निंदकाचे घर असावे शेजारी, या सार्वकालिक सत्यावर त्यांचा कमालीचा विश्वास आहे. गडकरींच्या म्हणण्यानुसार, जर टीका ऐकण्याची सवय झाली तर त्याचा उत्तम परिणाम निश्चितच कामावर होतो. आपले सर्वात मोठे हितचिंतक तेच आहेत जे त्यांचे लक्ष आमच्या उणिवांकडे वेधतात. ज्यामुळे आपल्या कामात आणखी सुधारणा होऊ शकतात. पण, टीका निरोगी असावी. निरामय असावी. ती पूर्वग्रहदूषित असू नये.

  चांगल्या कामासाठी कायदा ‘वाकवा’

  गडकरींची कार्यशैलीच वेगळी आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून ते कायदे हे सर्वसामान्यांसाठी असतात, असे सांगून  आवश्यक असल्यास कायद्यात सकारात्मक बदल घडवून आणतात. नक्कीच, हा बदल कायदा मोडण्याच्या बाजूने नसतो. गडकरी अनेकदा असे म्हणतात की,  कायदा मोडू नका. परंतु  चांगल्या कार्यासाठी तो वाकवला तरी चालेल.

  पण सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. ते इतर राजकीय नेत्यांपेक्षा यासाठी वेगळे आहेत, कारण सकारात्मक व जनहितासाठी ते जाहीरपणे सांगतात, की  गुंतवणूक आणि सार्वजनिक हित असेल तर कायद्याचा कडक वापर करताना उद्देशापासून तसूभरही ढळू नये. मागे हटू नये. सकारात्मक कारणांमुळे कायद्यात बदल करण्याची गरज भासली असेल तर मंत्री या नात्याने त्यांच्यात बदल करण्यासाठी ते तयार आहेत.

  ते आपल्या विभागातील अधिकाऱ्यांनाही प्रेरणा देतात की, जनतेच्या कामासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या अशा कोणत्याही कायद्यात बदल करण्यास आपण तयार आहोत. मसुदा आणा,  त्यावर स्वतः स्वाक्षरी करेन. अधिकाऱ्यांनी सुधारित कायदे केले पाहिजेत. हेतू स्पष्ट असेल तर बदल किंवा कोणत्याही आरोपाची भीती का बाळगावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  दिल्लीचा मोह नाहीच…

  वास्तविक गडकरी यांना जाणणोर लोकांना हे चांगल्याने माहीत आहे की, दिल्लीचा त्यांना काहीच मोह नाही. २००९ मध्ये जेव्हा त्यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनविले गेले होते, त्यानंतरच्या पहिल्याच मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले होते की, यापूर्वी ते दिल्लीत दोन रात्रींपेक्षा अधिक कधीच थांबले नाही. तसे त्यांना दिल्लीचा मोह राहिला नाहीत. एवढे की २०१२ मध्ये जेव्हा त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष पद सोपविण्याची तयारी होत हेाती, तेव्हा अप्रात्यक्षिक घटनाक्रमात त्यांना तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यांच्यामागे सीबीआय-ईडीसारख्या संस्थांचा तपास लावला.

  भाजपातील एक चौकडीही या घटनाक्रमाच्या मागे होती, असेही सांगण्यात येते. मात्र इतक्या मोठ्या संकटानंतरही गडकरी कधी डगमगले नाही. त्यांचे काम सुरूच राहिले व फक्त दोन वर्षांच्या आता नागपूर लोकसभा निवडणूक जिंकून ते पुन्हा दिल्लीच्या मुख्यधारेत पोहोचले. आजही ते दिल्लीत तेवढेच राहतात, जेवढे जरुरी आहे व देश-विश्वातील मोठमोठे लोक त्यांना भेटण्यासाठी नागपुरात येतात. एक निष्ठावान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाच्या रूपात ते नेहमीच जनसेवा करीत आले आहे. हेच कारण आहे की ते राजकीय वर्तुळात नेहमीच अजातशत्रू राहतील.

  गडकरी म्हणजे ‘शक्यच ‘

  त्यांच्या कामाची शैली अचाट, विलक्षण आणि थेट आहे. त्यांच्या अंमलबजावणीची पद्धत म्हणजे त्यांचे सुरू केलेले प्रकल्प वेळेवर होतात. जेव्हा ते म्हणाले होते, की नागपुरातील मेट्रो आणि बस एकाच खांबावर दोन वेगवेगळ्या ट्रॅक आणि मजल्यावरून धावेल, तेव्हा लोकांचा विश्वास बसला नाही. परंतु जेव्हा डबल डेकर रोड-मेट्रो लाईन तयार केली गेली, तेव्हा देशातील इतर अनेक राज्यांमधील अभ्यासक, जाणकार अनेक सनदी अधिकारी या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी नागपुरात आले.

  गडकरींनी त्यांची दूरदृष्टी मुंबई-पुणे एक्सप्रेस बनवून सिद्ध केलीच आहे. जेव्हा ते महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यावेळी हा एक्सप्रेस वे हा त्या न्यू इंडियाचा पाया होता. ज्यावर आता प्रत्येक राज्य सरकार अभिमानाने देशाच्या पायाभूत सुविधेत संस्थागत गुंतवणुकीसाठी आणि विविध पायाभूत प्रकल्पांसाठी बाजारातून रक्कमी उभी करण्यासाठी याच देखण्या व जागतिक कीर्तीच्या पायाभूत  निर्मितीचा दाखला देतात आणि अभिमान असल्याचे सांगतात.

  विलक्षण कर्तृत्व

  मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी दिल्ली-मेरठ दरम्यान देशातील पहिला १६-लेन एक्सप्रेसवे तयार करण्याची घोषणा केली.  तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. परंतु जेव्हा त्यांनी तीन महिन्यांत दिल्ली सरायकालेखान ते यूपी गेटपर्यंत तीन नवीन उड्डाणपुलांसह काही भाग बनविला तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. गडकरी आपल्या कामाच्या समर्पणाबद्दल जागरुक आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे, एका मध्यरात्री ते अकस्मात बांधकाम साइटवर गेले. पाहणी केली आणि कामाचा आढावाही घेतला. लोकांना पूर्वी या ठिकाणचा प्रवास करण्यासाठी एक तास लागायचा.

  हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर १५ मिनिटांत हा प्रवास पूर्ण झाला. हे वास्तव पाहिल्यावर लोक एका सुरात म्हणू लागले की, गडकरी अशक्य ते शक्य करतात. असाच विश्वास त्यांना, त्यांच्या दिल्ली-मुंबई ई-एक्सप्रेस या ड्रीम प्रोजेक्टवरही आहे. या मार्गाचे बांधकाम झाल्यानंतर १२ ते १५ तासांत दिल्ली-मुंबई दरम्यान सडकेने जाता येते. हा एक्स्प्रेस वे या अर्थाने देखील महत्त्वपूर्ण आहे की प्रथमच इलेक्िट्रक वाहनांसाठी यावर एक लेन आरक्षित केली जात आहे. ज्यावर वाहन चार्ज करण्याची सुविधा देखील असेल. असे झाले तर हा एक मैलाचा दगड ठरणारा महामार्ग असेल.

  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जुन्या हाय-वे बांधकामांच्या तुलनेत एक तृतीयांश रकमेमध्ये हा हाय-वे बनविण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी आधीच असलेल्या महामार्गाच्या जागीच नवीन आरेखन केले आहे. याचा फायदा हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील मागासलेल्या भागांना होईल. हा मार्ग  मागास आणि आदिवासी भागातून जाईल. ज्यामुळे तेथील प्रगतीची दारे खुली होईल. शिवाय जुन्या महामार्गावर गर्दी कमी होईल. सध्या गडकरी देशातील २० पेक्षा अधिक ग्रीन हायवे बनविण्याच्या योजनेवर काम करत आहेत. त्यांच्याकडे या कामासाठी विश्वासाचे एकमेव प्रतीक म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पैशांची आणि गुंतवणुकीची कमतरता नाही.

  बापूंप्रमाणेच गडकरींचेही ‘हृदय’ खेड्यात

  केवळ रस्ते बांधकाम क्षेत्रच नाही तर गडकरींचा प्रभाव  लघु-सूक्ष्म-मध्यम क्षेत्रातही जाणवत आहे. एमएसएमईमध्ये प्रथमच कर्ज म्हणून कोलेटरल मुक्त तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासह ५० हजार कोटी रुपयांचा निधी ‘फंड ऑफ फंड’ म्हणून तयार करण्यात आला आहे. जो  लघु-मध्यम उद्योगांना पुढे जाण्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल.

  गडकरी जेव्हा लघु व मध्यम उद्योगांबद्दल बोलतात तेव्हा ते ग्रामीण उद्योग विसरत नाहीत. महात्मा गांधींच्या सूत्र वाक्याचा त्यांनी निश्चितपणे व वारंवार उल्लेख केला आहे की भारताचा आत्मा खेड्यात राहतो. गडकरी म्हणतात की, स्वस्त कामगार आणि चांगले कामगार येथे उपलब्ध आहेत. ज्यावर काम करावे लागेल. यासाठी ते अमेझॉन आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय ई-बाजार पिढीशी संबंधित कंपन्यांशी करार करून ग्रामीण कलाकार व विविध वस्तू निर्मात्यांना मोठी बाजारपेठ मिळू शकेल.

  येत्या काळात त्यांना भारताच्या  हजाराहून अधिक ग्रामीण उत्पादनांचा जीआय टॅग मिळविण्यासाठी काम करायचे आहे. ग्रामीण भारताला बळ देण्यासाठी त्यांनी शेणापासून रंग बनवण्याचा प्रकल्प सुरू केला. सर्व आंतरराष्ट्रीय मानके ही ते पूर्ण करतात आणि जागतिक ब्रँडच्या निम्म्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

  शेती आणि ग्रामीण जीवनात निरुपयोगी मानल्या जाणाऱ्या उत्पादनांमधून नवीन उत्पादने तयार करण्यास ते प्राधान्य देतात. ते  म्हणतात की, यातून एक मोठी बाजारपेठ तयार केली जाऊ शकते. इथेनॉल याचे उत्तम उदाहरण आहे, असे सांगून ते म्हणाले की, तांदूळ व इतर धान्याच्या कचर्याच्या भागापासून इथेनॉल बनवून ग्रामीण जनतेचे उत्पन्न वाढवता येते.

  एकमेव नावीन्यपूर्ण मंत्री; २४ तास संशोधनावर लक्ष

  गडकरी यांची प्रतिमा नाविन्यपूर्णतेचा ध्यास घेतलेला मंत्री म्हणूनही आहे, कारण ते जल व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प किंवा शेती क्षेत्रात नाविन्य आणत आहेत. नवोन्मेष आणि नाविन्यता हा तसाही त्यांचा आवडता विषय आहे. हे केवळ जाहीरपणे सांगण्यापुरते मर्यादित नसून ते त्याचे अनुकरणही करायला लावतात. त्यासाठी पाठपुरावा करतात. गटारातील पाण्यातून गॅस निर्मिती किंवा पारंपरिक इंधनाच्या अवलंबित्वापासून सार्वजनिक वाहनमुक्त करण्यासाठी इंधन म्हणून फळ-भाजीपाल्यांच्या कचरा किंवा कापणीचा भाग वापरून ही वाहतूक व्यवस्था परिपूर्ण व स्वस्त करण्याकडे त्यांचा कल आहे. त्यांनी नागपुरात असे प्रकल्प उभारलेही आहेत.

  त्यांना नवीन कल्पना साकारून आणि त्या कशा राबवायच्या हे देखील माहीत आहे. रस्ते बांधकाम क्षेत्रातही ते असेच नवीन उपक्रम राबवणार आहेत. स्टील आणि सिमेंट उद्योग यांच्यातील संबंधांना गडकरींचा उघडपणे विरोध आहे. त्याच्या पर्यायावरही त्यांचे काम सुरू आहे. ते स्टीलच्या जागी उच्च प्रतीच्या प्लास्टिक दोरीच्या वापराची चाचणी घेत आहे. सिमेंटच्या पर्यायाबाबतही ते अनेक प्रयोग करत आहे. ते सगळेच प्रयोग दूरदर्शी म्हणावेत असेच आहेत. ते हे प्रयोग नवीन शहरे तयार करण्यासाठी वापरत आहेत.

  लडाख आणि काश्मीर दरम्यान ते असे शहर बनवण्याच्या योजनेवर काम करत आहेत, जे शहर  चित्रपटांच्या चित्रिकरणापासून  पर्यटनापर्यंत स्वित्झर्लंडला पर्याय बनायला हवे. नक्कीच  हे स्वप्न खूपच दर्जेदार आणि आकर्षक आहे. त्यासाठी सुरू असलेले त्यांचे प्रयत्न अचाट आहेत. विशेष असे की, दावोस शहराला पर्याय म्हणून उत्तराखंडमध्ये एक शहर स्थापनेच्या शक्यतेवरही ते काम करत आहेत.

  – संजय तिवारी