farooq

भारतासोबत गद्दारीची भाषा बोलू लागले, तेव्हा पंडित नेहरुंनी शेख अब्दुल्ला यांना इ.स. १९५३ मध्ये नजरकैदेत टाकले होते. त्यानंतर शेख अब्दुल्ला यांनी माफी मागितली आणि नजरकैदेतून स्वतःची सुटका करुन घेतली.

काही लोक असे असतात की, त्यांना कितीही समजावून सांगितले तरी ते आपल्या विचारावर कायमच असतात अशीच काहीसी अवस्था जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख (Farooq) अब्दुल्ला यांची आहे. ते काळानुसार होणारे बदल समजून घेण्यास असमर्थ आहेत. ते अगदी विक्षिप्तपणे वागतात आणि विक्षिप्त वक्तव्य करतात. फारुख यांनी नुकतेच देशद्रोह्यासारखे (anti-national statements) वक्तव्य केलेले आहेत. ते म्हणाले की, काश्मिरी जनता स्वतःला भारतीय समजत नाही आणि त्यांना भारतीय व्हायचे नाही. चीनने आपल्यावर शासन करावे, असे काश्मिरी जनतेला वाटत आहे, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले. फारुख अब्दुल्ला यांची ही गद्दारीची भाषा सहन करायची काय?

चीनने काश्मिरी जनतेवर राज्य करावे, असे निमंत्रणच ते देत आहेत. काश्मीरमधील लाखों उईगर मुलसमानांवर जो आत्याचार होत आहे. हे काय फारुख अब्दुल्लांना माहीत नाही काय? या उईगर मुसलमानांच्या मशिदी तोडून टाकण्यात आल्या आहेत. त्यांना नमाज अदा करण्याची परवानगीसुद्धा नाही. ते मुस्लिम पोषाख वापरु शकत नाही किंवा दाढीसुद्धा वाढवू शकत नाही. या उईगर मुसलमानांवर प्रचंड अत्याचार होत आहेत. पाकिस्तान चीनचे उपकार आहे आणि म्हणूनच उईगर मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करण्यात येत आहेत. चीनची गुलामी स्वीकारण्याची भाषा करणारे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, काश्मिरी जनतेला विद्यमान सरकारवर मुळीच विश्वास राहिलेला नाही. फाळणीच्या वेळी काश्मिरातील लोकांना पाकिस्तानमध्ये जाणे सोईचे होते. परंतु तेव्हा तेथील जनतेने गांधीजींच्या भारताची निवड केली. तुम्ही जर काश्मिरी जनतेशी या संदर्भात बोलले तर काही लोकांना वाटेल की चीनने भारातत आले पाहिजे.

अब्दुल्ला घराण्याच्या ३ पिढ्यांनी काश्मीरवर राज्य केले

नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला अशाप्रकारची भाषा करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. फारुख अब्दुल्ला यांच्या ३ पिढ्यांनी जम्मू-काश्मीरवर राज्य केले आहे आणि आता सत्ता गेल्यानंतर मात्र चीनला भारतात येण्याचे जाहीर निमंत्रण देत आहे. अब्दुल्ला यांनी गद्दारीची हद्द ओलांडली आहे.

स्वातंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवारहलाल नेहरु यांनी काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सचे समर्थन केले होते. परंतु, जेव्हा शेख अब्दुल्लांकडे जम्मू-काश्मीरची सत्ता आली तेव्हा त्यांनी आपला खरा रंग दाखविण्यास सुरुवात केली.

भारतासोबत गद्दारीची भाषा बोलू लागले, तेव्हा पंडित नेहरुंनी शेख अब्दुल्ला यांना इ.स. १९५३ मध्ये नजरकैदेत टाकले होते. त्यानंतर शेख अब्दुल्ला यांनी माफी मागितली आणि नजरकैदेतून स्वतःची सुटका करुन घेतली.

सत्तेत असताना शेख अब्दुल्ला यांनी भारतीयांना बिना परमिट काश्मिरात येण्यास बंदी घातली होती. याला विरोध करण्यासाठी तत्कालीन जनसंघाचे नेते डॉय श्माप्रसाद मुखर्जी काश्मीरमध्ये गेले होते. तेव्हा त्यांना शेख अब्दुल्लांनी तुरुंगात टाकले होते. तेव्हा जनसंघाच्या नेत्यांनी जहा हुए बलिदान मुखर्जी, वो काश्मिर हमारा है, अशा घोषणा दिल्या होत्या.

शेख अब्दुल्ला यांच्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे बख्सी गुलाम मोहम्मद यांना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनविण्यात आले होते. परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले. फारुख अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांनाही जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. परंतु, आता हेच नेते चीनला काश्मिरात राज्य करण्यासाठी निमंत्रण देत आहेत. हा देशद्रोह आहे. गद्दारीचे यापेक्षा दुसरे उदाहरण देता येणार नाही.

अब्दुल्ला यांची ही गद्दारी जयचंद आणि मीर जाफर या गद्दारीसारखीच आहे. जयचंद यांची पृथ्वीराज चौहान यांच्यासोबत दुश्मनी होती. त्यावेळी जयचंदने मोहम्मद घोरीला मदत केली होती. मीर जाफरच्या गद्दारीमुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने बंगालचे तत्कालीन नवाब गुजाउदौल यांचा पराभव केला होता.