Farooq, Mehbooba's victory did not upset the BJP, ED, even the CBI

जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीमध्ये फारूख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील ७ पक्षाच्या पिपल्स अलायंस फॉर गुपकार या आघाडीने काश्मीर खो-यात बाजी मारली तर जम्मूमध्ये भाजपची सरशी झालेली आहे. हिंदूबहुल जम्मूमध्ये अगोदरपासूनच भाजापचा प्रभाव आहे.

जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे गुजरात मॉडेल अपयशी ठरले आहे. विरोधी पक्षाशिवाय सरकार ही कल्पना लोकशाही शासनव्यवस्थेत अशक्य. कलम ३७० रद्द करणे, राज्याचा दर्जा समाप्त करून केंद्रशासित प्रदेश बनविणे, नेत्यांना अटक करून त्यांना नजरकैदेत ठेवणे इत्यादी पावलं उचलूनही भाजपला काश्मीर खोऱ्यात यश मिळू शकले नाही. विरोधी पक्षांना संपविण्यासाठी त्यांच्या नेत्यांचे पक्षांतर करूनही भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये अपयश आले. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकी जनादेशाची अभिव्यक्ती आहे.

जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीमध्ये फारूख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील ७ पक्षाच्या पिपल्स अलायंस फॉर गुपकार या आघाडीने काश्मीर खो-यात बाजी मारली तर जम्मूमध्ये भाजपची सरशी झालेली आहे. हिंदूबहुल जम्मूमध्ये अगोदरपासूनच भाजापचा प्रभाव आहे. असे असतानाही भाजपने मुस्लिमबहुल काश्मीर खोऱ्यात ३ जागा जिंकून नवा रेकॉर्ड स्थापित केला आहे.

मुख्य लढत गुपकार आघाडी आणि भाजपमध्येच असल्यामुळे काँग्रेस या विभागात माघारणे स्वाभाविकच होते, या विभागामध्ये अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने विजयी झालेले आहेत. गतवर्षी ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्‍मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा समाप्त करण्यात आला होता. हा संपूर्ण प्रदेश केंद्रशासित करून राज्यपालांऐवजी नायब राज्यपालांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. २८० जागांपैकी गुपकार आघाडी १०० जागा जिंकून आघाडीवर आहे.

प्रचंड टीकेनंतरही गुपकार आघाडीला यश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि अन्य पक्षाच्या आघाडीला ‘गुपकार गँग’ संबोधून या आघाडीवर तीव्र टीका केली होती. ७ पक्षाच्या या आघाडीला काश्मीर जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान निरस्त करण्यात आलेल्या रोशनी ॲक्ट अंतर्गत तेथील जमीन हडप केल्याचा आरोप केंद्रीय नेत्यांनी काश्मिरी नेत्यांवर केला होता. इतकेच नव्हे तर ‘पीडिपीच्या युवा शाखेचे अध्यक्ष वहीद पारा यांना अटकही करण्यात आली होती, तरीही या विभागातून आघाडीचा प्रभाव मात्र कमी झालेला नाही. जिल्हा विकास परिषद स्थापन झाल्यामुळे आता काश्मिरी जनतेच्या विविध प्रश्‍नावर सुनावणी होईल आणि या परिषदेला विकासनिधी सुद्धा देण्यात येईल.

काश्मीर खो-यात भाजपची ‘एन्ट्री’

जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांनी भाजपला काश्मीर खोऱ्यामध्ये बळकट होण्यासाठी नवीन संधी आहे. भाजपने दक्षिण काश्मिरमधील पुलवामा, उत्तर काश्मिरमधील बांदीपुरा आणि मध्यकाश्मीरमधील श्रीनगर या जागांवर विजय मिळविलेला आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे की, या निवडणुकांमुळे जम्मू-काश्मिरमध्ये पुन्हा जनप्रतिनिधींचे राजकारण सुरू होणार आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने विजयी झालेले आहेत. अपक्ष भाजपला पाठिंबा देणार की, गुपकार आघाडीला हे मात्र अजूनही समजू शकले नाही.

दोन्ही विभागाचे मतभेद चव्हाट्यावर

नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू आणि काश्मिरला केंद्रशासित प्रदेशाचे २ डोळे म्हटले होते, परंतुर या विभागाचा राजकीय कल मात्र एकमेकापासून भिन्नच राहत आलेला आहे. जम्मू हा प्रामुख्याने भाजपचा गड आहे, परंतु येथेही नॅशनल कॉन्फरंस जम्मू विभागातील राजोरी-रामबन आणि ‘किश्तवाडमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पुंछमध्ये नॅशनल कॉन्फरंस पीडिपी आणि काँग्रेसने अर्ध्यापेक्षा जास्त जागांवर विजय मिळविलेला आहे. ७ पक्षाच्या या आघाडीने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले होते. २० जिल्हा विकास परिषदांमध्ये १३ जागांवर संयुक्‍त विरोधी आघाडीने कब्जा केलेला आहे. जम्मू-काश्मीरमधील गुपकार आघाडी देशातील गैरभाजप राष्ट्रीय पक्षासाठी विविध राज्यांमध्ये प्रेरणादायी ठरू शकेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.