अखेर खडसेंचा भाजपाला ‘रामराम’, ओबीसी मतदार दूर जाण्याची शक्यता

शरद पवारांची खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. तेव्हाच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. आपल्यासोबत कोणतेही आमदार अथवा खासदार भाजपामध्ये प्रवेश घेणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. आपण कोणत्याही पदाच्या लालसेने राष्ट्रवादी प्रवेश घेतलेला नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करीत भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हे काही अचानक घडले नसून खडसे यांची पक्षात अनेक दिवसांपासून अवहेलना होत होती. सहनशीलतेची मर्यादा संपल्यानंतर खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिला. ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. शरद पवारांची खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. तेव्हाच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. आपल्यासोबत कोणतेही आमदार अथवा खासदार भाजपामध्ये प्रवेश घेणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. आपण कोणत्याही पदाच्या लालसेने राष्ट्रवादी प्रवेश घेतलेला नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले. उद्धव टाकरे यांच्या सरकारमध्ये कृषिमंत्रिपद स्वीकारणार का ? या प्रश्नाच्या उत्तरात खडसे म्हणाले. याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकेल. यापूर्वी खडसे यांनी म्हटले होते की, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेली आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रातून मात्र अजूनपर्यंत कोणीही राज्याचे मुख्यमंत्री झालेले नाही. असे खडसे यांनी म्हटले आहे.

ओबीसी मतदार दूर जाण्याची शक्यता

एकनाथ खडसे हे ओबीसीचे मोठे नेते आहेत. ते जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले तर ओबीसी मतदार भाजपापासून दूर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खडसेंच्या पूर्वीही अनेक ओबीसी नेत्यांनी भाजपाची साथ सोडलेली आहे. युती सरकारमध्ये ग्रामविकासमंत्री राहिलेल्या अण्णा डांगे यांनी भाजपाचा राजीनामा देऊन लोकराज्य पक्ष स्थापन केलेला होता. परंतु त्यानंतर मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. प्रतापसिंह गायकवाड यांनी गोपीनाथ मुंडेंशी मतभेद झाल्यानंतर भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विनोद गुडधे पाटील यांनीही विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे भाजपाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. सूर्यकांत वहडणे यांनीही भाजपाचा राजीनामा दिला होता.

देवेंद्र फडणवीसांवर आरोप

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना खडसे म्हणाले की, मी भाजपा किंवा पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विरुद्ध नाही. केवळ देवेंद्र फडणवीसांमुळेच माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ आलेली आहे. भाजपाचा त्याग करताना आपल्याला दुःख होत आहे. असेही ते म्हणाले. माझा दोष काय आहे. मी पक्षामध्ये कोणते चुकीचे काम केलेले आहे. असे मी पक्षाला नेहमी विचारच होतो. परंतु यांचे उत्तर मात्र मला कोणीही दिले नाही. असे खडसे यांनी सांगितले. माझा दोष एवढाच होता की, मी पक्षामध्ये कोणापुढेही हात पसरवले नाही. लाचारी पत्कारुन पद मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. पक्षामध्ये मी माझ्या कर्तव्यापासूनच पद मिळविलेले होते. फडणविसांनी मंत्रिमंडळात सहभागी करुन माझ्यावर उपकार केलेले नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्यावर जे आरोप ठेवण्यात आलेले आहेत ते निखालस खोटे आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना फोन करुन माझ्यावर विनयभंगाच्या आरोपाचा खटला भरण्याचा आदेश दाखल करण्याचे आदेश दिले होते. असे खडसे यांनी सांगितले. ४ वर्षे हा खटला चालला व त्यात मी निर्दोष ठरलो. परंतु. या काळात मला प्रचंड मानसिक त्रास झाला. असे खडसे म्हणाले.

जमीन खरेदी प्रकरणी सोडावे लागले पद

भाजपा-शिवसेना युती सरकारमध्ये असताना पुणे येथे जमीन खरेदी केल्याच्या मुद्यावरुन खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर ते फडणवीसांवर नाराज होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्येही त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज झाले होते.

परिणाम काय होतील?

खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे काय परिणाम होतील यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या ५ वर्षांपासून गिरीश महाजनांकडे भाजपाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. महाजनांच्या नेतृत्वात तेथे दोन खासदार, ४ आमदार निवडून आलेले आहेत. याशिवाय जिल्हापरिषद व जळगाव महानगरपालिकेतही भाजपाची सत्ता आहे. आता खडसेंनी भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती वाढू शकेल.

केवळ आश्वासने

भाजपाने खडसेंना विधानपरिषद सदस्य. राज्यसभा सदस्य व राज्यपालपदाचेही आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र कोणतेही पद दिले नव्हते. याउलट देवेंद्र फडणवीस यांची मात्रल मुख्यमंत्रिपदावर वर्णी लावण्यात आली. फडणविसांना बिहार विधानसभा निवडणुकीचे पक्षाचे प्रभारी बनविण्यात आले. परंतु खडसेंची मात्र सातत्याने उपेक्षा करण्यात आली.