अखेर लॉकडाऊनवर केंद्र सरकारचे नियंत्रण

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी बंद ठेवणयात आलेल्या शिक्षणसंस्था मात्र ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. शाळा-महाविद्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तथापि ९वी ते १२वी पर्यंतचे विद्यार्थी २१ सप्टेंबरनंतर त्यांच्या शाळा-कॉलेजमध्ये जाऊ शकतील, क्रीडा आणि शारीरिक स्पर्धांना परवानगी देण्यात आलेली नाही.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभर सुरु करण्यात आलेला लॉकडाऊन ( lockdown) आता टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे. केंद्र सरकारने (central government) अनलॉक-४.० साठी काही नियम जारी करताना म्हटले आहे की, अनलॉक ४.० चे नियम १ ते ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहतील. देशात ज्या-ज्या शहरात मेट्रो ट्रेन आहेत, त्या ट्रेन सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, या ट्रेनमध्ये प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे. मेट्रो ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी प्रवाशांचे तापमान घेण्यात येईल. चित्रपटगृह आणि स्विमिंग टँक मात्र अनलॉक ४.० मध्येही बंद राहतील. आंतरराष्ट्रीय विमानसेवासुद्धा बंद ठेवण्यात आली आहे.

शिक्षणसंस्था बंद राहतील

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी बंद ठेवणयात आलेल्या शिक्षणसंस्था मात्र ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. शाळा-महाविद्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तथापि ९वी ते १२वी पर्यंतचे विद्यार्थी २१ सप्टेंबरनंतर त्यांच्या शाळा-कॉलेजमध्ये जाऊ शकतील, क्रीडा आणि शारीरिक स्पर्धांना परवानगी देण्यात आलेली नाही.

राज्यांची मर्जी चालणार नाही

केंद्राचे आदेश असतानाही काही राज्ये त्या आदेशांचे व नियमांचे पालन करताना दिसत नाही. महाराष्ट्र, पंजाब, व बंगालसह काही राज्यांनी त्यांच्या पातळीवर लॉकडाऊन केलेला आहे. केंद्र सरकारने आंतरजिल्हा व राज्यांतर्गत जाण्या-येण्यावर सूट दिली होती. परंतु काही राज्यांची भूमिका मात्र वेगळीच होती. महाराष्ट्रामध्ये एसटीने प्रवास करण्यास सूट दिलेली आहे, परंतु खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना ई-पासचे बंधन घालण्यात आले आहे. नवीन गाईडलाईननुसार महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, राजस्थान आणि बंगाल या राज्यांना लॉकडाऊन वाढविण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. ते स्वतः निर्णय घेऊ शकणार नाही. उत्तरप्रदेशात प्रत्येक शनिवारी आणि रविवारला लॉकडाऊन असते, तेथील सरकारला आता केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. लॉकडाऊनच्या नवीन नियमांमुळे केंद्र सरकार आणि एनडीएशासित राज्यामध्ये तू-तू-मैं-मैं होण्याची शक्यता आहे.

२१ सप्टेंबरनंतरच राजकीय सभा, मेळावे

लॉकडाऊन ४.० च्या गाईडलाईननुसार २१ सप्टेंबरनंतरच राजकीय सभा व मेळावे होऊ शकतील. परंतु या सभा, मेळाव्यामध्ये १०० जणांच्यावर उपस्थिती राहणार नाही. यासोबतच धार्मिक आयोजनांनाही काही अटींसह मंजुरी देण्यात आली आहे. ओपन थिएटर २१ सप्टेंबरनंतर उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सामाजिक, राजकीय व धार्मिक आयोजनांमध्ये सहभागी होणाऱ्यांना मास्क लावणे अनिवार्य आहे. थर्मल स्क्रिनिंग आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
काही सवलती

कौशल्य विकास कार्यक्रमाच्या सर्व प्रशिक्षण संस्था सुरु राहतील, पीएचडी आणि तांत्रिक शिक्षणाच्या तसेच सर्व स्नातकोत्तर शिक्षण संस्थांना अनुमती देण्यात आली आहे. प्रयोगशाळा आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकटलची आवश्यकता आहे. त्यांना याचा लाभ मिळेल. शाळांमध्ये येण्यासाठी ५० टक्के शिक्षक व कर्मचाऱ्यांना अनुमती देण्यात आली आहे. ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार २१ सप्टेंबरपासून शाळांमध्ये येऊ शकतात.

महाराष्ट्रातील कार्यालयात येण्यास अनुमती

अनलॉक-४.० गाईडलाईननुसार महाराष्ट्र सरकार, सरकारी आणि खासगी कार्यालयात येण्यास बहुतांश लोकांना परवानगी देऊ शकतात. सध्या सरकाही कार्यालयात १५ टक्के आणि खासगी कार्यालयात १० टक्के लोकांना येण्यासाठी परवानगी आहे. राज्य सरकार यासाठी आपली स्वतंत्र गाईडलाईन जारी करु शकतात. इनडोर जिमलासुद्धा काही अटींसह उघडण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. खासगी गाड्यांना घालण्यात आलेले ई-पासचे बंधन हटविण्याची मागणी होत आहे.