पहिला लॉकडाऊन, रेसिपीजचा महापूर आणि त्यासाठी केलेला जांगडगुत्ता

वाढदिवस साजरे करण्यासाठी केक तयार करायचा कसा हाही प्रश्न सगळ्यांसमोर उभा ठाकल्याने घरीच केक तयार करण्याची संकल्पनाही याच काळात जोर धरू लागली आणि ती अंमलातही आणली गेली. याच काळात सर्वाधिक खप वाढला तो दुकानदारांचा कारण केकसाठी लागणारं साहित्य हे काळात मोठ्या प्रमाणात विकलं गेलं. यातही बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, इनो या गोष्टींनी तर उच्चांक मोडले.

  कोरोना पर्वाला सुरूवात झाली आणि त्याचबरोबर माणसांच्या हालचालींवरही मर्यादा आल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वांनी शक्य तितकं कमी घराबाहेर पडा असा फतवाच काढला गेला.

  सगळंच बंद झालं असलं तरी लोकांच्या जिभेचे चोचले कोण पुरवणार म्हणून मग सुरू झाली एक नवी धडपड ती म्हणजे घरातल्या घरात नवनवीन रेसिपीज तयार करून ते आपली क्षुधा शांत करण्याची. मग पुरुषही यात मागे कसे राहतील. त्यांनी तर गोल चपात्याही बनवायची तयारी सुरू केली आणि त्यांना हळूहळू का होईना प्रयत्नाने याही गोष्टी जमू लागल्या.

  वाढदिवस साजरे करण्यासाठी केक तयार करायचा कसा हाही प्रश्न सगळ्यांसमोर उभा ठाकल्याने घरीच केक तयार करण्याची संकल्पनाही याच काळात जोर धरू लागली आणि ती अंमलातही आणली गेली. याच काळात सर्वाधिक खप वाढला तो दुकानदारांचा कारण केकसाठी लागणारं साहित्य हे काळात मोठ्या प्रमाणात विकलं गेलं. यातही बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, इनो या गोष्टींनी तर उच्चांक मोडले.

  कधी नव्हे न खपणाऱ्या ब्रँडचाही खप  इतका वाढला की, विचारायची सोय नाही. याच काळात घरबसल्या अनेकांना नवनवीन कल्पनाही सुचू लागल्या. त्यातलीच एक कल्पना म्हणजे ‘डालगोना कॉफी’. ही कॉफी बनवायलाही इतका वेळ लागत असला तरी लोकांनी हौस म्हणून त्यातही हात आखडला असला तरी हे इतकं मनावर घेतलं होतं की, काहीही झालं तरी ही कॉफी आम्ही बनवणारच आणि तिचा आस्वादही घेणारच. मग काय माणसं यातच बिझी व्हायला लागली ना राव.

  झटपट रेसिपी तयार करण्याच्या छंदात लोकांनी यासाठी लागणाऱ्या पदार्थांसोबतच 'इनो'चाही सर्वाधिक वापर केला.याचा वापर सर्वाधिक झाला तो ढोकळा तयार करण्यासाठी कारण ढोकळा तयार करण्यासाठी ढोकळ्याचं मिश्रण हेही इडलीच्या मिश्रणासारखंच आंबायला हवं म्हणून यात इनोचा वापर अधिक वाढला. अगदी आयत्या वेळी म्हणजे ढोकळा तयार करण्यासाठी ५ मिनिटं आधी ढोकळ्याच्या मिश्रणात तुम्ही इनोचा एक सॅशे जरी वापरलात तरी तुम्ही हवा तसा हलका फुलका ढोकळा तयार करू शकता. याने दोन गोष्टी होतात. पदार्थ तर चांगला तयार होतोच पण यात इनोचा वापर केला असल्याने अपचनाची समस्याही दूर होते. म्हणजेच जिभेचे चोचले पुरवल्याचही समाधान आणि ढोकळा हा प्रयोगात्मक तयार केलेला असला तरी त्यातून पोट बिघडणार नाही याची निश्चिंतच खात्री.

  इनोचा खप किती झाला याबाबत कुतूहल म्हणून विचारणा केली असता कामोठेस्थित नीळकंठ मेडिकल स्टोर्सचे प्रशांत बारवे यांनी पहिल्या लॉकडाऊनच्या काळात इनेच्या २ हजार सॅशेची विक्री झाल्याचे सांगितले.

  शेवटी ज्याला चवीने खायचं आहे तो काहीही करून त्याच्या आवडीचे पदार्थ तयार करण्यासाठी काहीतरी जुगाड करून येण-केण-प्रकारेण तो पदार्थ तयार करणार आणि त्याचा आस्वादही तेवढ्याच चवीने घेणार.