mahatma gandhi

विश्ववंदनीय बापू हे महापुरुष होते. महात्मा गांधीजींची १५१ वी जयंती देशवासीयांना सद्यपरिस्थितीबाबत नव्याने विचार करण्यास बाध्य करण्यास प्रेरणादायी ठरणार आहे. तथापि वस्तुस्थिती मात्र विपरीत आहे. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालणारे नेतेच त्यांच्या सिद्धांतापासून दूर गेल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रपिता महात्महा गांधी (Gandhiji) हे व्यक्ती नसून संस्था होते. त्यांनी देशवासीयांना सत्य. अहिंसेबरोबरच जीवन जगण्याची नवी दिशा दाखविली. असे महापुरुष अनेक पिढ्यांनतर जन्माला येत असतात. त्यांचे विचार (thoughts) येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरतील. विश्ववंदनीय बापू हे महापुरुष होते. महात्मा गांधीजींची १५१ वी जयंती देशवासीयांना ( country) सद्यपरिस्थितीबाबत नव्याने विचार करण्यास बाध्य करण्यास प्रेरणादायी ठरणार आहे. तथापि वस्तुस्थिती मात्र विपरीत आहे. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालणारे नेतेच त्यांच्या सिद्धांतापासून दूर गेल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी महात्मा गांधी यांना पाहिलेसुद्धा नाही असे बुजुर्ग नेतेच आज आम्हाला त्यांचा विचार सांगू लागले आहेत. गांधीजींनी रामराज्याची कल्पना केली होती. त्यांनी संयम, सदाचार, सहिष्णुता, सहकार्य आणि नैतिकता सांगितली होती. महिलांना समाजामध्ये परुषाबरोबरचा हक्क मिळाला पाहिजे. महिलांचा सन्मान करण्याची शिकवण त्यांनी दिली होती. स्वदेशींचा मंत्र त्यांनी देशवासींना दिला होता. परंतु, सध्या देशाची परिस्थिती बघितली तर देशात या विपरीतच सारं काही घडत आहे. आजचे राजकारण आणि सामाजिक व्यवहार गांधीजीच्या सिद्धांतांच्या अनुरुप होताना दिसत नाही.

हिंसा, व्यासनाधीनता आणि दुष्कर्म

वर्तमानपत्र आणि दुरदर्शनवर सर्वाधिक बातम्या दुष्कर्म, खून आणि नशाखोरी बाबतच्या असतात. नशाखोरी मनुष्याचा विवेक नष्ट करीत असतो. सहिष्णुता आणि सहनशीलता नशाखोरीमुळे संपुष्टात येते. सुशिक्षित लोकसुद्धा कायदे हातात घेताना दिसत आहेत. मध्यप्रदेशात पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्या पत्नीला मारहाण केली. देशात निर्भया प्रकरणासारख्या घटना राजरोसपणे होताना दिसत आहेत. उ. प्र. मधील हाथरस येथे सामूहिक अत्याचाराचे प्रकरण नुकतेच घडले आहे. मनुष्यामधील माणुसकीच संपुष्टात आलेली आहे. बॉलिवूडमध्ये बहुतांश कलाकार ड्रग्ज घेतात. कित्येक नेतेसुद्धा ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत. देशात संपन्नता वाढली, परंतु याबरोबरच लोक माणुसकी हरवून बसले आहेत. महात्मा गांधींना असा भारत हवा होता का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

सहिष्णुतेचा अभाव

आज अहिंसेची जागा हिंसेने घेतली आहे. लहान-लहान भांडणातसुद्धा एकमेकांचे खून होताना दिसत आहे. एखाद्याला चालता-चालता धक्का लागला किंवा एखाद्याने गाडीला साईड दिली नाही तरी भांडणं होताना दिसत आहे. एकूणच सहिष्णुता संपलेली आहे. गांधीजीनी अहिंसा आणि सविनय कायदेभंगाची शिकवण दिली होती. परंतु आज सर्वत्र हिंसाचार बोकाळला आहे. गांधीजीं जेव्हा द. आफ्रिकेत होते. तेव्हा तेथे इ.स. १८९३ मध्ये रेल्वेतून प्रवास करताना, प्रथम श्रेणीचे तिकिट असातनासुद्धा गोऱ्या इंग्रजांनी त्यांना गाडीतून ढकलून दिले होते. तेव्हापासूनच गांधीजींनी वर्णभेदाविरुद्ध आंदोलन करण्याचा संकल्प केला. गांधीजींचा अहिंसक सत्याग्रह तेव्हापासूनच सुरु झाला. बदला घेण्याच्या राजकारणावर गांधीजींचा विश्वास नव्हता तर त्यांचा माणसांच्या ह्रदय परिवर्तनावर विश्वास होता. आजच्या काळात उच्च नैतिकता संपुष्टातच आलेली आहे. सहिष्णुतेच्या ऐवजी सांप्रदायिकता आलेली आहे. गांधीजींनी स्वदेशीला स्वाभिमानाशी जोडले होते. विदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकला होता. परंतु सद्यपरिस्थिती तर सर्वत्र विदेशी संस्कृतीचा पगडा आहे. जागतिकीकणाच्या नावाखाली विदेशी कंपन्यांनी भारतात जाळेच पसरविले आहे. सर्वत्र हुक्का बार, फॅशन शो, क्लब संस्कृतीचे जाळे विणल्या गेले आहे. हे सर्व बघून कोण म्हणेल की, असे गांधीजींनी म्हटले आहे. परंतु आजच्या संधिसाधूपणाच्या राजकारणात गांधीजींची ही शिकवण कोणीही अंगीकारताना दिसत नाही. आमदार-खासदारांची खरेदी होताना दिसत आहे. राजकारण हे पैसा कमविण्याचे साधन बनले आहे. सिद्धांताचे राजकारण पुरते संपुष्टात आले आहे. गांधीजींनी म्हटले होते. भारत हा खेड्यांचा देश आहे. खरा भारत गावखेड्यातच आहे. परंतु आज गावखेड्यातील शेतकरी सर्वाधिक उपेक्षित वर्ग आहे. शहर वाढत आहे. तर खेडे ओस पडू लागली आहे.