social media

हेरगिरीमुळे लोकांची जन्मतिथी, पत्ते, वैवाहिक स्थिती, नातेवाईक, राजकीय संबंध इत्यादी माहिती मिळविण्यात आली आहे. ही चिनी कंपनी गुगल, फेसबुक, ट्विटर, लिंक्ड इन, इन्स्टाग्राम व टिकटॉक अकाउंटवरुन माहिती एकत्र करीत आहे.

काही समान्य गोष्टींसाठी उगाचच गोंधळ निर्माण होतो. अता मीडियामध्ये (social media platforms) बातमी पसरली की, झेन्हुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी लिमिटेड ही चीनची कंपनी भारतीय राजकीय नेते, सेनाधिकारी, ब्युरो क्रेट, उद्योगपती, संशोधक, न्यायाधीश, शिक्षणतज्ज्ञ, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज, पत्रकार व धार्मिक नेत्यांची हेरगिरी करीत आहे. तसेच या कंपनीने राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेते व सरन्यायाधीश, केंद्रीय मंत्री व राज्यांचे मुख्यमंत्री यांच्याविषयी माहिती गोळा केली आहे. या हेरगिरीमुळे लोकांची जन्मतिथी, पत्ते, वैवाहिक स्थिती, नातेवाईक, राजकीय संबंध इत्यादी माहिती (General informatio) मिळविण्यात आली आहे. ही चिनी कंपनी गुगल, फेसबुक, ट्विटर, लिंक्ड इन, इन्स्टाग्राम व टिकटॉक अकाउंटवरुन माहिती एकत्र करीत आहे. या कंपनीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश ए.एम. खानविलकर, कॅग जीसी मुर्मू, लोकपाल जस्टिस पी.सी. घोष यांच्याशिवाय उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, शिवराजसिंह चौहान, नवीन पटनायकसारख्या मुंख्यमंत्र्यांची माहिती मिळविला आहे. तसेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद, निर्मला सितारामण, स्मृती इराणी, पीयूष गोयल यांसहित इतरांवरही या कंपनीची नजर आहे. टाटा, अदानीसारख्या औद्योगिक घराण्यांचीही माहिती मिळविण्यात आली आहे.

अनेक देशांचा लेखाजोखा

या कंपनीच्या माहितीमध्ये कोणतीही माहिती गुप्त राहू शकत नाही. या कंपनीकडे अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी व युएईसाख्या देशांची माहिती आहे. जगाच्या २४ लाख व्हीआयपी लोकांच्या या डाटा बेसमध्ये भारताच्या १०,००० लोक व संघटना तसेच ऑस्ट्रेलियाच्या ३५,००० लोकांचा समावेश आहे. आपल्या राजकीय, व्यापारी, सामाजिक, सांस्कृतिक नीतींच्या पालन व उभय संबंधामध्ये अशा माहितीचे विशिष्ट महत्त्व असते. सोशल मीडियामुळे जगातील अनेक देश एकमेकांच्या जवळ आले आहेत. नेत्यांचे परराष्ट्र दौरे व भेटीगाठी यामुळे वाढल्या आहेत. तो जुना काळ गेला जेव्हा कोणताही देश फक्त स्वतः पुरताच मर्यादित होता व त्याच्याकडे दुसरीकडे लक्ष देण्याचा वेळ नव्हता. आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे.

सरकारला सगळे माहीत होते

सरकारला चीनच्या हालचालीबाबत पूर्वीपासूनच माहीत होते. याच कारणामुळे अनेक चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण हा डेटा लिक होत होता, चिनी कंपन्या डेटा लिक करुन चिनी कम्युनिस्ट पार्टी व एजन्सींना देत होत्या. सध्या चीनसोबतचे भारताचे संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत व सीमेवर युद्धसदृश परिस्थिती आहे. त्यामुळेच अशा प्रकारची हेरगिरी देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक मनाण्यात येत आहे. हे देखील तेवढेच खरे आहे की, सर्व माहिती कोणत्याही वर्गीकृत किंवा क्लासीफाईड डेटातून चोरण्यात आली नाही. तर सर्व माहिती ही ओपन सोर्ममधून उचलण्यात आली. परंतु चीनसारखा शत्रू देश या माहितीचा चुकीचा उपयोग करु शकतो, अशा शक्यता आहे. स्क्रॅपिंग सॉफ्टवेअर या ओपन सोर्स डेटाला डोजियरमध्ये बदलू शकतो, ज्यामुळे एजन्टचे काम सोपे होईल.

प्रत्येक देश माहिती गोळा करतो

एक काळ होता जेव्हा रशिया व चीनमध्ये काय होत आहे, याविषयी कोणालाही कळत नव्हते. तेव्हा जॉन गुंथरची पुस्तके इनसाईड रशिया व इनसाईड चायनातून या देशांविषयी काही माहिती मिळत होती. बोरिस पेस्टनकँकच्या कॅन्सर वॉर्ड या कादंबरीतून रशियाची अंतर्गत परिस्थिती समोर आली होती. हा देश त्यावेळी लोहकपाट किंवा आर्यन कर्टन म्हणून ओळखला जात होता. आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सॅटेलाईटने जगातील कोणत्याही देशातील कोपरा न कोपरा पाहता येऊ शकतो. कोणत्याही देशातील किती लढाऊ विमान, पाणबुड्या आहेत, किती लष्कर तैनात आहे. तो देश कोणत्या तंत्रज्ञानावर काम करीत आहे. अशा गोष्टी गुप्त राहू शकत नाही. प्रत्येक देशाची गुप्तहेर संस्था आहे. रशियाची केजीबी, अमेरिकेची सीआयए, ब्रिटनची एमआय-६, पाकिस्तानची आयएसआय व भारताची आरअॅण्डडब्ल्यु या गुप्तहेर संस्था आहेत. प्रत्येक देशाचे सरकार स्वतःच्या हितासाठी माहिती गोळा करते. यासाठी अंडरकव्हर एजंटदेखील असतात. काही डबल एजंट असतात जे एका देशाकडून माहीती मिळविण्याचा प्रयत्न करतात. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. सोशल मीडिया व फोन कॉल टेप केल्यामुळेही अनेक प्रकारची माहिती मिळविता येते. म्हणून यात कोणतेही वेगळेपण नाही.