rain in marathwada

विदर्भाप्रमाने मराठवाडासुद्धा मागासलेला आहे. पाण्याअभावी येथे मोठ्या प्रमाणावर अनुशेष वाढलेला आहे. मराठवाड्याने महाराष्ट्राला शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख इत्यादी मुख्यमंत्री दिलेत. परंतु हे मुख्यमंत्री सुद्धा मराठवाड्याचे मागासलेपण दूर करु शकले नाहीत. निसर्गसुद्धा मराठवाड्यावर कोपला होता.

गेल्या दशकापासून मराठवाड्यावर (Marathwada) दुष्काळाचे सावट आहे. निसर्गाची या विभागाकडे वक्रदृष्टी होती. महाराष्ट्राच्या इतर विभागात पाऊस (Rain) पडत असताना मराठवाड्यात मात्र पावसाचा एक थेंबही पडत नव्हता. मराठवाड्यातील सर्व धरण कोरडी पडली होती. पिण्याच्या पाण्यासाठी (Water) महिलांना सारखी भटकंती करावी लागत होती. लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद, परळी वैजनाथ इत्यादी विभागाची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. या विभागातील जनतेला ट्रेनद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. पिण्यासाठी लोकांना पाणी मिळत नव्हते. पाण्याअभावी या परिसरातील कारखाने बंद पडले होते.

विदर्भाप्रमाने मराठवाडासुद्धा मागासलेला आहे. पाण्याअभावी येथे मोठ्या प्रमाणावर अनुशेष वाढलेला आहे. मराठवाड्याने महाराष्ट्राला शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख इत्यादी मुख्यमंत्री दिलेत. परंतु हे मुख्यमंत्री सुद्धा मराठवाड्याचे मागासलेपण दूर करु शकले नाहीत. निसर्गसुद्धा मराठवाड्यावर कोपला होता. लातूरमध्ये तर भूकंपाने प्रचंड हानी झाली होती.

यावर्षी ३२ टक्के पाऊस

यावर्षी मात्र मराठवाड्यात ३२ टक्के पाऊस झाला आहे. ही या विभागासाठी अत्यंत सुखावह बाब आहे. मराठवाड्यातील सर्व धरणं यावर्षी तु़डुंब भरलेली आहेत. मराठवाड्याचे जलसंकट दूर झाले. त्यामुळे आता सिंचनाची सोय झालेली आहे. कारखान्यांनाही आता भरपूर पाणी मिळणार आहे. मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भात यावर्षी केवळ ९ टक्केच पाऊस पडला आहे. मराठवाड्याबरोबरच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही भरपूर पाऊस झालेला आहे. यावर्षी पाऊस उशिरा आला असला तरी संपूर्ण राज्यात मात्र सरासरी पाऊस पडला आहे. मराठवाड्यातील बीड येथे ४९ टक्के तर परभणीत २० टक्के पाऊस पडल्याची नोंद करण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्रात ३१ टक्के पाऊस पडला आहे. विदर्भात मात्र आतापर्यंत सरासरी पाऊस पडला आहे. अकोला येथे २६ टक्के, यवतमाळमध्ये २३ टक्के, अमरावती येथे १९ टक्के आणि चंद्रपूर येथे १५ टक्के पाऊस पडल्याची नोंद करण्यात आलेली आहे.