बॉलिवूडच्या झगमगाटातील भयावहता

सिनेसृष्टीसाठी २०२० हे वर्ष तसे अशुभच म्हणावे लागेल. या वर्षात आम्ही अनेक चमकते अभिनेते गमावून बसलो. सुशांत राजपूत हा त्यापैकीच एक आहे. तो धुमकेतूप्रमाणे सिनेक्षितिजावर चमकला व निघून गेला. एक

 सिनेसृष्टीसाठी २०२० हे वर्ष तसे अशुभच म्हणावे लागेल. या वर्षात आम्ही अनेक चमकते अभिनेते गमावून बसलो. सुशांत राजपूत हा त्यापैकीच एक आहे. तो धुमकेतूप्रमाणे सिनेक्षितिजावर चमकला व निघून गेला. एक अत्यंत प्रतिभाशाली युवक आपल्या अभियानाची छाप सोडताना तो म्हणाला होता ‘आत्महत्या समस्यांवरील उपाय नाही’ तेव्हा त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले असेल? असा कुठला एवढा मोठा तणाव होता की त्याने जगण्यावरच पूर्णविराम दिले? ३४ वर्षाचे वय हा कर्तबगारीचा काळ आहे स्वताला संपविण्याचा नाही. ५० स्वप्नांना आपल्या इंस्टाग्रामवर लिहिणारा तेथे पोहोचण्यापूर्वीच अंत्योयात्रेवर निघाला हा भागच मनाला बोचणारा ठरतो आहे. अभिनयाच्या पंखानी आकाशात उंच भरारी घेण्याचे कौशल्य त्याच्या ठायी होते. यासाठी त्याच्यापुढे भरपूर वेळही होता. पण असे काहीच न होता त्याने आत्महत्या केली. हे पाऊल उचलण्यापूर्वी त्याने शंभरदा विचार करायला होता असेच आता मनोमन वाटत आहे. सुशांत राजपूतची आत्महत्या मीनाकुमारी, गुरुदत्त सारख्या हळव्या मनाच्या सिने चेहऱ्यांनी आठवण करुन गेली. गुरुदत्त जिनियस होते. गीता दत्त व वहिदा रहेमान यांच्या प्रेमत्रिकोणात सापडलेले गुरुद्त्त कागज के फूल चित्रपटाच्या विफलतेने खचले होते. मिनाकुमारी अभिनेत्री होती. तशी ती उच्च दर्जाची शायरी सुद्धा करीत होतो. दारुच्या आहारी गेली अन तिने स्वत:ला संपवून टाकले. व्यक्तीच्या अपेक्षा खूप असतात. 

काय कारण असू शकते?

सुशांतची पूर्वीची मैत्रिण अंकिता लोखंडेने गेल्या आठवड्यात एका उद्योगपतीसोबत लग्न केले होते. त्यानंतर ९ जून रोजी सुशांतची माजी व्यवस्थापिका २८ वर्षीय दिशा सालियानने बिल्डिंगवरुन उडी घेत आत्महत्या केली होती. सुशांतच्या मामांच्या मते अनेक विसांपासून एक मुलगी सुशांतला त्रस्त करीत होती. ती कोण हे मात्र कुणी स्पष्ट केले नाही. यातच लॉकडाऊनमध्ये सारे काम चौपट झाल्यामुळे तो पूर्णत: रिकामा होता. काँग्रेसी नेते संजय निरुपम म्हणाले की, सुशांतसिंह पासून ७ सिनेमे हिसकावण्यात आले होते. कुटुंबातील व्यक्ती व मित्र मंडळी सजग राहिली असती तर खचण्यातून त्याला बाहेर काढता आले असते. पण सिनेसृष्टीतील बहुतांश संबंध मायावी असतात. येथे कुणी कुणाचे नसते. येथे एकटेपणा व हताश होण्याचा अंधार असतो. असुरक्षा तर एवढी असते की विचारता सोय नाही. शुटिंगचे अहोरात्र कष्ट उपसल्यानंतर त्याचा सिनेमा चालेल याची खात्री नसते. निर्माते वेळीच पैसे देतील असे होत नाही. खर्चाचा भार सोसणे अवघड होते. या चकाचक कारभारात आपले अस्तित्व त्याला दिसत नाही. सुशांत समोर हा भाग नव्हता तरी निराशेने तो मात्र खचला होता. छोट्या पडद्यावर पवित्र रिश्ता नंतर एक-दोन सिरियल्सला हात घालीत धोनी केदारनाथ सारख्या चित्रपटांना हात घातला होता. धोनी साठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. अभिनयाची एक उंची त्याने गाठली होती.