मीच आहे तो रिंगमास्तर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीचा प्रोटोकॉल, माझं म्हणणं सगळ्यांनी निमूटपणे ऐकायचं

मोदींच्या बैठकीतील ही शिस्तच आहे की, प्रत्येकाने मोदी जे बोलतात ते शांततेने ऐकून घ्यावे आणि मोदींच्या प्रत्येक शब्दांचे आणि सूचनांचे पालन करावे असाच या बैठकीचा हेतू असतो. त्यांच्या सूचनांबद्दल जर कोणी शंका उपस्थित केली किवा कोणी प्रश्‍न विचारला तर तो शिस्तीचा भंग केल्यासारखे होईल.

  ममतांना माहीत नाही

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीचा प्रोटोकॉल बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजींना माहीत नाही का? कोणत्याही मिटिंगमध्ये फक्त मोदीच बोलतात आणि इतर सर्व लोक शांततेने त्यांचे म्हणणे ऐकत असतात. या बैठकीमध्ये कोणीही मोदींना प्रश्‍न विचारत नाही की कोणी चर्चाही करीत नाही. मोदी यांनी जेव्हापासून देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हापासून हे असेच सुरू आहे. मागील ७ वर्षांपासून ममतांना हे माहीत नसावे, याबद्दल आश्‍चर्य वाटते.

  मोदींच्या बैठकीतील ही शिस्तच आहे की, प्रत्येकाने मोदी जे बोलतात ते शांततेने ऐकून घ्यावे आणि मोदींच्या प्रत्येक शब्दांचे आणि सूचनांचे पालन करावे असाच या बैठकीचा हेतू असतो. त्यांच्या सूचनांबद्दल जर कोणी शंका उपस्थित केली किवा कोणी प्रश्‍न विचारला तर तो शिस्तीचा भंग केल्यासारखे होईल. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दल कोणतीही तक्रार केली नाही, मात्र पंतप्रधानाच्या बैठकीच्या या शिस्तीबाबत ममता मात्र खवळल्या. पंतप्रधानासोबतच्या या बैठकीत १० राज्यांचे मुख्यमंत्री आणि ५४ जिल्हाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानांनी आम्हाला जणू कठपुतळी बनवून टकले आहे.

  या बैठकीत आमचा अपमान झालेला आहे, असे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. जर मुख्यमंत्र्यांना या बैठकीत बोलण्याची संधीच द्यायची नव्हती तर आम्हाला बैठकीसाठी बोलावलेच कशाला, असा प्रश्‍न ममता यांनी उपस्थित केला. हा एकपक्षीय संवाद नसून एकपक्षीय अपमान होता. पंतप्रधान स्वतःला असुरक्षित का समजतात, असे ममता म्हणाल्या.पंतप्रधानासोबतच्या या बैठकीत कोरोना लसीकरण, लसींचा पुरवठा, ऑक्सिजन, रुग्णालयातील गैरव्यवस्था, ब्लॅक फंगस इत्यादी मुद्दयांवर चर्चाच झाली नाही. राज्य सरकारांना या संदर्भात बोलण्याची संधी द्यायला पाहिजे होती, परंतु तसे काहीही या बैठकीत झाले नाही, असा आरोपही ममतांनी केला.

  प्रत्येक ठिकाणी राजकारण नको

  व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधानासोबत झालेल्या या बैठकीत देशातील सर्व राज्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला मुख्यमंत्र्यांची काहीही आवश्यकता नव्हती. पंतप्रधान मोदींना जिल्हाधिकाऱ्यांसोबतच संवाद साधायचा होता. त्यांना कोरोना व अन्यबाबतीत आवश्यक ते निर्देश देण्यासाठी या बैठकीचे त आयोजन करण्यात आले होते. एकूणच या बैठकीचे स्वरूप प्रशासकीय होते. भाजपनेसुद्धा म्हटले आहे की, जर ममता बॅनजींना काही मुद्दे मांडायचे होते तर त्या या बैठकीला का उपस्थित राहिल्या नाही? ममता बॅनर्जी आतापर्यंत पंतप्रधानासोबतच्या बैठकींवर सतत बहिष्कार टाकत आल्या आहेत . कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीबाबत योग्य-अयोग्य असे काहीही बोलले नसताना एकट्या ममता बॅनर्जीच आपल्याला या बैठकीत बोलण्याची संधी दिली नाही, असे का म्हणाल्या?

  ममता लोकशाहीवादी आहेत काय?

  ममता बॅनर्जी जेव्हा देशाच्या रेल्वेमंत्री होत्या, तेव्हा त्या दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात उपस्थित न राहता कोलकात्यावरूनच रेल्वे मंत्रालयाचा कारभार चालवित होत्या . रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आवश्यक त्या सर्व फाईल्स घेऊन त्यावर ममतांच्या सह्या करून घेण्यासाठी दिल्लीवरून कोलकात्याला जात होते. एक वेळा जेव्हा तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग बांगलादेशाच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा ममताबॅनर्जींना सोबत घेऊन जाण्याचे त्यांनी ठरविले होते. ममतांना त्यासाठी सूचनाही करण्यात आली, परंतु ममता यांनी या दौऱ्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला. फरक्का धरणाच्या मुद्दयावर तत्कालीन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासोबत डॉ. मनमोहनसिंगांना चर्चा करायची होती व त्यासाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित असाव्यात असे डॉ. ‘मनमोहनसिंगांना वाटत होते. ममता बॅनर्जी यांचे वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग आणि मोदीसोबत कधीच पटले नाही. त्या नेहमीच हुकूमशहासारख्या वागल्या. इतकेच नव्हे तर ममतांवर कार्टून काढणाऱ्या एका चित्रकाराला त्यांनी अटकही केली होती.

  आता बोलायचेच काय होते?

  मार्च-एप्रिलमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान ममता आणि मोदी एकमेकांच्या विरोधात खूप बोलले, आता त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीही शिल्लक राहिलेले नाही. मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी दिली नाही . ही बैठक मुख्यमंत्र्यांसाठी नव्हतीच. आता मतांना जर काही बोलायचे असेल तर त्या स्वतंत्रपणे आपले निवेदन जारी करू शकतात.

  मोदींची कार्यशैली

  ‘मन की बात’ सांगणाऱ्या मोदींचा एकतर्फी संवादावर विश्‍वास आहे. ते वृतपत्रांना (मीडियाला) मुलाखतसुद्धा देत नाहीत. आतापर्यंत त्यांची फक्त अभिनेते अक्षयकुमार यांनी एकदाच मुलाखत घेतली होती. त्यावेळी अक्षयकुमारने राजकारणाशी संबंधित कोणतेही प्रश्‍न त्यांना विचारले नव्हते. पक्षाच्या खासदारांच्या बैठकीतही मोदी एकटेच बोलतात. उपस्थित सर्व जण शांततेने त्यांचे म्हणणे ऐकून घेत असतात आणि हीच त्यांची कार्यशैली आहे.

  I am the ringmaster The protocol of the meeting of Prime Minister Narendra Modi everyone only to listen to me