In the realm of control nrvb

मोबाईल, टीव्ही, laptop, tab वापरून इंटरनेटवर जाणे ही सहज साध्य असणारी आणि आताच्या काळात मुबलक प्रमाणात कुठेही उपलब्ध असणारी गोष्ट असल्याने मुलं सहज त्याकडे आकर्षित होतात. अशावेळी त्यांचे मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. स्क्रीन टाइम मर्यादित असावा ही गरज आरोग्य मंत्रालयाने देखील ओळखलेली आहे आणि म्हणूनच यावर्षी ऑनलाईन शाळांना परवानगी देतांना त्यांनी मुलांच्या वयोगटानुसार ऑनलाईन शाळांच्या वेळेचे गणित आखून दिले आहे.

मनिषा नित्सुरे- जोशी

मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित असणे अत्यंत गरजेचे आहे. ही गरज ओळखूनच यावर्षी ऑनलाईन शाळांना परवानगी देतांना मुलांच्या वयोगटानुसार ऑनलाईन शाळांच्या वेळेचे गणित आखून दिले गेले. मुलांच्या डोळ्यांचा आणि एकूणच आरोग्याचा विचार यामागे केलेला दिसतो. मग हाच विचार आपणही मुलांच्या हातात मोबाईल देताना का करू नये? स्क्रीन टाइमवर नियंत्रण आणायचे म्हणजे नेमके काय करायचे? याचा उहापोह या लेखात.

मागच्या आठवड्यात आपण ‘मोबाईल गेमिंग… जरा जपून’ या लेखात मुले कशी मोबाईल गेमिंगच्या आणि इतर डिव्हाइसेसच्या आहारी जात आहेत याविषयी तसेच त्याच्या बऱ्या-वाईट परिणामांविषयी आपण बोललो होतो. एकूणच ऑनलाईनच्या जाळ्यात मुले बेमालूमपणे अडकत चालली आहेत आणि यावर वेळीच नियंत्रण आणले नाही तर ते वैयक्तिक तसेच सामाजिक आरोग्यास धोकादायक ठरू शकते याची उदाहरणेही आपण पाहिली. पण नियंत्रण आणायचे म्हणजे नेमके काय करायचे? हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो. विशेषतः ज्यांना तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसते असे पालक हतबल होऊन हा प्रश्न विचारतात. तर काही पालक ‘आमची मुले तासनतास त्या मोबाईल, कम्प्युटरवर काय बघतात त्यांनाच माहित! त्याला/तिला सगळं कळतं त्या मोबाईलमधलं. आम्हालाच त्यातलं काही कळत नाही.’ अशी लाडिक तक्रार करणारे असतात. पालक बरेचदा तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत अनभिज्ञ असतात किंवा ज्यांना तंत्रज्ञान थोडेफार अवगत असते ते सुद्धा मुलांच्या मोबाईल/टॅब वापरावर नियंत्रण आणण्यात बरेचदा अयशस्वी होतात. मग हे नियंत्रण आणायचे म्हणजे नेमके काय करायचे, मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घ्यायचा की त्यांच्या हाती मोबाईल पडू नये अशा ठिकाणी लपवून ठेवायचा? पण मग आम्हाला कामासाठी मोबाईल लागतो त्याचे काय? इंटरनेट बंद ठेवायचे का? की मोबाईलच बंद ठेवायचा? असे अनेक प्रश्न!
मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण आणायला तर हवेच आहे कारण हा वापर आता व्यसनाकडे झुकू लागला आहे. मोबाईल, टीव्ही, laptop, tab वापरून इंटरनेटवर जाणे ही सहज साध्य असणारी आणि आताच्या काळात मुबलक प्रमाणात कुठेही उपलब्ध असणारी गोष्ट असल्याने मुलं सहज त्याकडे आकर्षित होतात. अशावेळी त्यांचे मानसिक आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. स्क्रीन टाइम मर्यादित असावा ही गरज आरोग्य मंत्रालयाने देखील ओळखलेली आहे आणि म्हणूनच यावर्षी ऑनलाईन शाळांना परवानगी देतांना त्यांनी मुलांच्या वयोगटानुसार ऑनलाईन शाळांच्या वेळेचे गणित आखून दिले आहे. मुलांच्या डोळ्यांचा आणि एकूणच आरोग्याचा विचार यामागे केलेला दिसतो. मग हाच विचार आपणही मुलांच्या हातात मोबाईल देताना का करू नये? त्यादृष्टीने या लेखात आपण काही मुद्दे बघू ज्यायोगे मुलांचा स्क्रीन टाइम आपण मर्यादित करू शकतो.

एक गोष्ट इथे मान्य करावी लागेल ती म्हणजे आपण सगळेच डिजिटल युगात राहत आहोत; जिथे इंटरनेट हे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांसाठीच अगदी सहज उपलब्ध आहे. परंतु इंटरनेट जितके उपयुक्त आहे तितकेच, कोणत्याही देखरेखीशिवाय मुलांना इंटरनेटचा वापर करू देणे तितकेच धोकादायक देखील आहे. मुले इंटरनेटवर काय करतात, काय पाहतात यावर देखरेख ठेवणे आवश्यक आहे, प्रत्यक्ष देखरेख ठेवणे प्रत्येक वेळी शक्य असेलच असे नाही म्हणूनच ‘पॅरेंटल कंट्रोल’ची मदत घेतली पाहिजे. मुलांसाठी इंटरनेटचा वापर मर्यादित आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ‘पॅरेंटल कंट्रोल’आवश्यक आहे.’पॅरेंटल कंट्रोल’ हा मोबाईल, संगणक, लॅपटॉपवरील एक विशिष्ट पर्याय आहे. याअंतर्गत पालक मुलांच्या इंटरनेट वापरावर विविध प्रकारचे नियंत्रण आणू शकतात, जसे की स्क्रीन टाइम, कंटेंट, वयोगट, कायदेशीर बाबी, प्रायव्हसी इत्यादी. अश्लीलता किंवा प्रौढांसाठी असलेल्या वेबसाईट, व्हिडीओ इत्यादी ऑनलाइन कंटेंट तसेचअयोग्य वेबसाईटवर जाण्यापासूनप्रतिबंधित करू शकतात. अयोग्य वेबसाइट्स अवरोधित करणे, मुलांचा स्क्रीन टाइम निश्चित करणे आणि काही वेळेस मुलांच्या इंटरनेट वापराचे निरीक्षण करणे यामुळे शक्य होते. सायबर गुन्हे, डिजिटल माध्यमाचे व्यसन आणि इंटरनेटच्या अति वापरामुळे मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या वर्तणूकीच्या समस्या टाळायच्या असतील तर हे नियंत्रण आणणे आवश्यक आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंगपॅरेंटल कंट्रोल, इंटरनेट ब्राउझरसाठी पॅरेंटल कंट्रोल, सेल फोन, अँड्रॉइडपॅरेंटल कंट्रोल, आयफोन आणि आयपॉड पॅरेंटल कंट्रोल, संगणक ऑपरेटिंग सिस्टम, ॲपलपॅरेंटल कंट्रोल, इंटरनेट कंटेंट फिल्टरअसे ‘पॅरेंटल कंट्रोल’चे विविध पर्याय आहेत. याशिवाय पॅरेंटल कंट्रोल ॲप्स डाऊनलोड करून तुम्ही ही गोष्ट साध्य करू शकता. ‘पॅरेंटल कंट्रोल’चे अनेक फायदे आहेत. यामुळे मुलांच्या इंटरनेट आणि एकूणच मोबाईल वापरावर बंधने तर येतातच पण त्याचबरोबर त्यांचा स्क्रीन टाइम (जो विषय आज कळीचा मुद्दा बनलेला आहे.) कमी करणे शक्य होते. स्क्रीन टाइम कमी केल्यास मुले वेळेवर आणि चांगली, पुरेशी झोप घेऊ शकतात. त्यांच्यातील आक्रमक वर्तन कमी होऊन सकारात्मक वर्तनात वाढ होऊ शकते म्हणूनच स्क्रीन टाइम कमी करणे महत्त्वाचे आहे.

तुमची मुले इंटरनेटवर काय पाहतात असे पालकांना विचारले की शंभरातील नव्वद पालक, ‘मुलांना इंटरनेटवर व्हिडिओ पाहायला आवडतात.’ असे सांगतात. यूट्यूबवर कोणतेही व्हिडीओ पाहणे नक्कीच योग्य नाही. म्हणूनच यूट्यूब किड्स हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आले, जे मुख्यत्वे मुलांसाठी डिझाइन केलेले आहेआणि ‘पॅरेंटल कंट्रोल’ने नियंत्रित केलेले व तपासून घेतलेले ॲप्लिकेशन आहे. यूट्यूब किड्स मध्ये शिक्षण, संगीत, वयोगटानुसार उपक्रम यासारखी मुलांसाठी उपयुक्त अशी विविध सामग्री असते. पालक त्यालाही लॉक किंवा पासकोड आणि अर्थातच वेळेचे बंधन ठेवू शकतात. सर्वसामान्य इंटरनेट ब्राउझरचा पॅरेंटल कंट्रोल सेट करण्यासाठी गुगल क्रोम आणि इंटरनेट एक्सप्लोररवर पुढील प्रमाणे सेटिंग करू शकता. गुगल खात्यात लॉग इन करा. Main Menu> Settings> People निवडा > Add Person> Control and View Add> Dashboard and click on My Child> Add parent in permissions. Control Settings निवडा > Lock SafeSearch करा.इंटरनेटएक्सप्लोररवर सेटिंग करण्यासाठी Tools निवडा. Internetoptions निवडा. Content>Click‘Enable’>योग्यस्तर निवडण्यासाठी स्लायडरला अनुकूल करा आणि Save changes वर क्लिक करा.

पालकांनी अँड्रॉइड / आयफोन सुद्धा ‘पॅरेंटल कंट्रोल’ सेट करणे आवश्यक आहे. अयोग्य वेबसाइट्स आणि मोबाइल ॲप्सला यामुळे प्रतिबंध करता येईल आणि मुलांच्या मोबाईल वापरावर मर्यादा आणता येतील.अँड्रॉइडपॅरेंटल कंट्रोलसाठी गुगल खात्यात साइन इन करा. Play Store> Settings>Parental Controls> Create PIN>प्रत्येक श्रेणी सेट करा आणि किती नियंत्रण ठेवायचे हे ठरवा. आयफोन आणि आयपॉडवर पॅरेंटल कंट्रोल सेट करण्यासाठी कंटेंट आणि प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जा. स्क्रीन वेळ, स्क्रीन टाइम पासकोड वापरा. कंटेंट आणि प्रायव्हसी पर्याय सेट करुन वेब कंटेंट आणि ॲरप स्टोअर प्रायव्हसी सेट करू शकता.संगणक ऑपरेटिंग सिस्टमवर जाण्यासाठी मायक्रोसॉफ्ट खात्यात साइन इन करा.मुलाचे खाते सेट करा (विंडोज सेटिंग्ज)>कंटेंट निर्बंध निवडा>ॲप्स, गेम्स, मीडियावर जा. अनुचित खेळ, मीडिया कंटेंट इत्यादी ब्लॉक करा. योग्य वयोमर्यादा निवडा. कंटेंट निर्बंधआणि परवानगी दिलेल्या सूचीवर जाऊन तुमचे पर्याय एकदा तपासून घ्या आणि क्लिक करा. अयोग्य वेबसाइट अवरोधित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट खात्यात साइन इन करा. कंटेंट प्रतिबंधावर क्लिक करा. वेब ब्राउझिंगवर स्क्रोल करा आणि अयोग्य वेबसाइट अवरोधितकरा. ज्या वेबसाइट्स अवरोधित करायच्याआहेतत्याचे यूआरएल ब्लॉक करा.ॲपलवर पॅरेंटल कंट्रोल इंटरनेट कंटेंट फिल्टर असतो. त्यासाठी ॲपल मेनूवर सिस्टम प्रेफरन्स निवडा. पॅरेंटल कंट्रोल निवडा.वापरकर्ता खाते निवडा. पॅरेंटल कंट्रोल ‘इनेबल’ करा आणि कंटेंट टॅब क्लिक करा. यात तीन पर्याय असतात. त्यापैकी एक निवडा (प्रतिबंधित, स्वयंचलित, व्हाईटलिस्ट).याखेरीज MSP, Net Nanny, Mamabear, Custodio, Mobisip, गुगल फॅमिली लिंक यासारख्या पॅरेंटल कंट्रोल ॲप्सच्या मदतीने मुलांच्या इंटरनेट वापराचे परीक्षण करून त्यावर नियंत्रण ठेऊ शकता. संगणक तज्ज्ञ किंवा सायबरसेल तज्ज्ञ यांच्याकडून तुम्ही याविषयाची अधिक माहिती मिळवू शकता आणि मुलांचा इंटरनेट वापर अधिक सुरक्षित करू शकता.

मुलांच्या इंटरनेट वापराचे नियमन करण्यासाठी असे अनेक पर्याय आहेत. शेवटी, मुले कोणत्याही अयोग्य व हानीकारक ठिकाणी ऑनलाइनच्या माध्यमातून प्रवेश करत नाहीत ना, याची खबरदारी पालकांनाच घ्यावी लागणार आहे कारण एका छोट्याश्या मोबाईलमधून अख्खे जग त्यांच्या समोर खुले होत असताना थोडी काळजी तर घ्यावीच लागणार आहे.