सायबर हल्ल्यांच्या सावटाखाली भारत; लोकांच्या सायबर सुरक्षिततेची काळजी घेणे सरकारला महत्त्वाचे वाटत नाही का?

सायबर हल्ला हा आजचा आणखी एक गंभीर प्रश्‍न . सायबर हल्ले रोखण्यासाठी भारतात नवा कायदा निर्माण होणे गरजेचे आहे. अमेरिकेतील सर्वात मोठ्या इंधन पाईपलाईन कंपनीवर नुकताच सायबर हल्ला झाला. त्यानंतर संबंधित भागात आणीबाणी लागू करण्यात आली .

  कोलेनियल पाईपलाईनवर झालेल्या हल्ल्याने अमेरिकेतील पूर्व किनारपट्टीकडील राज्यांत डिझेल, गॅस आणि जेट इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. कारण या पाईपलाईनच्या माध्यमातून दररोज २५ लाख बॅरल तेलाचा पुरवठा होतो. यापैकी ४५ टक्के पुरवठा हा पूर्व किनारपट्टीला होतो. ‘डार्कसाइड’ नावाने एका हॅकर टोळीने हा हल्ला केला. पोलिसांच्या तपासात हॅकरची टोळी उघडकीस आली आणि तातडीने कारवाई करत त्या गटाला ताब्यात घेतले.

  डार्कसाइट सायबर गुन्हेगार जगातील सर्वच देशांना ठाऊक आहेत, असे नाही. परंतु रॅन्समवेअरसारखे हल्ले हे कोणत्याही उद्योगापुरती किंवा कार्यालयापुरतीच मर्यादित राहत नसून कोणत्याही देशाची औद्योगिक व्यवस्था मोडकळीस आणण्याचे काम करू शकते, हे उघड झाले. ब्रिटनची सायबर सिक्युरिटी कंपनी डिजिटल शॅडोजच्या मते, डार्कसाइड ही एक व्यावसायिक कंपनीप्रमाणे काम करते. जी चोरी आणि हॅकिंगसाठी सॉफ्टवेअर तयार करते. यानंतर ती कंपनी गुन्ह्यात सामील होणाऱ्या सहकाऱ्यांना प्रशिक्षण देते आणि सायबर हल्ला कसा घडवून आणायचा, याचे तंत्र शिकवते.

  डिजिटल शॅडोजच्या मते, कोरोना संसर्गामुळे शेकडो इंजिनिअर ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत आणि पाईपलाईन कंट्रोल सिस्टिमला घरातूनच लक्ष ठेवत आहेत. याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. तरी तो जगभरासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. भारतातही वेगाने डिजिटायजेशन होत असताना अशा प्रकारचे हल्ले होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. आजच्या ऑनलाईन पद्धतीच्या गतिमान तंत्रावर भारतही उभा झाला.त्यामुळे सायबर हल्ल्यांच्या सावटाखाली भारतही आहे.

  काही दिवसांपूर्वीच चीनच्या हॅकर्सनी भारतातील सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या लसनिर्मात्या कंपनीवर सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये मुंबईत पॉवर ग्रीड फेल होण्याची घटना घडली होती आणि त्यामुळे मुंबईत काळोख दाटला होता. अमेरिकेच्या मॅसाचुसेटस येथील सायबर सिक्युरिटी कंपनी रिकॉर्डेड फ्यूचरने अहवालात म्हटले की, चिनी सरकारचे पाठबळ असलेल्या हॅकरच्या एका गटाने मालवेअरच्या माध्यमातून मुंबईतील पॉवर ग्रीडला टार्गेट केले होते. अर्थात, केंद्र सरकारने अशा प्रकारच्या सायबर हल्ल्याला दुजोरा दिला नव्हता.

  ‘आयबीएम’च्या सायबर हल्ल्याच्या एका अहवालानुसार, गेल्यावर्षी भारतात ‘लॉकडाऊन होते तर दुसरीकडे आशिया प्रशांत भागात जपाननंतर भारताला सर्वाधिक सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागले. बहुतांश सायबर हल्ले हे बँकिंग आणि विमा क्षेत्राशी निगडित कंपन्यांवर झाले. २०२० मध्ये आशियात झालेल्या एकूण सायबर हल्ल्यात सात टक्के हल्ले भारतीय कंपन्यांवर झाले. सायबर हल्ले कोणत्याही मार्गाने आणि पद्धतीने होऊ शकतात. जसे की संकेतस्थळ डिफेसिंग. यात कोणत्याही सरकारी संकेतस्थळाला हॅक करून त्याची रचना बदलता येते. यावरून एखादे संकेतस्थळ सायबर हल्ल्याला बळी पडले आहे, असे कळते.

  दुसरा मार्ग म्हणजे फिशिंग अटॅक. यात हॅकर ई-मेल किंवा मेसेजच्या माध्यमातून लिंक पाठवतो आणि त्यावर क्लीक करताच संगणक किंवा संकेतस्थळाचा सर्व डेटा हा लिक होतो. याशिवाय बॅकडोर अटॅकदेखील एक मार्ग आहे. यात संगणकात एक मालवेअर पाठवण्यात येतो. या आधारावर ग्राहकांची सर्व माहिती हॅकर काढून घेतात. सायबर हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी भारतात दोन संस्था आहेत. सीईआरटी, त्यास कॉम्प्युटर रिस्पॉन्स टीम या नावाने ओळखले जाते.

  India under cyber attacks Doesnot the government care about the cyber security of the people