doval and naravane

चीनच्या दबावाखाली येऊन नेपाळने (Nepal) भारताचे लिपुलेख, लिपियाधुरा या विभागांना आपलाच भूभाग समजून त्यासंबंधीचे विधेयके त्यांच्या संसदेत पारित केले होते. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओळी (K P Sharma Oli) यांना अशी भीती होती की, आपण चीनच्या इशा- यावर चाललो नाही तर चीन, कम्युनिस्ट नेते पुष्प दहल कमल प्रचंड यांना सहकार्य करून नेपाळच्या पंतप्रधानावर आरूढ करतील.

दक्षिण आशियातील देशांना स्वत:कडे ओढण्यासाठी चीनने जो चक्रव्यूह रचला आहे. तो भेदण्यासाठी भारत (India) योग्य पावलं उचलत आहे. भारताची घेराबंदी करण्याचे चीनचे कटकारस्थान ‘भारत उधऴून लावत आहे. चीनने श्रीलंकेच्या (Chin and shrilanka) बेटाच्या विकासाकरिता कर्ज दिले असून या माध्यमातून चीन तेथे त्यांच्या नौसेनेकरिता तळ बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. श्रीलंकेतील पूर्वीच्या सरकारचा चीनकडे कल होता. चीन त्यावेळी श्रीलंका सरकारला भारतविरोधी करू पाहत होता, परंतु निवडणुकीनंतर तेथे गोटाबाये राजपक्षे यांचे सरकार सत्तेत आले आणि या सरकारने भारताच्या प्रति अनुकूल धोरण जाहीर केले. भारतासारख्या मोठ्या शेजारी देशाबरोबर श्रीलंकेचे अनेक दशकापासून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. चीनकडून श्रीलंकेने जे कर्ज घेतलेले आहे, ते टप्प्याटप्याने परत करणार असल्याचेही श्रीलंकेने जाहीर केले आहे. चीनने श्रीलंकेप्रमाणेच नेपाळ आणि बांगलादेशालासुद्धा कर्ज देऊन त्यांनाही आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. नेपाळमध्ये तर चिनी राजदूताची सत्ताधा-यांसोबत अत्यंत जवळीक आहे.

चीनच्या दबावाखाली येऊन नेपाळने भारताचे लिपुलेख, लिपियाधुरा या विभागांना आपलाच भूभाग समजून त्यासंबंधीचे विधेयके त्यांच्या संसदेत पारित केले होते. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओळी यांना अशी भीती होती की, आपण चीनच्या इशा- यावर चाललो नाही तर चीन, कम्युनिस्ट नेते पुष्प दहल कमल प्रचंड यांना सहकार्य करून नेपाळच्या पंतप्रधानावर आरूढ करतील. आतासुद्धा नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात फूट पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. प्रचंड यांनी ओली यांच्या विरोधात आघाडी उघडलेली आहे. अशा परिस्थितीत ओली त्यांच्या पक्षाचे विभाजन करू शकतात. गेल्या दोन वर्षांपासून ओली यांची राजकीय प्रतिमा भारतविरोधी बनलेली आहे. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगळा आणि ‘रॉ’चे प्रमुख सावंत गोयल यांनी नेपाळचा दौरा केला आणि नेपाळच्या सरकारला समजावून सांगितले की, त्यांनी चीनच्या या कुनीतीपासून दूर राहावे.

भारतासोबत वैर करू नये. भारताच्या उच्चस्तरीय प्रयत्नानंतरही चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंग यांनी नेपाळचा दौरा केला. या दौ-यामध्ये ते नेपाळ-चीनमध्ये द्विपक्षीय लष्करी सहकार्य वाढविण्यासंबंधी चर्चा करतील व चिनी सैन्यामध्ये गुरखांची भरती करण्याचा प्रस्ताव ठेवतील. सध्या गुरखा हे भारत आणि ब्रिटिश सेनेमध्येच आहेत. शेजारी देशासोबत भारताची जी मैत्री आहे, त्यावरून चीन संतप्त झालेला आहे. चीनने भारतावर असाही आरोप केला आहे की, भारत लहान- ल्हान शेजारी देशांना धमकावित असून त्यांच्या अंतर्गत कारभारांमध्ये दखल देत आहे. दरम्यान, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी श्रीलंकन नेत्यांना सावध केले की, चीनच्या कारस्थानापासून सावध असावे. भारतासोबत संबंध आणि सहकार्य ठेवण्यामध्येच श्रीलंकेचे हित आहे, असेही डोभाल यांनी श्रीलंकेच्या नेतृत्वाला सांगितले आहे. चीन अरबी समुद्रात कोणताही हस्तक्षेप करू शकणार नाही कारण भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या ‘क्वाड’ देशांचे नाविक दल चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहेत.