पाऊस तेव्हाही होता आणि आजही येतोच आहे मग पाणी मुरतंय कुठं? मागीलवेळी तर सरकारच गडगडले, पुन्हा मुसळधार पावसात गरजले मराठे

१८ ऑक्टोबर रोजी साताऱ्यात आकाशी प्रचंड मेघगर्जना होत होत्या अन त्याच दिवशी पवारांची तेथे जाहीर सभा होती. पावसात ही सभा रदद होईल असे साऱ्यांना वाटले. पण ८० वर्षाचा योद्धा शरद पवार निर्धास्त होता. वीज कोसळली तरी चालते पण सभा घेणारच हा निर्धार करून ते सभास्थळी दाखल झाले. सभा सुरू होताच प्रचंड मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला.

  मराठ्यांचा इतिहास बघितला तर तो गौरवशाली स्वरूपाचाच राहिला आहे. शिवाजीराजे भोसले यांच्या नावानेच दिल्लीच्या सल्तनतीचा थरकाप उडत असे. राजकीयदृष्ट्या प्रबळ तसेच सहकारात प्रचंड दबदबा असणाऱ्या मराठ्यांना आज आपल्याच जात बांधवासाठी रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे. राज्याच्या राजकारणात प्रभावशाली असताना आपण शैक्षणिकदृष्टया तसेच नोकऱ्यांमध्ये प्रचंड मागास आहोत ही जाणीव मराठा समाजातील युवकांच्या मनात खदखदू लागली. या खदखदन्यातून मराठाक्रांतीचा जन्म झाला. काल परवा कोल्हापुरात मराठा क्रांती मूकमोर्चा निघाला. खासदार संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात सर्वपक्षीय मराठा नेते सामील झाले.

  सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेसुद्धा या मूकमोर्चात सामील झाले. प्रचंड पावसाच्या सरी कोसळत असताना यातही मराठा आंदोलकांचे नेते गरजत होते. ‘एक मराठा, लाख मराठा’ हा नारा धरून जेव्हा मराठा समाज रस्त्यावर उतरला तेव्हा अवघ्या सर्वपक्षीय मराठा नेत्यांच्या मनाचा थरकाप उडाला होता.

  अतिशय शांततेत एखादा समाज लाखोंच्या संख्याबळात रस्त्यावर उतरत असेल अन आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवत असेल तर त्या मागण्यांचे गांभीर्य सरकारला समजून घेणे क्रमप्राप्तच ठरते. तोच समाज उद्रेकी झाला तर काय करू शकतो याची जाणही सरकारला असल्यामुळे महाराष्ट्राचे सरकारही प्रचंड पेचात सापडले आहे. आजपर्यंत एवढी धडकी कुठल्याही राज्यसरकारने घेतली नसावी जेवढी या राज्य सरकारने मराठा आंदोलनाची घेतली. मराठा समाजाने आण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात २२ मार्च १९८२ रोजी मुंबईत प्रचंड मोर्चा काढला होता. अण्णासाहेब पाटील माथाडी कामगारांचे नेते होते.

  मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मागणीची मुहूर्तमेढ या आंदोलन मोर्चात रोवल्या गेली होती. मराठा राज्यकर्त्यांनी मात्र आपल्या समाजाच्या मागण्यांकडे अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वामुळे फारसे लक्ष दिले नव्हते. नेतृत्व कुणाचेही असले तरी ज्या समाजाच्या पाठबळाने आपली लीडरशीप सुरू आहे त्या समाजाला दुर्लक्षित करून चालणार नाही असेही कुण्या मराठा नेत्यांच्या मनात आले नाही. पण जेव्हा ‘एक मराठा, लाख मराठा’ ध्वज हाती घेऊन मराठा युवक क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरला तेव्हाच सर्वपक्षीय दुकान चालविणाऱ्या मराठा नेत्यांना धडकी भरली. कोल्हापुरात प्रचंड पावसात मराठयांच्या मनातील धगधगता अग्नी विझताना दिसला नाही.

  मराठ्यांचे आंदोलन जर उग्र झाले तर यात महाआघाडी सरकार स्वाहा होऊ शकते अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून शरद पवारपर्यंत सर्वांनाच असल्यामुळे मागण्यांचा ज्वालामुखी केंद्र सरकारच्या पठारावर वळता करण्याचे कामही सुरू झाले आहे.

  पाऊस आणि मराठा नेते

  प्रचंड पावसात मराठा नेत्यांची सभा किंवा आंदोलन यशस्वी होत असेल तर काही परिवर्तन नक्कीच ठरले म्हणून समजा असे संकेत यापूर्वी मिळालेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. ते नंतर भाजपाच्या गळाला लागले. त्यांचे हे परिवर्तनवादी राजकारण शरद पवारांना मुळीच आवडले नाही. मनोमन शरद पवार पेटून उठले. साताऱ्यात उदयनराजेंच्या कर्माने आपल्या नेतृत्वाला गालबोट लागण्याची पाळी आली असे पवार यांना मनस्वी वाटले. साताऱ्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून उदयनराजे पुढे आले. पवारांनी श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी बहाल केली.

  भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदीही साताऱ्यात आले. शरद पवार यांच्यासाठी ही पोट निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली. ८० वर्षाचा शरद पवार नावाचा मराठा नेता उन, पावसाची पर्वा न करता प्रचंड ताकदीने साताऱ्यात सभा घेऊ लागला. १८ ऑक्टोबर रोजी साताऱ्यात आकाशी प्रचंड मेघगर्जना होत होत्या अन त्याच दिवशी पवारांची तेथे जाहीर सभा होती. पावसात ही सभा रदद होईल असे साऱ्यांना वाटले. पण ८० वर्षाचा योद्धा शरद पवार निर्धास्त होता. वीज कोसळली तरी चालते पण सभा घेणारच हा निर्धार करून ते सभास्थळी दाखल झाले. सभा सुरू होताच प्रचंड मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला.

  या पावसात ओलेचिंब होत पवार तास दीड तास गर्जत राहिले. समोर मैदानात मुसळघार पावसात लोक पवारांच्या भाषणाला दाद देत होते. त्यानंतर सातारा पोटनिवडणुकीच्या निकालाने उभ्या देशाला पवारांचे सामर्थ्य दिसले . मोदीसुद्धा भाजपच्या कामी आले नाहीत. मग उदयनराजेंचा पराभव हे पवारांचे मिशन राहिलेच नाही . त्यांनी मग भाजपची सत्ताच राज्यात अधिकारावर येऊ दिली नाही . मराठे व त्यांचे नेते पेटून उठले तर काय करू शकतात हेसुध्दा दिसले.

  It was raining then and it is still raining today So where is the water idol Last time the government collapsed again the Marathas needed Reservation torrential rains