कपिल सिब्बल यांचा पुन्हा सल्ला; काँग्रेसने स्वतःला सक्रिय दाखवावे

  कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिल यांनी न मागता काँग्रेसला सल्ला दिला की, पक्षात व्यापक सुधारणा करण्याची गरज आहे. काँग्रेस अचेतावस्येत नाही हे व्यापक सुधारणेतून स्पष्ट होईल असे ते म्हणाले. काँग्रेसने पुन्हा आपले विराट रूप दाखवून भाजपाला एकमेव पर्याय स्वरूपात पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. सिब्बल जी- २३ समूहाच्या असंतुष्ट नेत्यांपैकी एक आहेत. या नेत्यांनी काहीच दिवसांपूर्वी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षात व्यापक सुधारणेची गरज असल्याचे स्पष्ट केले होते.

  सांप्रदायिकता अल्पसंख्याकांची असो वा बहुसंख्याकांची ती घातक आहे हे देशाला पटवून सांगण्यास काँग्रेस असमर्थ ठरली. आधी ज्योतिरादित्य आता जितीन प्रसाद भाजपात सामील झालेत यावर बोलताना सिब्बल म्हणाले , काँग्रेस युवा नेते व वरिष्ठ यांच्यात समन्वय स्थापित करू शकली नाही. आपल्या राजकीय स्वार्थापोटी लोक पक्ष सोडत असल्याचे ते म्हणाले. आयाराम गयारामाचे राजकारण प्रसाद प्राप्तीचे असते असे सांगून ते म्हणाले की, खरच जितीन यांना आजणत प्रसाट मिळेल?

  काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपाला सल्ला देत सांगितले की, या पक्षाने चाळीस वर्षे आपल्या व पक्षाची अविरत सेवा करणाऱ्यांना सन्मान देऊन उपकृत करावे. काँग्रेसमधून आयारामांना सन्मान देऊन भाजपा काय साधणार ? असे ते म्हणाले. विचारधारा, प्रतिबद्धता व निष्ठा एकाच दिवशी कशा बदलतात यावर त्यांनी आश्चर्य व्यक्‍त केले. पक्षात राहूनही आपण मतभिन्नता व्यक्‍त करू शकतो. आता रमेश काहीही म्हणत असले तरी २०१४ व२०१९ ची निवडणूक हरल्यानंतर काँग्रेसचे नेते बेचैन झालेत.

  ज्याप्रमाणे स्थितीचे अवलोकन करून सरडा रंग बदलतो. जितीन प्रसाद यांनी पक्ष सोडताच सचिन पायलटसुद्धा ॲक्शन मोडमध्ये आले. गेल्या वर्षी त्यांनी अशोक गहलोत यांच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. मग त्यांच्याकडे ना मुख्यमंत्रिपद आले ना प्रदेशाध्यक्षपद त्याच्याकडे फिरकले. आता काँग्रेस नेतृत्व त्यांची मनीषा कशी पूर्ण करते याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

  भाजपाने त्यांच्यावरही जाळे टाकून म्हटले की, देशहितासाठी जे भाजपत येतील त्यांचे स्वागत आहे. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा जेव्हा जोर मारते तेव्हा बंडखोरी आमंत्रण देते. सचिन पायलट यांनी पक्षाचा फॉर्म्युला ठोकरून लावला. पार्टीने त्यांना राष्ट्रीय महासचिवपदाची ऑफर दिली होती हे विशेष. जोपर्यंत त्यांच्या समर्थक आमदार व कार्यकर्त्यांना पक्ष व सरकारमध्ये स्थान मिळत नाही तोपर्यंत ते महासचिवपद स्वीकारणार नाहीत.

  भाजपला काळजी

  भाजपलाही चिंता वाटते की, उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसोबत गट्टी करून काँग्रेस भाजपासाठी अडचणी उभ्या करू शकते. असा समन्वय झाला तर भाजपा धोक्यात येईल. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उत्तराखंड, पंजाब, हिमाचलप्रदेश व गुजरातमध्ये थेट संघर्ष होईल. उत्तरप्रदेशात भाजपाने जितीन प्रसाद यांना पक्षात घेऊन ब्राह्मण मतांचे जुगाड जमविण्याचे तंत्र आखले. ब्राह्मण मतदार येथे सशक्त असून ते १३% टक्के आहेत . आता जितीन प्रसाद ब्राह्मणांना कसे प्रभावित करतात हे लवकरच दिसेल. इ.स. २०१४ व २०१९ मध्ये जितीन स्वतःच पराभूत झाले होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता.

  Kapil Sibals advice again Congress should show itself active