तुमचा डेटा ठेवा सुटसुटीत : तुम्ही डिजिटली अनावश्यक साठा करून ठेवता हे दाखवणारी सहा लक्षणे

आपण जितका जास्त डेटा ठेवू तितकी सायबर सुरक्षेच्या संदर्भात धोके आणि सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता वाढते. नुकत्याच सादर झालेल्या २०२१ नॉर्टन सायबर सेफ्टी इनसाइट रिपोर्टनुसार बहुतांश (७५ टक्के) भारतीयांनी डेटा खासगी ठेवण्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आणि डेटा अधिक प्रमाणात सुरक्षित ठेवण्याची गरज (७७ टक्के) व्यक्त केली.

  असं कधी झालंय का की तुमच्या ड्रॉवरमध्ये बऱ्याच काळापासून वस्तू पडून आहेत आणि मुळात या वस्तू फेकून न देता आपण इथे का ठेवल्यात असा प्रश्न तुम्हाला पडला? अशा अनावश्यक वस्तू साठवून ठेवणं हे काही फक्त ऑफलाइन जगापुरतं मर्यादित नाही. तुमच्या डिव्हाईसेसवर नजर टाकलीत तर याबद्दल बरंच काही कळेल. आपण सगळेच अनावश्यक डेटाही साठवून ठेवत असतो.

  आपण जितका जास्त डेटा ठेवू तितकी सायबर सुरक्षेच्या संदर्भात धोके आणि सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता वाढते. नुकत्याच सादर झालेल्या २०२१ नॉर्टन सायबर सेफ्टी इनसाइट रिपोर्टनुसार बहुतांश (७५ टक्के) भारतीयांनी डेटा खासगी ठेवण्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आणि डेटा अधिक प्रमाणात सुरक्षित ठेवण्याची गरज (७७ टक्के) व्यक्त केली.

  ७६ टक्के भारतीय आपले खासगीपण जपण्यासाठी अधिक सक्रियपणे विविध मार्ग धुंडाळत असतात आणि दर १० पैकी ९ (९० टक्के) लोकांनी आपल्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटी आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत आणि सुमारे तीन चर्तुथांश (७४ टक्के) लोकांनी सांगितले की जागतिक महासंकटाला सुरुवात झाल्यानंतर बदलती जीवनशैली आणि कामाच्या बदलत्या स्वरुपामुळे त्यांनी ही पावले उचलली आहेत.

  डिजिटल होर्डिंग म्हणजे काय?

  नावाप्रमाणेच, डिजिटल होर्डिंग (किंवा डेटा होर्डिंग) म्हणजे आपल्या डिजिटल कंटेंटचा ढीग रचत राहणे. फक्त सायबर सुरक्षाच नाही तर आपल्या आणि पर्यावरणाच्या हितासंदर्भातही याचे नकारात्मक परिणाम होतात.

  डिजिटल स्टोरेजच्या क्षमता वाढत आहेत. त्यामुळे अतिरिक्त प्रमाणातील डिजिटल कंटेंट साठवून ठेवण्यासाठी आपल्याकडे बरीच जागा आहे, असे आपल्याला वाटू शकते. पण, असे करताना त्यासोबत आपण अयोग्य गोष्टींनाही वाव देऊन धोके निर्माण करत असतो.

  डिजिटल होर्डिंगचे नकारात्मक परिणाम: डिजिटल होर्डिंगचे परिणाम व्यक्ती, कंपन्या आणि आपल्या पृथ्वीवरही होतात.

  डिव्हाइसेसचा वेग कमी होणे :

  तुमच्या हार्ड ड्राइव्हला जितका जास्त डेटा व्यवस्थापित करावा लागेल तितकेच त्याचे काम वाढेल आणि परिणामी डिव्हाइसचा वेग कमी होतो. आपण जितका जास्त डेटा ठेवू तितकाच सायबर सुरक्षेच्या संदर्भात तो हरवण्याचा किंवा त्याचा दुरुपयोग होण्याची धोका वाढतो.

  उत्पादकता घटते :

  इंटरनेट अल्गोरिदरमुळे आपल्याला गोष्टींचा शोध घेणे सोपे जाते. मात्र आपला सगळा डिजिटल डेटा असा शोधणे वाटतं तितकं सोपं नाही. वर्षभरापूर्वी काढलेला एखादा फोटो शोधण्यासाठी तुम्हाला कदाचित फोनमधल्या गॅलरीत दहा मिनिटं स्क्रोल करावं लागू शकतं!

  ताण वाढतो :

  जितका डेटा अधिक तितकं त्याचं अधिक नियंत्रण तुम्हाला करावं लागतं. आणि तुमच्याकडे व्यवस्थापन कौशल्य नसेल तर तुम्ही हा डेटा वेगाने गमावून बसण्याची शक्यताही अधिक असते. शिवाय, हे सगळं आता सावरता येत नाही असं लक्षात आल्यावर त्याचा ताण वाढत जातो आणि त्यामुळे तुमच्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

  डेटा होर्डिंगची सहा लक्षणे (तुम्हाला डीक्लटर करण्यात साह्यकारी अशा टिप्ससह)

  हे काम सावकाश करा आणि तुमच्या डिजिटल आयुष्यावर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवा. एकावेळी एक बुकमार्क, जुनी फाइल, डेस्कटॉप आयकॉन.

  १. तुमचा इनबॉक्स अनरिड ईमेल्सने भरलाय

  तुम्ही कधीही वाचत नाही अशा न्यूजलेटर्सना ठरवून अनसबस्क्राइब करा. किंवा, साफसफाई करण्याचा वेगवान उपाय म्हणजे ‘डिलिट ऑल’वर क्लिक करा. तो ईमेल खरंच फार महत्त्वाचा असेल तर सेंडर परत पाठवलेच की!

  २. विविध आयकॉन्स आणि डुप्लिकेट फाइल्सनी तुमचा डेस्कटॉप ओसंडतोय

  तुमच्या डेस्कटॉपला अगदी तुमच्या कामाच्या टेबलप्रमाणे वापरा. तिथे वस्तूंची गर्दी असली की कामावर लक्ष केंद्रीत करणं कठीण होतं हे लक्षात घ्या. ‘महत्त्वाचे’, ‘चटकन लागणारे’ म्हणजेच ‘important’ ‘quick reference’ असे चटकन पाहता येतील असे फोल्डर तयार करा. इतकंच नाही ‘टॉस मी टुडे’ असा एक फोल्डर एकदाच डाऊनलोड करण्याच्या किंवा स्क्रीनशॉटसारख्या कंटेंटसाठी बनवा. फारच महत्त्वाचं जे असेल ते क्लाऊड स्टोरेजवर ठेवा.

  ३. अनावश्यक बुकमार्क करता

  स्वत:साठी बुकमार्कची मर्यादा ठरवा आणि दर महिन्याला त्याचे ऑडिट करून संदर्भ तपासा आणि नव्या गोष्टींना जागा करा.

  ४. तुमचे मॅसेज आणि फोटोज कित्येक वर्षांपासूनच आहेत आणि इतके ॲप्स कसले आहेत हे ही माहीत नाही.

  ‘कीप मॅसेज’ फिचर फक्त ३० दिवसांसाठी किंवा एक वर्षासाठी ठेवा : कायमस्वरुपी नाही. तुमच्या ॲप्सवरही लक्ष द्या. गरजेनुसार वापरल्या जाणाऱ्या ॲप्सप्रमाणे वर्गीकरण करा. उदा. प्रवासाशी संबंधित. महिन्यातून एकदा कॅमेऱ्यातील फोटोंवरही नजर टाका आणि अनावश्यक साठवून ठेवलेल्या गोष्टी डिलिट करा.

  ५. क्लाऊडकडे तुम्ही दुर्लक्ष करताय

  दरमहा साधारण १० मिनिटे तुमच्या क्लाऊड स्टोरेजसाठी द्या आणि कुठे काय बॅकअप ठेवलाय, कसे वर्गीकरण केलेय याची नव्याने माहिती करून घ्या. जे नको आहे ते डिलिट करा आणि त्यानुसार नव्याने सेटिंग्ज करा. आठवड्यातून एकदा कम्प्युटरवरील तुमच्या डाऊनलोड फोल्डरला डिटॉक्स करा आणि डिजिटल ट्रॅशही रिकामा करा.

  ६. तुमच्या डिव्हाइसवर काहीही शोधायला तुम्हाला बराच वेळ लागतो

  ऑगनाइज करण्याच्या कामात तंत्रज्ञानाचे साह्य घ्या. तुमच्या ईमेलसाठी फिल्टर्स सेट करा. त्यामुळे महत्त्वाचे मॅसेज दुर्लक्षित राहणार नाहीत आणि स्पॅम थेट जंक फोल्डरमध्ये जाऊ शकेल.

  या सगळ्या लक्षणांवरून तुम्ही डिजिटल होर्डर आहात, असं वाटतंय का? डिजिटल डेटा साठवून ठेवला जाणं हे कुणासोबतही घडतं. पण महत्त्वाचं काय आहे तर आपण आपल्या सवयी बदलणं आणि त्यातून सायबर हायजिन उत्तम प्रकारे जपणं.

  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.