भाषा भेदभाव, उत्तर-दक्षिण भारतात टकराव

देशाची राष्ट्रभाषा व बहुसंख्य भारतीयांची संपर्क भाषा असलेली हिंदी देशातच नव्हे तर विदेशातही सामर्थ्यवान आहे. हिंदीसारखी गोडी असलेली भाषा जगात इतरत्र असेल असे वाटत नाही. आपल्याच राष्ट्रभाषेचा द्वेष करणाऱ्या महामानवाक तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी होते. आता त्यांची सुपुत्री खासदार कानिमोझी यांनी अल्पविवादावर हिंदीला कोसले.

दक्षिण भारताचा हिंदी विरोध राजकीय स्वरुपाचा असतो. बुडीत निघालेली अथवा निघणारी नेते मंडळी हिंदी विरोधाला हवा देत राहतात. आपली पोळी भाजण्यासाठी ते भाषेचा आधार घेत राहतात. सर्वसाधारण निष्पाप जनतेला ते या संदर्भात भडकविण्याचे काम करीत राहतात. हा सारा प्रकार करंटेपणाचा आहे. मुडद्याच्या टाळूवरील लोणी खाणारी नेते मंडळी हिंदी द्वेषाचे राजकारण फार पूर्वीपासून दक्षिणेत करीत असतात. देशाची राष्ट्रभाषा व बहुसंख्य भारतीयांची संपर्क भाषा असलेली हिंदी देशातच नव्हे तर विदेशातही सामर्थ्यवान आहे. हिंदीसारखी गोडी असलेली भाषा जगात इतरत्र असेल असे वाटत नाही. आपल्याच राष्ट्रभाषेचा द्वेष करणाऱ्या महामानवाक तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी होते. आता त्यांची सुपुत्री खासदार कानिमोझी यांनी अल्पविवादावर हिंदीला कोसले. कोनिमोझीचे अज्ञान व कौटुंबिक लक्षात घेऊन त्यांचा विरोध समजू शकतो. पण काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींचे काय? त्यांनी कानिमोझीच्या रिकाम्या डोक्यात पंपाने हवा भरुन ते फुगविण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

कानिमोझी यांच्या सांगण्यानुसार त्यांनी विमानतळावर सीआयएसएफ अधिकाऱ्याला बजावले की त्यांच्यासोबत इंग्रजी किंवा तामिळमध्ये संवाद साधा. तेव्हा अधिकारी म्हणाला की तुम्हाला हिंदी येते, तुम्ही भारतीय आहात? कानिमोझीने या संदर्भात तक्रार करताच सीआयएसएफने चौकशीचे आदेश दिले आहेत. भाषेच्या आधारावर बोट उचलणे अयोग्य असल्याचेही सीआयएसएफने स्पष्ट केले आहे. वास्तविक अधिकाऱ्याने एखा खासदारासोबत सीमा ओलांडून प्रश्न-प्रतिप्रश्न करायला नको होते. तुम्ही भारतीय आहात?  असे विचारणे तर नकोच होते. हा सारा आगाऊपणा करायला नको होता पण त्या अधिकाऱ्याने तो केला. भारतात सर्वच बोलीभाषेचा सन्मान केल्या जातो. हिंदी समजत नसलेल्या व्यक्तीही तन-मनाने देशभक्त भारतीय आहे. हिंदी समन्वय व एकात्मतेची भाषा आहे हे नेत्यांनीही समजून घ्यावे. त्यांच्या प्रादेशिक भाषेचा कुणी अनादर करीत नाही. हिंदीप्रेमींनी देशांतर्गत बोलल्या जाणाऱ्या कुण्या प्रादेशिक भाषेचा कधी विरोध केला नाही. जो केला तो इंग्रजीचा. इंग्रजी ही भारताची नव्हे तर विदेशी भाषा आहे. 

हिंदी विरोध बनावटी

तेव्हा वैजयंतीमाला, पद्मिनी, हेमामालिनी, रेखा, श्रीदेवी, जयाप्रदा आदींनी हिंदी चित्रपटातूनच लोकप्रियता प्राप्त केली होती. केरळमधील अनेक लोक दिल्ली व विदेशात उच्चपदावर काम करीत आहेत. दक्षिण भारताचे आयपीएस व आयएएय सुंदर व प्रभावी हिंदी बोलतात. त्यामुळे या नेत्यांचा हिंदी विरोध राजकीय वैमनस्यातून आहे. 

चिदंबरम व कुमारस्वामी वादात उतरले

माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम सध्या खालीपिली आहेत. कनिमोझी प्रकरणाचा आधार घेत तेसुद्धा भाषिक वादात उतरले. त्यांनी कनिमोझींची री ओढून प्रकार नवा नसल्याची चिवचिव सुरु केली. सरकारी अधिकाऱ्यांचे भाषेच्या संदर्भात मीसुद्धा टोमणे सहन केलेत असे ते म्हणाले. मी त्यांच्या सोबत फोन वा बैठकीत हिंदीत बोलावे असा त्यांचा आग्रह होता असे ते म्हणाले. चिदंबरम यांचे कीर्तिवान पुत्र कार्ती यांनीसुद्धा कनिमोझी यांना पाठबळ उभे करुन दिले. आता भाषेची टेस्ट सुरु झाली पुढे काय होणार?  चिदंबरम मोठमोठ्या पदावर दिल्लीत सक्रिय होते. देशाचे ते काही काळ गृहमंत्री होते. दिल्लीत २-३ दशकं मुक्काम ठोकून ते हिंदी शिकले नाहीत. सोनिया गांधी यांची भाषा इटालियन आहे. पण देशप्रेमात त्यांनी चांगली हिंदी अवगत करुन घेतली. देशाचे राजकारण करणारे चिदंबरम यांना थोडीफार मनाची खंत असेल तर त्यांनी तामिळनाडूचे राजकारण करावे. राष्ट्रीय स्तरावरील दिल्लीचा मुक्काम हलवून तो त्यांनी चेन्नईत न्यावा. चेन्नईत तामिळ, भाषेच्या सर्वांगीण विकासात उर्वरित आयुष्य खर्ची घालावे. लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावरील हिंदीचा विरोध करणाऱ्यांच्या मेंदूची किव करावी तेवढी थोडीच. कुमारस्वामीही त्याच गँगचे निघाले. हिंदी पॉलिटिक्सने दक्षिण भारताच्या अनेक नेत्यांना पंतप्रधानाच्या खुर्चीकडे फिरकू दिले नाही. असे ते म्हणाले, त्यांचे वडील एच.डी. देवेगौडा देशाचे पंतप्रधान होते हे ते विसरले. पी.व्ही. नरसिंहराव दक्षिण भारताचे होते. त्यांना देश-विदेशातील तब्बल १८ भाषा बोलता, लिहिता, वाचता येत होत्या ते ५ वर्ष पंतप्रधान होते. कुमार स्वामी म्हणाले की हिंदी पॉलिटिक्समुळे स्वतंत्रता दिन समारोहात देवेगौडा यांना हिंदीत भाषण करावे लागले. तथ्य असे की, तेव्हा त्यांनी कन्नडमध्ये भाषण केले होते. त्यांचे मंत्री सीएम इब्राहीम त्यांच्या भाषणाचा हिंदी अनुवाद करीत होते. कामराज प्रभावशाली काँग्रेसी नेते होते. ते काँग्रेसाध्यक्षपदी बराच काळ होते. इंदिरा गांधींना पंतप्रधान बनविण्यात के. कामराज व डी.पी. मिश्रांचा सिंहाचा वाटा होता.