last eclipse of the year 2020 Read in detail which zodiac sign will brighten the fortunes and who will be fighting with problems
सूर्यग्रहण-२०२० या वर्षातील शेवटचे ग्रहण; कोणत्या राशीचे भाग्य उजळणार व कोण गोत्यात येणार, वाचा सविस्तर

सूर्यग्रहणात पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आल्याने (अंशिक किंवा पूर्ण रुपाने) सूर्यग्रहण होते या वर्षात एकूण ६ ग्रहणे आहेत. या वर्षातील आधीचे सूर्यग्रहण २१ जून २०२० रोजी झाले होते.

डॉ. सुनिता जोशी (पी. एचडी. ॲस्ट्रोलॉजी)

२०२० या वर्षातील सूर्यग्रहण हे शेवटचे ग्रहण असून सोमवार १४ डिसेंबर रोजी संध्याकाळी सुरू होऊन १५ डिसेंबरच्या मध्यरात्री समाप्त होणार आहे. या सूर्यग्रहणाविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया.

सूर्यग्रहणात पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आल्याने (अंशिक किंवा पूर्ण रुपाने) सूर्यग्रहण होते या वर्षात एकूण ६ ग्रहणे आहेत. या वर्षातील आधीचे सूर्यग्रहण २१ जून २०२० रोजी झाले होते.

हे सूर्यग्रहण कोठे दिसणार?

१४ डिसेंबर रोजी होणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण दक्षिण अमेरिका खंड, आटलांटिक महासागर, दक्षिण प्रशांत महासागर, हिंदी महासागर, अंटार्क्टिका खंडाचा काही भाग व आफ्रिकेच्या काही भागांत दिसणार आहे. जेव्हा हे सूर्यग्रहण सुरू होईल तेव्हा भारतात सूर्यास्त झालेला असेल.

सूर्यग्रहणाचा कालावधी

१४ डिसेंबर सोमवारी संध्याकाळी ७ :०३ वाजता सूर्यग्रहणाला सुरुवात होईल. सूर्यग्रहणाचा मध्य हा रात्री ९:४३ मिनिटांवर होईल. ग्रहणाची समाप्ती १५ डिसेंबर मध्यरात्री ००:२३ मिनिटांनी होणार आहे. या सर्व भारतीय प्रमाणवेळा दर्शविल्या आहेत. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी ५ तास २० मिनिटांचा राहील.

सूर्यग्रहणाविषयी महत्त्वाचे

हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याने वेधादि नियम पाळण्याची आवश्यकता नाही. सूर्यग्रहणाच्या कालावधीत गर्भवती महिलांनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी. कारण ग्रहणाचा वाईट परिणाम बाळावर होतो म्हणून ग्रहण काळात ईश्वराची, परमेश्वराची प्रार्थना करावी. भगवंताचे नामस्मरण करावे.

ग्रहण दिसो अथवा ना दिसो, ग्रहणाचा प्रभाव मानवी जीवनावर होत असतोच. हे १४ डिसेंबर रोजीचे सूर्यग्रहण भारतातून दिसत जरी नसले तरी त्याचा प्रभाव संपूर्ण सृष्टीवर पडणार आहे. त्यामुळे ग्रहण कालावधीत पाळावयाचे नियम आणि पथ्ये जरूर पाळावीत असे अनुभवी ज्योतिषाचार्य सांगत आहेत.

ग्रहणात पाळावयाचे नियम

सूर्यग्रहण सुरू होण्यापूर्वी सूर्यास्त होण्याआदी तुळशीची पाने हळूवारपणे तोडून घ्यावीत. धुऊन घ्यावीत. ग्रहण सुरू होण्यापूर्वीच ही तुळशीची पाने अन्नपदार्थ, पाणी, पिण्याचे पाणी यांमध्या टाकावीत. असे केल्यास सूर्यग्रहणाच्या वेळेस पृथ्वीवर येणाऱ्या अतिनील व दूषित किरणांपासून रक्षण होते. त्यांचा दुष्परिणाम होणार नाही. सूर्यग्रहण काळात देवपूजा करू नये. देवाचे घर अशावेळेस बंद करावे. या वेळेत सर्व मंदिरे व त्यांची कवाडे बंद केली जातात. ईष्ट देवतांचे मंत्र जप, राशी अनुसार मंत्र जप, भगवंताची उपासना जरूर करावी. सविस्तार माहितीसाठी आपण डॉ. सुनिता जोशी ज्योतिषाचार्य यांच्याशी संपर्क साधू शकता.

हे सूर्यग्रहण मध्यरात्री संपत असल्याने दुसऱ्या दिवशी मंगळवार १५ डिसेंबर रोजी पहाटे उठून स्नानादी कार्ये उरकून घरातील गृहिणीने संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे. घराचे शुद्धीकरण करावे. नंतर घरातील कर्त्या पुरुषाने किंवा गृहिणीने देवपूजा करावी. देवाला जुनी वस्त्रे काढून नवीन वस्त्रे घालावीत. ब्राम्हणांनी आपली जानवी बदलून नवीन जानवी धारण करावीत. नंतर मंदिरात देवदर्शन करून सूर्यासंबंधित दान जसे तांब्याची वस्तू, गहू, गूळ, लाल वस्त्रे, त्यांचे मंदिरातील गुरुजी किंवा ब्राम्हणास दान करावे.

सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्रानुसार

ज्योतिषशास्त्रानुसार हे १४ डिसेंबरचे सूर्यग्रहण विशेष महत्त्वाचे आहे. ग्रहणाच्या वेळेस सूर्य जरी वृश्चिक राशीत असला तरी दुसऱ्या दिवशी १५ डिसेंबर रोजी सूर्य धनू राशीत प्रवेश करणार आहे. म्हणून ह्यास ‘धनु संक्रांतीला सूर्यग्रहण’ असे म्हणावे लागेल.

१५ दिवसांत हे दुसरे सूर्यग्रहण आहे. ३० नोव्हेंबरला चंद्रग्रण झाले व १५ दिवसांमध्ये आता १४ डिसेंबरला सूर्यग्रहण होत आहे. यामुळे मानवी जीवनावर प्रतिकूल परिणाम होतील. आर्थिक परिस्थिती विसकळीत होईल.

१४ डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या असल्याने विशेष महत्त्व राहणार आहे. दिवसभर सूर्यास्तापर्यंत पर्वकाळ असल्याने तीर्थक्षेत्री स्नान, दान करणे पुण्यकारक ठरेल.

सूर्यग्रहण व राशींची विशेषता

१४ डिसेंबरचे हे सूर्यग्रहण वृश्चिक राशीत ज्येष्ठा नक्षत्रात होत आहे. या दरम्यान सद्य स्थितीत वृश्चिक राशीत सूर्य, चंद्र, बुध, शुक्र व केतू हे पाच ग्रह स्थित आहेत. त्यामुळे या सूर्यग्रहणाचा सर्वाधिक अनिष्ट प्रभाव वृश्चिक राशीवर म्हणजे वृश्चिक राशीच्या व वृश्चिक लग्नाच्या जातकांवर होणार आहे.

सूर्यग्रहणाच्या वेळेस सध्याच्या ग्रहपरिस्थितीनुसार गुरु शनीसोबत मकर राशीत असून राहू वृषभ राशीत स्थित आहे. या योगाने “गुरु-राहू चांडाळ योग” होत आहे. ज्यांच्या कुंडलीत- जन्मपत्रिकेत “गुरु-राहू चांडाळ योग” आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी.

एकूण ग्रहमान पाहता सूर्यग्रहणानंतर राजधानीत राजकीय घडामोडींना वेग येईल. सक्रिय हालचाली होतील. विविध घटनांना देशाला सामोरे जावे लागणार आहे.

सूर्य ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होईल.

मेष, मिथुन, कर्क, कन्या, तूळ, मकर या राशीच्या व्यक्तींना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागेल. वृषभ व सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्तरावर अडचणींमधून मार्ग शोधावा लागेल. अनपेक्षित किंवा आवश्यक खर्च करावे लागतील.

धनु आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना व्यक्तिगत नाती, स्नेहसंबंध, प्रेमसंबंध टिकविण्यासाठी महनत घ्यावी लागणार आहे. तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आपल्या स्वभावाला मुरड घालावी लागेल.

मीन राशीच्या जातकांना नोकरी व्यवसाय विषयक अस्थिरता जाणवेल. नोकरी, व्यवसायात बदल करायचा झाल्यास जाणकार ज्योतिषाचार्यांचा सल्ला घ्यावा कारण मानसिक अस्वस्थता राहील आणि वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी मात्र हे सूर्यग्रहण त्रासदायक ठरणार आहे.

जीवनातील प्रत्येक पाऊल हे जपूनच पुढे टाकावे. आरोग्य तसेच आर्थिक स्तरावर अडचणी, समस्यांचा सामना करावा लागेल. कुटुंबाची काळजी घेताना मानसिक तणावाला सामोरे जावे लागणार आहे.

सर्व राशींच्या व्यक्तींनी राशीमंत्र, ईष्टदेवता मंत्र जप, कुलदेवतेची उपासना याद्वारे स्वत:चे कल्याण करावे. स्वत:ची ईष्टदेवता जाणून घ्यायची असल्यास डॉ. सुनिता जोशी (पी. एचडी. अस्ट्रोलॉजी) ज्योतिषाचार्य व वास्तू तज्ञ यांच्याशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी : ९८२३२१६५४४