लडाखपासून ते कन्याकुमारीपर्यंत विकासकार्यामुळे परिचय असलेला नेता : प्रफुल पटेल

मुंबईतल्या विशालकाय उड्डाणपुलांसह विदर्भातील मेळघाट असो की राज्यातील आदिवासी बहुल गाव-पाड्यांपर्यंत बारमाही रस्ता पोहोचवण्याची किमया राज्यात नितीनजींनी करून दाखवली होती. आता देश पातळीवर विकासाचे एकाहून एक सरस उच्चांक प्रस्थापित करण्यासाठी नितीनजी सिद्ध झाले आहेत. रस्ते विकासाची गंगा देशभर सर्वत्र वाहते आहे.

  नितीन गडकरी हे नेहमीच जगभरातील चांगल्या गोष्टींचा शोध घेतात. मुंबईतल्या विशालकाय उड्डाणपुलांसह विदर्भातील मेळघाट असो की राज्यातील आदिवासी बहुल गाव-पाड्यांपर्यंत बारमाही रस्ता पोहोचवण्याची किमया राज्यात नितीनजींनी करून दाखवली होती. आता देशपातळीवर विकासाचे एकाहून एक सरस उच्चांक प्रस्थापित करण्यासाठी नितीनजी सिद्ध झाले आहेत. रस्ते विकासाची गंगा देशभर सर्वत्र वाहते आहे. सत्तेत आल्यावर मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी शेकडो रस्ते प्रकल्प मार्गी लावले. आता देशभर वेगाने कामे सुरू आहेत. नितीनजी मोठी स्वप्न पाहतात आणि पाहता पाहता त्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारतात.
  नितीन गडकरी आणि विकास हे समीकरण तयार झाले आहे. आपल्या अचाट कर्तृत्वाने, धाडसाने, कल्पक बुद्धीमत्तेच्या जोरावर गडकरींनी विकासाचे नवे मापदंड उभारले. राजकारणाचे एक विशेष आहे. लोकांनी वारंवार मागणी करायची आणि नंतर ती राजकारण्यांनी पूर्ण करायची, अशी काहीशी पद्धत आहे.
  मात्र, नितीन गडकरी हे एक असे मंत्री आहेत की, त्यांनी लोकांवर मागणी करण्याची वेळच येऊ दिली नाही. त्यांनी स्वत:च लोकांच्या अडचणी शोधून त्यावर उपाययोजना शोधल्या आहेत. केवळ नागपुरातच नव्हे तर संपूर्ण देशभर हा झंजावात त्यांनी उभारला आहे. लडाखपासून ते कन्याकुमारीपर्यंत नितीनजींचा परिचय त्यांच्या विकासकार्यामुळे पोहोचला आहे.
  देशाचे नेतृत्व करताना आपल्याला संधी उपलब्ध करून देणाऱ्या मतदारसंघाला तळहातावरच्या फोडासारखे जपावे, असे मानून त्यांनी नागपूरचा चेहरा मोहरा बदलला आहे. िदल्लीत गेलेला नेता मतदारसंघात फारसा उपलब्ध नसतो. पण नितीन गडकरी याला अपवाद आहेत. हजारो लोकांना नियमित भेटण्याचा त्यांनी पायंडा पाडला आहे. त्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीब लोकांना तात्काळ मदतीचा हात मिळतो.
  आपला नेता आपल्याला भेटतो, आपले म्हण्ाणे ऐकतो हा देखील जनतेच्या समाधानाचा विषय असतो.नितीनजींनी देशभर केलेल्या विकासकामांचे मोठे योगदान आहे. हाती घेतलेल्या कामाचे नितीनजी सोने करतात. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे काही महिन्यात त्यांनी गंगा शुद्ध केली. जात, धर्म, पक्ष असा कोणताही भेद आड येऊ न देता लोकहिताचे काम करणारा नेता अशी त्यांनी प्रतिमा जनमानसात तयार झाली आहे.
  आज विदर्भातील विकासाच्या आणि जलसिंचनाच्या क्षेत्रातील अनुशेष निर्मूलनात त्यांनी क्रांतीकारी कार्य केले. शेतकऱ्यांविषयी त्यांना अपार कळवळा आहे. ते सर्वच क्षेत्रात अविश्रांत धडपड करीत असताना लोकांच्या अपेक्षा आणखी वाढत असतील तर मी लोकांना दोष देत नाही. खरे पािहले तर विदर्भातल्या कोणत्याही मतदारसंघातून नितीनजी उभे राहिले तर लोक त्यांनाच निवडून देतील एवढे कष्ट त्यांनी वैदर्भीयांसाठी उपसले आहेत.नितीन गडकरी हे नेहमीच जगभरातील चांगल्या गोष्टींचा शोध घेतात.
  मुंबईतल्या विशालकाय उड्डाणपुलांसह विदर्भातील मेळघाट असो की राज्यातील आदिवासी बहुल गाव-पाड्यांपर्यंत बारमाही रस्ता पोहोचवण्याची किमया राज्यात नितीनजींनी करून दाखवली होती. आता देश पातळीवर विकासाचे एकाहून एक सरस उच्चांक प्रस्थापित करण्यासाठी नितीनजी सिद्ध झाले आहेत. रस्ते विकासाची गंगा देशभर सर्वत्र वाहते आहे.
  सत्तेत आल्यावर मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी शेकडो रस्ते प्रकल्प मार्गी लावले. आता देशभर वेगाने कामे सुरू आहेत. नितीनजी मोठी स्वप्न पाहतात आणि पाहता पाहता त्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारतात. गगनाला गवसणी घालणारी कामे नितीनजीच करू जाणोत. आकांक्षांपुढती जेथ गगन ठेंगणे, अशा आशयाच्या अनेक ओळी त्यांच्याबाबत तंतोतंत लागू आहेत.
  संघटनेच्या आणि पक्षवाढीच्या पातळीवरही नितीनजींचे कार्य कौतुकास्पद आहे. विदर्भात नव्हे तर राज्यातील हजारो कार्यकर्त्यांना त्यांच्या नावाने ओळखणारा नेता, असा त्यांचा सर्वांना अनुभव! विदर्भातील कार्यकर्त्यांचे तर नितीनजींकडे स्वाभावीकपणे पालकत्व आहेत. जगभर ख्यातीप्राप्त असलेले नितीन गडकरी कितीही व्यस्त असो, ते आपल्या पाठीशी उभे आहेत, हा दुर्दम्य विश्वास कार्यकर्त्यांना तर आहेच, तसाच असंख्य लोकांना असून, या विश्वासावर धाडसाने रचनात्मक कामे करत असतात.
  देशभर काही विकासकामे अथवा सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नितीन गडकरी कायम आधारवड वाटतात. आपण जेव्हा अडचणीत येऊ किंवा कोणाला तरी मदतीसाठी साद घालावी लागेल, तेव्हा नितीनजींच्या वाड्याचे दरवाजे, आपल्यासाठी खुले आहेत, असे त्यांना वाटते. नितीनजींच्या लोकप्रियतेत पक्षीय राजकारणाच्या भिंती कधीच ओलांडल्या आहेत.
  भाजपच्या हिताच्या आड येणारे काम नसेल तर त्याला संपूर्ण मदत करून संकटातून बाहेर काढण्याचे औदार्य नितीन गडकरी यांच्याजवळ आहे. त्यामुळेच त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे असंख्य चाहते प्राप्त झाले आहेत. राजकारणाच्या आखाड्यात ते बलाढ्य ठरले आहेत. वैचारिक मतभेद असतानाही अनेक राजकीय नेत्यांशी नितीनजींची अतूट मैत्री आहे.
  अशीच मैत्री माझी व नितीन गडकरी यांची आहे. आम्ही दोघेही विदर्भातील असून राजकारणात सक्रिय आहोत. आमची पक्षीय भूिमका, वैचारिकता जरी भिन्न असली तरी आमच्यात मैत्री असून कधीही कटुता आलेली नाही.
  याचे एक उदाहरण आजही मला आठवते. काही वर्षांपूर्वी ९ फेब्रुवारी रोजी या िदवशी माझे वडील मनोहरभाई पटेल यांच्या स्मृितदिनी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांना प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यावेळी भाजपच्या एका कार्यकर्त्याने तक्रार केली. त्यामुळे सदर कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. नेमके त्यावेळी मी नितीन गडकरी यांच्याशी बोललो आणि त्यांनी त्वरित प्रयत्न केल्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. महत्त्वाचे म्हणजे त्या कार्यक्रमाला नितीन गडकरी स्वत: उपसि्थत राहून त्यांनी केलेल्या भाषणात वडिलांच्या कार्याला उजाळा देत माझ्या कामाचेही कौतुक केले.
  अशा नेत्याच्या रूपातील मित्र, उत्तम राजकारणी, प्रत्येक क्षेत्रांत कल्पकतेचा भांडार असलेल्या नितीन गडकरी यांना वाढदिवस निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
  प्रफुल पटेल
  नेते, राष्ट्रवादी काँग्रेस