चीनबाबत मोदींची कठोर भूमिका

लडाखच्या गलवान घाटीत चीनसोबत भारतीय जवानांची झडप होऊन कर्नलसह २० जवान शहीद झालयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक धोरण सवीकारले आहे. भारताची अखंडता व संपभूता आमच्यासाठी सर्वोच्च असून

 लडाखच्या गलवान घाटीत चीनसोबत भारतीय जवानांची झडप होऊन कर्नलसह २० जवान शहीद झालयामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक धोरण सवीकारले आहे. भारताची अखंडता व संपभूता आमच्यासाठी सर्वोच्च असून त्याची सुरक्षा  करण्यापासून आमहाला कोणी थांबवू शकत नाहीत. याबाबत कुठलीच शंका उपसस्थित होणयाचे कारण नाही. आमच्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. वेळ येताच त्याचा बदला घेतला जाईल. आम्ही आमच्या हक्काची १ इंचही भूमी कुणाला हिसकावू देणार नाही. आमचा आत्मसन्मान आम्ही कायम राखू  असे ते म्हणाले. भारत शांतीप्रिय देश आहे, पण आमच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आम्हि कटिबद्द आहोत. तसेच आम्ही सर्वांगाने सक्षम आहोत. पंतप्रधानाचा थेट संकेत चिनी सेनेचे प्रवक्ते व चिनी विदेश मंत्रालयाला होता. त्यांनी भारताची कारवाई भडकाऊ स्वरुपाची होती असे स्पष्ट केले. पंतप्रधानांचे वक्तव्य गंभीर स्वरुपाचे वाटले एलएसीवर स्थिती बरोबर नाही. चर्चेचे द्वार आता यापूढे उघडणार नाहीत असे संकेतही त्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत. चीन संदर्भात ते यापुढे कुठेच लवचीक राहणार नाहीत. असेही त्यांच्या वक्तव्यातून वाटले दोन्ही देशादरम्यान एलएसीवर गोळीबार झाला नाही. अशा म्हणण्यात आता काही दम राहिला नाही, काटेदार तारा बांधलेल्या काठ्या, आधी जमा करु नंतर फेकून मारणारे दगड यातूनही जीव जातातच. चीनची दादागिरी व विस्तारवादी वृत्तीला आता त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची गरज मोदींनाही वाटू लागली आहे. या महिन्याच्या समाधानकारक बैठकी झाल्यात. हा तर चीनचा देखावा होता. चीनने पुर्वीचे मोठमोठाले दगड उंच ठिकाणी जमा करुन ठेवले होते.