inflation hit in pakistan egg for 30 rupees one thousand rupees ginger and wheat for 60 rupees selling in nrvb

भारत-पाक दरम्यान गोठलेले राजकीय मागील काही दिवसांपासून सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सीमेवर तणाव 'निवळण्यासाठी, नियंत्रणरेषेवर युद्धबंदी राहावी म्हणून पाक अधिक सक्रिय दिसत आहे. निर्मितीपासूनच पाकिस्तान हा भारताशी सख्यत्व बाळगून नव्हता.

    काश्मीर हा उभय देशांतील वादाचा व कळीचा मुद्दा. दोन्ही देशांची याबाबत परस्परविरोधी भूमिका. मे २०१४ ला नरेंद्र मोदी हे मोठ्या बहुमताने सत्तेत आले. प्रचारादरम्यान त्यांनी पाकविरोधात धुराळा उडविला होता. ते सत्तेत आल्याने भारत-पाक संबंध कसे असतील? याकडे जगाचे लक्ष लागले होते. सार्क देशांच्या प्रमुखासह नवाझ शरीफ यांनादेखील शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देऊन मोदी यांनी आश्चर्याचा सुखद धक्का दिला. डिसेंबर २०१५ ला त्यांनी अफगाणिस्तानातून येताना अचानकपणे पाकला भेट दिली.

    शरीफ यांच्या कुटुंबातील लग्नास त्यांनी हजेरी लावून नवदाम्पत्यास आशीर्वाद दिले. यातून उभय देशांत नवे सौहार्दपर्व सुरू होईल, अशी चिन्हे दिसू लागली. पाकमधील कडवा गट, आयएसआय अन्लष्कराला हे रुचले नसावे. मोदी यांच्या पाक दौऱ्यानंतर आठवडाभरात ‘पठाणकोटच्या हवाई तळावर पाक समर्थक अतिरेक्यांनी हल्ला केला. शांघाई परिषदेच्या निमित्ताने मोदी-शरीफ यांची रशियात चर्चा झाली, त्यानंतर दोन महिन्यांत उरीमध्ये अतिरेक्यांनी हल्ला करून उभयपक्षी शांतता प्रक्रियेला खीळ घातली. पुढे भारत विरोधी प्रचार करून इम्रान खान हे पाकमध्ये सत्तेत आले. पुढे पुलवामा हल्ला झाला. त्यास प्रत्युत्तर म्हणून भारताने बालाकोटमध्ये सर्जिकल कारवाई केली.

    टोन्टी टेशांत संबंध बिघडत असताना ५ ऑगस्ट २०१९ ला भारताने जम्मू-काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे ३७० कलम राज्यघटनेतून काढून टाकले. पाकला हे जिव्हारी लागले. पाकने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरबाबत भारतावर जहरी टीका केली.त्यानंतर उभयपक्षी संवाद ठप्प झाला. दोन्ही देशांनी आपले उच्चायुक्त माघारी बोलावले. सीमेवर कुरबुरी वाढल्या. नियंत्रणरेषेवर युद्धबंदीचा वारंवार भंग होऊ लागला. हा ‘डेडलॉक’ संपुष्टात आणण्यासाठी पडद्याआडून त्रयस्थ देश सूत्रे हलवीत होते. यामागे संयुक्‍त अरब अमिराती (यूएई) या देशाची मुख्य भूमिका होती.

    यातवर्षी २२ नोव्हेंबरला परराष्ट्रमंत्री एप. जयशंकर यांनी अमिरातीस भेट दिली. नंतर शा खपल लर ख जनरल नरवणे यांनी अमिरातीसह सौदी दौरा केला. त्यानंतर पाक परराष्ट्रमंत्री शाह महेमुद कुरेशी हे अमिरातीच्या दौऱ्यावर गेले. या सर्व हालचाली भारत-पाक दरम्यान तणाव कमी करण्यासाठी अमिरातीच्या पुढाकाराने होत होत्या, हे आता उघड झाले आहे. या प्रक्रियेत सौदी अरेबियाचादेखील सहभाग होता. मागील महिन्यात भारत-पाक दरम्यान अधिकाऱ्यांची बैठक होऊन सीमेवर २००३ मध्ये झालेली पुढे जारी ठेवण्यावर एकमत झाले. पार्श्वभूमीवर ही मोठी घटना होती. त्याच दरम्यान पाक पंतप्रधान इम्रान खान यांना श्रीलंकेत जाण्यासाठी भारताने आपली हवाई सीमा खुली केली.

    पाक लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांनी मागील आठवड्यात भारत-पाक दरम्यान तणाव निवळण्यास हातभार लागेल, असे आश्‍वासक वक्तव्य केले.इग्रान खान यांना कोरोना झाल्यावर मोदी यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. इन बॉटर कमिशनची दिल्लीत नुकतीच बैठक पार पडली. त्यास पाकचे बॉटर कमिशनर हजर होते. दोन्ही देशात उच्चायुक्त फेर नियुक्‍त करावेत, उच्चायुक्त कार्यालयात झालेली कर्मचारी कपात रद्द करून ती पूर्ववत करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. यूएई यात मध्यस्थाची भूमिका वठवित आहे. त्यामागे अमेरिकेचे समर्थन दिसते.