
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये पोलीस दलासमोेरील आव्हाने वाढली आहेत. पोलिसांंचे नैतिक बळ वाढवण्यापासून वाढलेल्या सायबर क्राईमपर्यंत अनेक आघाड्यांंवर पोलिसांना लढावे लागते आहे. त्यातच येणारी निवडणूक, राजकीय संघर्षातून निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आ वासून उभा आहे. या परिस्थितीत विवेक फणसळकर यांंनी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अत्यंंत मितभाषी, नागरिकांना आणि पोलिसांनाही आपलेसे करण्याचे कसब असलेले आयुक्त त्यांच्या रुपाने मुंबईला मिळाले आहेत. त्यांच्याशी केलेली खास बातचित.
- मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांंची विशेष मुलाखत
विशाल राजे
पोलिसांबद्दल सगळ्या समाजातील नागरिकांमध्ये विश्वास असायला हवा. ज्याठिकाणी संंवाद असतो, तिथे वाद कमी होत नाहीत. नागरिक व पोलिसांमध्ये एक समान दुवा निर्माण व्हायला हवा. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक प्राधान्याने करायच्या कामासह किंवा संकल्पांसह पोलीस स्टेशन आणि सामान्य नागरिक यांंच्यातील संंवाद वाढावा, यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांंनी ‘नवराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.
महिला, ज्येष्ठ नागरिक, बालकांच्या सुरक्षेला प्राथमिकता राहील, त्यासोबतच पोलिसांनी सहृदयतेने काम करावे, यासाठी प्रयत्न असतील. गुन्हे अन्वेषण महत्वाचेच आहे पण गुन्हे नियंत्रणालाही प्राधान्य देऊ. सर्वसामान्यांंना सुरक्षेबाबत आश्वस्त करू, असेही त्यांनी सांगितले.
पोलीस कर्मचाऱ्यांंवर विश्वास आहे
कोणती नवी योजना आणण्यापेक्षा ज्या योजना आहेत, जे उपक्रम आहेत, ते पूर्ण क्षमतेने राबविले जावे, याकडे लक्ष दिले जाईल. ४८ हजार पोलीस कर्मचारी, अधिकारी आहेत. आमच्यात परस्पर विश्वास निर्माण करु. योग्य दिशा व नेतृत्व दिले तर लोक सहकार्य करतात, झोकून देऊन काम करतात. माझा कॉन्स्टेबल, अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, त्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवावा. त्यातून मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास आयुक्त फणसळकर यांनी व्यक्त केला.
चुकीला माफी नाही
मुंबई पोलीस दल सक्षम आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राजकीय पक्षांचे नेेते, कार्यकर्ते यांच्याशी संपर्क ठेऊ. संघर्ष टाळण्याचा प्रयत्न राहिलच पण वेळ आलीच तर कठोर कारवाई करण्यात येईल. कायद्याचा अंमल करावा लागेलच, पण तोे कमी प्रमाणात करावा लागावा, यासाठी जनतेने जागरुक रहायला हवे. पोलीस आणि जनतेत समतोल साधणार आहेच. नागरिकांची सुरक्षितता हीच प्राथमिकता असून त्यासाठी कृती, सुधारणा आणि संवाद ही त्रीसूत्री सांगतानाच भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या तर चुकीला माफी नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
अधिक सक्रिय व्हावे लागेल
काही दिवसात पोलिसांना गोपनीय माहिती न मिळाल्याने काही घटना घडल्याचे समोर आले होते. मी पोलीस विभागात विविध पदांवर काम केले आहे. त्यामुळे एटीएस, फोर्स वन यांच्याशीही समन्वय ठेवणे आवश्यक आहे. सध्या गुप्त माहिती मिळविण्यासाठी तंंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे.
पूर्वी गुप्त माहिती मिळविण्याची पद्धत होती, ती आता बरीचशी बदलली आहे. त्यामुळेच पोलीस – नागरिक संवादातून माहिती मिळू शकते. विशेष शाखेचा आढावा घेतला जाईल. यासह प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने गुप्त माहिती घ्यावी व ती एकमेकांशी शेअर करावी, यातून कायदा सुरव्यवस्था राखली जाईल, असेेही आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले.
मान्सून प्लान तयार होतोेय
पावसाळ्यात नागरिकांंना व पोलिसांना अनेक समस्यांंना सामोेरे जावे लागते. त्यासाठी मान्सून प्लान तयार करतोय. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांंचीही त्याबाबत भेट घेणार आहे. कोणत्या भागात पाणी साचले याची माहिती नागरिकांंना मिळायला हवी. त्यामुळे लोक आपल्या प्रवासाबाबत निर्णय घेऊ शकतात. वाहतूक कोंडी टाळता येईल. पोलीस कर्मचारी नागरिकांंना मदत करतील, असेही त्यांनी सांगितले.
दंड वसुली हा हेतू नाहीच
मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग वाढायला हवा. तर वाहतूक पोलिसांनी सहृदयतेनेे काम करावे. वाहतूक सुरु ठेवणे हे आद्य कर्तव्य आहे. वाहन चालकांना अडवणे, दंड वसूल करणे हा हेतू असूच शकत नाही. त्यासाठी पोलिसांचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न असेल, असेही आयुक्त फणसळकर म्हणाले. तर माजी आयुक्तांंनी सुरु केलेले जे उपक्रम नागरिकांसाठी आवश्यक आहेत, ते सुरु ठेवण्यात येतील. सण्डे स्ट्रीटसारख्या उपक्रमांंचा आढावा घेण्यात येईल, त्यानंंतर निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.